मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भटकंती With Gautala Wildlife Sanctuary..! 💙

भटकंती With Gautala Wildlife Sanctuary..! 💙 गेले दोन दिवस एकापाठोपाठ सुट्टया असल्यानं अन् आता आज सोमवारी पण सुट्टी असल्याने बरेच दिवस एकांताशी स्वगत करून, मनात चालू असलेल्या असंख्य घडामोडींना थोडा रिलीफ द्यावा म्हणून कित्येक दिवस निसर्ग जवळ करायचा विचार करत होतो. दोन दिवसांपूर्वी अखेर हा योग जुळून आला. मला निसर्गात एकटं भटकायला भयंकर आवडते, नशिबानं मी राहतो ते शहर निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. अन्; शहराच्या चहूबाजूंनी रानोमाळ भटकत राहता येईल असे कीत्येक डोंगरं-टेकड्या आहे. निसर्गानं आमच्यावर निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. त्यामुळे हा निसर्ग सोडून बाहेर भटकायला जावं असे वाटत नाही, जरी या डोंगरातील रानवाटा ओळखीच्या झाल्या आहेत. जरी डोंगराच्या कपारीला वास्तव्य करणाऱ्या बांधवांना आम्ही ओळखीचं झालो आहे. कारण हेच की, या निसर्गाशी नेहमीच एकरूप होऊन आम्ही राहत आलो आहे. अन् त्याच्याशी एक नाळ कायम जोडली आहे. आमची दररोजची पहाट याच गौताळा अभयारण्यात भटकत सुरू होते. अन्; सध्या नशिबानं माझी सायंकाळसुद्धा याच अभयारण्यात भटकंती करायला, फिरायला येऊन ह

महाराष्ट्र एक्सप्रेस..!

महाराष्ट्र एक्सप्रेस..! सात वाजेची महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येण्याची अनौंनसिंग झाली तसे मी हातातला दहा रुपयाचा कोथिंबीर घातलेला वडापाव जो एरवी मी आठ-दहा घासांत खातो, तो तीन घासांत मी नरड्याच्याखाली नेऊन सोडला. दुसऱ्या घासाला अर्धी हिरवी मिरची जिभेवर कतरली तशी ती जिभेला इतकी झोंबली की, एखादं महुळ एखाद्या लहानग्या पोराला झोंबावं अन् ते पोर पिंडरीला पाय लाऊन सैरावैरा पळत सुटावे. मी गटगट करून रेल मीलची पाण्याची अर्धी बाटली खाली केली, धावतच माझी बॅग घेऊन जनरलचा डब्बा जवळ केला. पुढच्या मिनिटभरात रेल्वेला सिग्नल मिळाला अन् रेल्वे एक-एक रुळ ओलांडत तिच्या नेहमीच्या मार्गाला लागली. स्टेशनवरला उजेड, आवाज जसजसं रेल्वे स्टेशनपासून दूर जाऊ लागली तसतसे अंधारात रेल्वे रुळावर चालत राहिली अन् एक वेळ आली तसे स्टेशनवर असलेल्या लोकांचा गलका, लोकांच्या हाका, मागे अंधारात विरत गेल्या. अन् ; मला खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सची आठवण येऊन गेली. दाटीवाटीत कसाबसा उभे राहून प्रवास सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी एकादशी म्हणून डब्ब्यात बरेच वारकरी बांधव राम कृष्ण हरीचा घोष करत होते

कंत्राटी कामगार..!

कंत्राटी कामगार..! काही वेळापूर्वी फ्लॅटवर येऊन निपचित पडलो आहे. डोक्यावर असलेला फॅन कमी स्पीडमध्ये गरगर आवाज करत फिरतोय, विंडोग्रीलमधून येणारी वाऱ्याची झुळूक हवीहवीशी वाटत आहे. पण; मग शरीर सुखाची मागणी करेल म्हणून निपचित लोळत पडलो आहे.  आज दिवसभर शहरात कारण नसतांना भटकत होतो. मित्र गावाला गेला आहे मग त्याची बाईक माझ्या जवळच आहे, शंभरचं पेट्रोल टाकून दिवसभर या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर असं भटकत राहिलो. कारण काहीही नव्हतं बस कंपनीच्या गेटवर गेलं की, तेथील सुखलेले कंत्राटी कामगारांचे चेहरे बघितले की मला माझ्यासारखं कुणीतरी आयुष्य जगते आहे याची जाणीव होते. अन्; मग जीवाला काहीवेळ सुख भेटून जातं. या असल्या जगण्यात कसलं आलंय सुख, पण; आपल्यासोबत ही फरफट कुणीतरी अनुभवत आहे हे काळजाला आधार देऊन जातं. नाहीतर एरवी आम्हा कंत्राटी कामगारांच्या आयुष्याची फरफट सुरूच असते.  जसं कंडोम वापरून दहा-पाच मिनिटांची हौस भागवून झाली की, त्याला पहाटे कुठल्या रस्त्यावर फेकून दिलं जातं. तसंच अगदी तसंच कंपनीत सहा महिन्यांचा करार संपला की आम्हाला फेकून दिलं जातं. असंच परवा एका मित्राचा सहा

सहेला रे..!

सहेला रे..! काही आठवणींना आठवांचा दरवळ असतो, अशीच ही एक सुगंधी आठवण. आज पुन्हा प्रवासात विचार करत असताना सिग्नल लागला अन् मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आठवांच्या कुप्पीतून त्या गोड आठवणीला अलगद सामोरे घेऊन आले. असंच एकदा पुण्यातील मोशी येथील Exhibition साठी रात्री अकरा-बाराच्या दरम्यान औरंगाबादवरून निघालो. तेव्हा मी एका छोट्या कंपनीत सिनियर प्रॉडक्शन सुपरवायझर या हुद्द्यावर काम करत होतो. प्रवास सुरू झाला आकाशात असलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशाच्या साक्षीने प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर, कंपनीचे हौशी मालक, मी अन् अजून काही कंपनीतील मित्र असे आम्ही प्रवास करत होतो.  कुठल्याश्या टोलनाक्यावर गाडी थांबली अन् रात्रीच्या तीन- साडेतीन वाजेच्या वेळी एक विशीतली तरुणी रातराणीच्या फुलांचा गजरा घेऊन आमच्या होंडासिटी कारकडे आली. ती फुलं विकणारी तरुणी कदाचित स्वतःच्या जागेतील तिने लावलेली फुलं विकत नसावी. कारण काही दहा-पंधरा मिनिटांपूर्वीच तिची ही गजऱ्याची टोपली तिनं उघडली असावी असं वाटत होतं. अन् ही रेडीमेड तयार गजरे तिला विकत कुठून भेटत असावी असंही वाटून गेलं. ड्रायव्हर अन् ती तरुणी यांच्

स्वगत मनाचे..!

स्वगत मनाचे..! पाऊस निर्धोक होऊन विजांच्या कडकडाटासह पन्हाळातून बरसतोय, मगाशीच काळोखात हरवून जावी तशी संपूर्ण शहराची लाईट एकदमच गेली अन् एकदमच सारं शहर अंधारून गेलं. काही वेळापूर्वी सेकंड शिफ्टची सुट्टी आज लवकरच घेऊन कंपनीतून आलो. ओले झालेले सेफ्टी शूज खिडकीच्या ग्रीलला लेसने बांधून टाकले अन् सॉक्स दरवाज्याच्या लॅचला अटकवून बेडवर पडून राहिलो. मित्र आज त्यांची थर्ड शिफ्ट असल्यानं केव्हाच कंपनीत निघून गेली असतील. कारण बरसणारा पाऊस अन् त्याचा अंदाज घेऊन आज ड्युटी करावी लागेल, याचा अंदाज आज पहाटे उत्तरेच्या दिशेने भरून आलेल्या आभाळाला बघूनच आला होता. मी दुपारसरल्या जेव्हा कंपनीत गेलो तेव्हा अंदाज वाटत होता की, गरजत असलेली ढग बरसणार नाही. पण; उलट झालं अन् आता मगा एक तासापासून विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस चालू आहे. आल्यावर पन्हाळ्यातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या तालावर सकाळी मित्राने चहा प्यायला गेला, तेव्हा आणलेला पेपर कितीवेळ वाचत बसलो. आता एकट्याला जेवायला काय करू.? या एका अस्सल गृहीणीसारख्या मला पडणाऱ्या प्रश्नाला मी येताना उत्तर शोधले अन् तीन अंडी काळ्या पिशवीत पेपरात ब

कॅनॉट कॉर्नर ..!

कॅनॉट कॉर्नर ..! दोन दिवस सलग पाऊस पडल्यामुळे काळवंडलेल्या ढगांच्या आडून काही केल्या सूर्याचं दर्शन झालं नाही. या काळात दिड कीलो वजनाचे सेफ्टी बुट पाण्यात भिजल्याने दोन कीलोचे वाटू लागले होते.  आमच्यासारख्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना पावसाचे काही सोयरसुतक नसते, तो येवो न येवो काही एक घेणंदेणं आम्हाला नसतं. बस अट एकच कंपनीत जायच्या वेळी अन् यायच्या वेळी तो यायला नको. नाहीतर गेले दोन दिवस जी बुटांची झालेली अवस्था अन् त्यांना ओढूनताणून वापरताना कंपनीत माझी झालेली खराब हालत हे वाईट्ट आहे. अखेर आज दुपारी सूर्याने दर्शन दिलं, ओझरते का होईना सूर्याचे किरण आमच्या उबट वास येणाऱ्या फ्लॅटमध्ये आले. माझी गोधडी सादळल्याने उबट वास मारत असल्यानं दुपारी तिला भर उन्हात गॅलरीत टाकून दिली अन् दोन दिवसांचे चार सॉक्सचे जोड धुवून वाळू घातले. अन्; सोबतच बुटही स्वच्छ करून मस्त पॉलीश करून चकचकीत करून गॅलरीत उन्हं खायला ठेऊन दिली. स्लीपर घालून खाली फ्लॅट मालकाच्या मुलीला तिने दिलेली पुस्तकं परत केली आणि मग कॉफीसोबत तिच्याशी बऱ्याच गप्पा "ऑक्टोबर जंक्शन" या पुस्तकाला

पुस्तकांचा दरवळ सवे मैत्रिणीच्या..!

पुस्तकांचा दरवळ सवे मैत्रिणीच्या..! जून्या पुस्तकांचा दरवळ अन्; हे पुस्तकं बघत असतांना आपल्या सोबतच मैत्रिणीच्या डोळ्यांत असलेलं कुतूहल. जून्या पुस्तकांना स्मृतींचा दरवळ असतो कधीही न उलगडणारा. मग अंदाज लावले जातात पुस्तकांवर सोडून दिलेल्या कित्येक खाणाखुणांना घेऊन, कधीतरी हे अंदाज जुळून येतात. नाहीतर न जुळलेल्या या अंदाजांना घेऊन आपण उलगडत राहतो कित्येक दिवस, त्याच न उलगडणाऱ्या अंदाजांना पुस्तकांत गिरवलेल्या खाणाखुणांना घेऊन. मग कित्येकदा हातातून मोरपीस सुटून जावं तसं सुटून गेलेल्या गोष्टी घेऊन आपल्या आतलेच आपण अंदाज लढवत राहतो. अन्; मग न उलगडणारी एक कथा पुन्हा अपूर्ण राहून जाते. त्याच खाणाखुणांच्या संगतीने मग मनास शैल्य राहतं अंदाज चुकून गेल्याचं. अन् भरकटलेलं मन मग शोधत राहतं अश्या खाणाखुणांना अंदाज घेत, पुन्हा-पुन्हा अडगळीत असलेल्या दुकानांच्या वाटा जवळ करत. अन्; जुन्या पुस्तकांच्या समवेत हा प्रवास कायम सुरू राहतो, जोवर हे अंदाज जुळत नाही. अन् मग एक कोडं जे कधीतरी सुटणारं वाटत राहतं, ते सुटत नाही. जेव्हा हे सगळं जुळून येतं, तेव्हा या जून्या पुस्तकांच्या आत दड

MIT कॉर्नर अन् संगम..!

MIT कॉर्नर अन् संगम..! जुजबी आठवणींचे दिवस होते, सूर्य उदयाला आला की मी तालुक्याच्या माझ्या गावावरून एका मोडकळीस आलेल्या फटफटीवर औरंगाबाद शहर जवळ करायचो. कारण काही नाही चांगली चालती नोकरी सोडून कॉलेज करण्याचं भूत डोक्यात शिरले होते. शिक्षणावर पुढे चांगली नोकरी लागेल या आशेपायी मी कॉलेजच्या खेट्या घालायचो, जसं एखादी पोट पाडून आता पोर होत नाहीये म्हणून एखादी बाई दवाखान्याच्या नाहीतर मग एखाद्या देवस्थानाच्या खेट्या घालत असते. पहाटेच शहराची वाट जवळ करायला लागलो की, थंडीच्या दिवसात अंगात हुडहुडी भरून यायची. ढवळे तलमचे असलेलं स्वेटर रस्त्यावरील धुळीने जिल्ह्याच्या शहरापर्यंत येवोस्तोवर मातकट झालेलं असायचं. केसं पार भुरके अन् त्यात धूळ गेल्यानं पिंजारल्यासारखे होऊन जायचे. औरंगाबादला पोहचलं की, एखादा आडोसा बघून मग ते स्वेटर काढून घेणं व्हायचं. शर्ट पँटच्या आत खोचून व्हायचा, धुळीने खराब झालेले काळे बुट पुसून व्हायचं, खिळखिळी झालेली गाडी पुसून भेगा पडलेल्या हेल्मेटला सावरून घेत पुन्हा प्रवास सुरू व्हायचा. औरंगाबाद शहरातून रेल्वे स्टेशन मार्गे १० की.मी गेलं की बीड बायपास ओलांडून ३ की.

भोग कंत्राटी कामगारांचे..!

भोग कंत्राटी कामगारांचे..! काल सहज पडत्या पाऊसाच्या धारा वाहून डबके साचलेल्या अन् गंध्या नाल्याचं, गटरातलं संडासाचे पाणी वाहणाऱ्या गल्ल्या फिरून झाल्या. अन् मग मी सहज प्रश्न करत फिरलो लोकांना की, मी लिहत असतो म्हणजे नेमकं काय करतो रे..! तेव्हा लोकं बोलू लागले, आमच्या काळ्याकुट्ट पडलेल्या छात्या अन् पीळ पडलेल्या आतड्यांच्या पोटाचा प्रश्न तुझ्या लेखणीतून सुटला असावा. जेव्हा खळगीभर पोटासाठी आणि मिळणाऱ्या अन्नासाठी आमची माय, आमची इज्जत आम्ही भर आंदोलनात आम्हाला आमचा हक्क मिळावा म्हणून उघडी पाडली होती. तेव्हा दंगे झाले, आमच्या लोकांचे डोके फुटले. हापश्याखाली जेव्हा डोके धुवायला घेतले, तेव्हा पाणी नाही रक्त वहायला लागलं होतं. मग सगळं शांततेत व्हावं म्हणून माझ्या वस्तीतून मला पुढं करण्यात आलं. मी चिटुरभर कागदावर काहीतरी चार-दोन अक्षरं आई बापाची भाड खाल्यागत लिहिली, खरडली. त्याला निवेदन असं नाव दिलं. दोन-चार दिवसात आमच्या अटी मंजूर झाल्या मोठ्या साहेबानं काही अर्ज फाट्यावर निवेदनं मंजूर झालं म्हणून माझ्या सह्या घेतल्या अन् आमचीच खोलून मारावी तसं आमच्या गावाला राशनचं दुकान उघडं झालं

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..! माणसं जोडायला हवी या एका वाक्यापाशी येऊन हल्ली मनाचा संवाद काही सेकंदासाठी का होईना थांबत असतो. कारण आयुष्यात खरं माणसं जोडायला हवीच का ? ती खरच इतकी महत्त्वाची असतात का ? ही दोन प्रश्न हल्ली आयुष्याची गणितं सोडवत असताना रोजच पडत असतात. मग कुणी अनामिक खूप दिवसांच्या अंतराने भेटून जातं, दोन क्षणाच सुख आपल्या पदरी टाकून जातं. अश्यावेळी वाटून जातं की, आपण माणसं जोडायला हवी. मग कधीतरी जोडलेल्या माणसांचा होणारा त्रास व त्यांची उपस्थिती आपल्या आयुष्यात असण्याने होणारा त्रास. हे सगळं कसं आलबेल आहे असं वाटतं.  आयुष्याची गणितं जुळवत-जुळवत मन मग हिंदोळे देत का होईना या प्रश्नांना सोबत घेऊन रोज माझ्याशी जगण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टींना घेऊन गुजगोष्टी करत असतं. असंच काही त्याच्या कालच्या झालेल्या गुजगोष्टीतून हाती लागलं अन् वाटलं की लिहायला हवं. कारण लिहल्याने काय होतं, माणसं जोडली जातात. त्यांची प्रॉब्लेम्स नकळत मग आपली होतात, मग उत्तरे शोधली जातात. कित्येक कधीही उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांची. पण; माणसांचा सहवास असाच असतो जो आशेला लावतो. मग ते प्रेम असो

"एक उलट... एक सुलट"

"एक उलट... एक सुलट" काल उसवत्या सांजवेळेला "अमृता सुभाष" यांचं "एक उलट... एक सुलट" हे ललित लेखन अन खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातल्या विचारवादळाची, समरसून जगलेल्या, अनुभवलेल्या क्षणांची, आयुष्यातल्या अनामिक क्षणांची, अनुभवसरिंची ही अक्षरांनींच घडवलेली, त्यांनी घातलेली वीण वाचून संपवली.   खरंतर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यावरील, रंगमंचावरील आयुष्य हे आपण नेहमीच बघत असतो. पण; मला या कलाकारांच्या बाबतीत एक अनामिक कुतूहल नेहमीच आहे. ते हे की, या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यामागील खरंखुरं आयुष्य कसं असेल..? पडद्यावर कधीतरी खोटं हसू घेऊन जगणारे किंवा खरं हसू घेऊन जगणारी ही कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कशी असतील..? त्यांचा स्वभाव कसा असेल..? हे सर्व जाणून घेण्याचं मला अनामिक कुतूहल आहे. यासाठी मग मी कित्येकदा त्यांच्या आयुष्यावर लिखित पुस्तकं वाचत राहिलो. पडद्यावर भेटणाऱ्या या कलाकारांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कलाकारांशी जुळवून बघत राहिलो. सुशांत सिंग राजपूत याने जेव्हा अवेळी एक्झिट घेतली तेव्हा मात्र माझं हे कुतूहल अजूनच चा

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ

तरवट

"तरवट"  गेले पंधरा दिवस Running मुळे जरा एकाकीच उजव्या पायाचे Sciatica (Buttocks) इजा झाल्यासारखे दुखायला लागले होते. Running झाल्यानंतर Warm-up, Stretching हे सगळं नियमित करूनही हा त्रास सुरू झाला होता. टॅब्लेटस् अन् डायट घेऊनही समाधानकारक असा फरक पडत नाहीये. मग काल मित्राच्या सांगण्यावरून निसर्ग जवळ केला अन् भर दुपारी दोनच्या सुमारास या "तरवट" च्या शोधात भटकत राहिलो. काळाच्या ओघात निसर्ग आपल्यापासून कसा दुरावत आहे हे नेहमीच जाणवत होतं. पण; हे काल अजूनच प्रकर्षाने जाणवलं. ही झाडं शक्यतो डोंगर उताराच्या, मुरमाड रानात अन् मानवी वस्ती असलेल्या परुंतू बऱ्यापैकी मोकळ्या जागेत खडकाळ रानात उगते. आमच्या तालुक्याच्या घराला चांगलं निसर्गसौंदर्य लाभलं आहे, त्यामुळं पंधरा-वीस वर्षापूर्वी ही झाडे अगदी घराच्या सभोवताली असलेल्या मोकळ्या रानात मोप प्रमाणात होती.  पण; गेल्या काही वर्षात निसर्गाचा झालेला ऱ्हास, जमिनीची झालेली धूप यामुळे ही झाडी आता घराच्या जवळ उपलब्ध नाही. मग काय दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकत होतो. अडीच- तीन की.मी रानात भटकंती करत ही झाडी मिळवली. घराच्य

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२ पहाट झाली अन् कोंबड्याच्या बांगेसरशी नागू उठला. अंघोळपाणी करून गावातल्या खोकल्या आईच्या देउळमध्ये अगरबत्ती लाऊन, नारळ फोडून पाय पडून आला. आज शहर जवळ करायचं होतं. खोकल्या आईच्या पाया पडून नागू येओस्तोवर गोंडाजी उठला होता. अंघोळ-पाणी करून त्यानं वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सर्व मालाची गिनती केली, तो सगळा माल एकासरशी लाऊन तो पारावर बसून गाड्या येण्याची वाट बघत बसला होता. तितक्यात रखमाजी अन् त्याचा धाकला लेऊक दोन्ही टेम्पो घेऊन झोपड्या महोरे येऊन उभे राहिले. टेम्पो वेळीच आले बघून गोंडाजी अन् नागूच्या जीवात जीव आला. गोंडाजी अन् रखमाजीचा धाकला लेऊक वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सगळा माल टेम्पोत भरू लागले होते. नागू रखमाजीला घेऊन पारावर बसला व सुमनबाईला चहाचं फर्मान सोडून गप्पा मारत बसले. गप्पा तरी काय या गधड्या धंद्यात लाज राहिली नाही, यंत्र आलीया आता कोणती बाई वऱ्हाटे, पाटे,करत बसेल. इतका वखत कुणाला हाय म्हणून तो त्याच्या धंद्यात होत असलेली आबळ रखमाजीला सांगत होता. रखमाजी त्याच्या गाड्याच्या धंद्यात महागाई अन् वाढलेली स्पर्धा, घरोघर झालेल्या गाड्या यामुळे त्य

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ११

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ११ चहूकडे अंधारून आलं होतं, काळोख दाटून आला होता. या काळोखाच्या किर्र अंधाराखेरीच तुडुंब भरून वाहणाऱ्या शिवणामायच्या पाण्याचा खळखळाट फक्त या अंधारात ऐकू येत होता. संपूर्ण गाव भूकंपात जमीनदोस्त व्हावं तसं सारं गाव अंधारात निपचित झोपड्यांच्या आड होऊन गारठयाचा जो मिळेल तो आसरा घेऊन पहुडला होता. सांजेचे आठ वाजले तसं सारं गाव चिडीचूप पहुडले होते. इकडे संतू, नागू अन् गोंडाजी यांची जेवणं आवरली अन् ती तिघे लिंबाच्या पारावर सोजणी अंथरून लिंबाच्या खोडाला मान टेकवून उद्याच्या पहाटे शहराला जायचं नियोजन करु लागली होती. सांजेला गोंडाजी अन् संतू उद्या पहाटे दोन टेम्पो आपल्याला शहर जवळ करायला लागतील एक आपलं अवजारे, संसार बादली, तयार झालेली वराटे, पाटे, मंदिरात असणारे दिवे, खलबत्ते, मुसळी असं सगळा तयार माल एका गाडीत अन् राहण्यापूर्ता संसार अन् दोघांची तीन खेचर एका गाडीत घेऊन जायचं म्हणून गावातल्या रख्माजीला पहाटेचा सांगावा सांगून, काही इसार देऊन आले होते. त्याने पहाटे सहालाच झोपड्या मोहरे गाडी आणून लावण्याचं कबूल केलं होतं. आता तिघेही महत्त्वाचं काम झाल्यानं निव

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

दागडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १० अस्ताला जाणारा सूर्य ढगांच्या आडून डोंगरांच्या रांगेपल्याड कलला. तसं संतू अन् गोंडाजी यांनी आपली वऱ्हाटे, पाटे बनवायला लागणारी जी दिवसभर घाम गाळून फोडलेली दगडं होती ती त्यांच्या खेचराच्या पाठीवर लादली. उन्हाळा सरला अन् बरसदीचा पहिला पाऊस येऊन गेला असल्यानं आता खदानीत येऊन दगुड फोडायचं त्यांचं काम आजपासून पुढे चार महिने बंद झालं होतं.  दगुड खेचरावर लादली, मोठा घन, छनी, एक हातोडी, अन् पाण्याची कॅन त्यांनी लादलेल्या दगडाच्या बाजूला झुलीला एका पिशवीत टाकली. दोघांनी खदानमायचे गुडघ्यावर बसून हात जोडून पाया पडले. आणि दोघेही कोसभर दूर असलेल्या आपल्या झोपडीच्या दिशेनं खेचरं घेऊन निघाले. इकडे रानुबाई, सुमनबाई अन् संतूची बाई दिवसभर वऱ्हाटे, पाटे विकून दमल्या होत्या. काहीवेळापूर्वी महामंडळाच्या बसमध्ये बसलेल्या त्या त्यांची झोपडी असलेल्या गावाच्या फाट्यावर उतरल्या. फाट्यावर असणाऱ्या भिवसन आबाच्या किराणा दुकानातून त्यांनी हळद, तिखट, मिठाच्या पुड्या अन् अर्धा अर्धा किलो तांदूळ घेऊन त्यांनी झोपड्या जवळ केल्या. आज खिचडीचा बेत ठरला असावा, हे त्यांच्या या घेतलेल्या ज

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९ भर दुपार ढळून गेली, गोंडाजी अन् संतू आपलं काम उरकते घेऊन दुपारच्या जेवणाला खदानीच्या भिंती आड सावलीचा आसरा धरून बसणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपल्या शिंगरांना खदानीच्या एका अंगाला असलेल्या गवताच्या रानात चरायला म्हणून खूंटी ठोकून चरायला सोडून दिले. अन् दोघे खदानीतून रीसणाऱ्या पाण्याची कॅन घेऊन जेवायला म्हणून सावलीत बसले. आजच्याना खदानीतील कामाचा शेवट दिवस होणार होता अन् पुढे काही दिवस आता फक्त घरी राहून वह्राटे, पाटे, उखळं, देवळातले दिवे यांचा दगडांना आकार देऊन शहराला तात्पुरती झोपडी बांधून ते विक्रा करणार होते. दोघांचे जेवणं चालू होते, आता उद्यापासून त्यांच्या कामात होणारा बदल याबद्दलही ते गप्पा मारत होते. तसं यावर्षी दगुड फोडायचा हंगाम चांगलाच गावला होता त्यांना. खदान मायना भी चांगलीच मदत त्यांना केली होती अन् बराच पैका या दगडांना आकार देऊन त्यांचा होणार होता. आजचा दिवस शेवटचा असल्यानं कामाचा बराच उरक गोंडाजी अन् संतू यांना होता. दोघांनी बिगिबिगी भाकरी खाल्या अन् पुन्हा घन आणि छनी हातोडा घेऊन ते कामाला लागले होते. उन्हाळ्याच्या दिवसातील शेव

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८ सूर्य दुपारच्या पाराकडे कलता झाला होता. उन्हं मी म्हणू लागले होते आणि या उन्हाच्या तिरीपेत संतू अन् गोंडाजीचं दांडगे शरीर दगडावर घाव घालीत होतं. प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या उडु लागल्या होत्या, पाथरवट जसा छनीच्या सहाय्याने दगडाला आकार देतो तसा ओबडधोबड दगुड फुटून आकार घेऊ लागला होता. कालपर्वाच खदानीत बार उडवला असल्यानं आज वऱ्हाटे, पाटे करायला म्हणून मोप दगुड उपलब्ध होता. वेळीच त्याला आकार देऊन शिंगरावर लादून फक्त त्याला झोपडीपर्यंत न्यायचं होतं, हे जितकं सोप्पं वाटत होतं तितकंही सोप्पं काम नव्हतं. घटकाभर संतू अन् गोंडाजी काही आकार मिळालेला दगड घेऊन सावलीला आले. कॅनीत असलेलं पाणी गिल्लासात घेऊन दोघेही पित होते अन् घोटासरशी नरड्याच्या खाली उतरणारे पाणी सहज नकळत डोळ्यांना दिसून जात होते. पाणी पिऊन काही पाच दहा मिनिटांची विश्रांती म्हणून दोघे सावलीला खदानीच्या भिंतीला पाठ लाऊन आराम करत बसले. इकडे रानूबाई, सुमनबाई अन् संतूची बाई तालुक्याच्या गावाला आपली वऱ्हाटे,पाटे डोईवर घेऊन गल्लोगल्ली विकत फिरत होत्या. इळाचे दोन सट जरी विकले तर दिवसभराची मज

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७ गावची लोकं पण चांगली होती ,त्यांच्यात आपसात संतू अन् नागू मिसळून राहत म्हणून गावकऱ्यांना पण त्यांचा स्वभाव पटला होता. थोडाफार गावात होणारा विक्रा अन् मग तालुक्याचं शहर जवळ असल्यानं तालुक्याला माल विकायला जायचं सोयीचं होतं म्हणून त्यांची सोयच लागली होती. अन् दोनाची आता तीन संसार या दगड फोडण्याच्या कामावर गावच्या कृपेनं, गावच्या खदानीच्या कृपेनं पोट भरू लागली होती. पहाटेचा दहाचा पार कलला तसं संतू अन् गोंडाजी आपली शिंगरं घेऊन खदानीच्या अंगाला आले. उन्हं लाहीलाही करत होते. खदानदाराने मागेच दोन दिवसाला खदानीत एक मोठा बार उडवला होता, दगडांची बरीच ठिकरं ठिकरं खदानीत चहूकडे पसरलेली होती. खदानीच्या अंगाला मागील सालाचे अन् कालच्या पावासाचे असे पाणी तुंबलेले होते. काळ्याश्यार पाण्यात सर्वदूर हिरवे हिरवे शेवाळ नजरी पडत होते अन् काही शंभर मीटर अंतरावर असलेल्या खदानीच्या कपारीतून रीसनाऱ्या झऱ्यातून पाणी रिसत असल्याचं गोंडाजीच्या नजरीला पडलं.तो त्याच्या शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीतून कॅन घेऊन त्या रीसनाऱ्या झऱ्याच्या पायथ्याशी गेला अन् एका काटकीला कॅनीत

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६ मधूनच त्यानं सुमन बाईला भाकरी बांधायला अन् बिगीने आवरायला सांगितले अन् आपल्याला पावसाचा अंदाज बघून लवकर निघायला हवं असं म्हणून तो तिच्या भवती गरबड करू लागला होता. बरसदीचे दिवस जवळ येत होते अन् आता कामाचा उरक वाढवायला हवा म्हणून गोंडाजीसुद्धा गरबड करू लागला होता.  तितक्यात संतूचा आवाज आला अय लेका मला बी येऊ दे रे, बरसदीच्या आदी म्या बी दगुड घेऊन येतो म्हंजी मग बरसाद सुरू झाली की आपलं टिकी टिकी टाके द्यायचं काम चालू राहील नाय का..! नागू त्याला बघून हसू लागला अन् बोलता झाला..! हाव रे लेका तुझ खरं हाय बघ, वजीस आवर अजून वाहतूळ आहे त्यांना आवराया, सुमनबाई न्याहारी बांधायली चौघ संगीतनं अन् सांच्याला संगतीनेच घर जवळ करा. संतू हे बोलणं ऐकत त्यांच्या शिंगराला पाणी पाजत होता,पाणी पाजून झालं तसं त्यानं त्याच्यावर पोत्याची झूल टाकली अन् तो त्यात त्याचं दगुड फोडायच साहित्य टाकू लागला. त्याला काह ध्यान आलं एकाकी समजलं नाही त्यानं त्याची बंडी चपापली पण त्याला काही गवसत नसल्याचा उधार भाव तो चेहऱ्यावर आणून झोपडी आता गेला अन् आवजाराच्या जागी असलेल्या वळकटीत ठेवले

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ५

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ५ तिकडं शिंगरे ओली होतील अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेल्या पाऊसामुळे झोपडीला काही होणार नाहीना, याची चिंता त्यांना लागून होती. घरी एकट्या बायकामाणसं असल्यानं वावधन बघून त्यांना अजूनच विचार करून कसेतरी होऊ लागले होते.  घडी भरच्याने पाऊस ओसरला होता. बराच पाऊस झाल्याने गावातले नदी,नाले वाहू लागले होते. रस्त्याच्या दुतर्फा बाजूने असलेल्या नाल्या तुडुंब भरून वाहत होते. सावत्या माळ्याच्या देऊळामागून गेलेला नाला तुडुंब भरून वाहत होता. अंधारून आलं होतं अन् किर्र अंधारात वाट काढीत संतू, नागू घराच्या दिशेने लागले होते. पाण्याचा वाहणारा झोका अन् काळोखात खडकाच्या ठोकरा खात जेव्हा संतू अन् नागू आपापल्या झोपडीजवळ पोहचले, तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. दोघे आप आपल्या झोपड्या अन् सभोवतालची झाली अवस्था निरखून बघत होते, नागूने पोहचताच आपल्या शिंगराला बघितले तो झोपडीच्या एका अंगाला पत्र्याच्या तात्पुरत्या निवाऱ्यात बांधून ठेवला होता. खूप वेळ झालेल्या पावसाने, वावधानाने त्याला हीव वाजून यावं असं झालं होतं. उभ्या उभ्या आपलं थरथरते अंग घेऊन झोपी गेला होता. नागू