मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काहीबाही लिहिलेलं..!

काहीबाही लिहिलेलं..! कुठेतरी शब्दांना धारदार तलवारीच्या पात्यांचे स्वरूप देऊन संविधानाला लक्षात घेऊन लिहणारा तू नामदेव ढसाळ वाटतो.तर कधी सांजेच्या प्रहरी शब्दांना चांदण्यात मोजणारा,अन् कधीतरी स्मशानात जळत्या प्रेताच्या उजेडात उडत्या विस्तवावर कविता करणार तू ग्रेस वाटतो.कधीतरी रेल्वे स्थानकात तुझ्या कविता रेल्वेच्या आवजाशी हितगुज घालू बघता,अन् तू तिथेच तुझे तारुण्यातले जीवन कवितेला वाहून देतो.तेव्हा खरच तू कवितेला शोभणारा,तिच्यासाठी असणारा बालकवी शोभतोस... हे आणी... इतर सर्वच कवी आहेना हे जगायला शिकवतात.तुम्ही म्हणाल मी पण आता काहीतरी कवितेशी जुळवून व्यक्त होणे,अव्यक्त राहणे याबद्दल लिहत असेल तर तसे काहीही नाही.पण काय असतं जेव्हा कुठेतरी त्या क्षणाची (जो क्षण आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी झुरवत ठेवत असतो) आपल्याला जाणीव होत असते,तो तेव्हाच कृतीत व्यक्त करून मोकळे होऊन जायचे असते... कसे आहेना, लिहत्या हाताला आपण खूप वेळा विचारून बसतो की, तुम्ही हे कसे लिहतात...?  कसं सुचतं..? कोणासाठी..? असे अनेक प्रश्न... या प्रश्नांना खरंतर उत्तरं नाही, फक्त कोणाला विचारांना लिखित स्वरूपात व्यक्त क...