#देवळाच्या_वाटा... सकाळ धरल्या पहाट होते,आवरासावरी करून पावले हनुमानाच्या आणि मग महादेवाच्या देऊळाकडं कुच करतात. मंदिराचा क्रम चुकतोय पण मनात भाव असले की देवाला सर्व चालतंय,कोण श्रेष्ठ अन् कोण कसा हा विचार करायला त्याच्याकडे वेळ नाहीच व मलाही त्या भानगडीत पडायचं नाही.ठरल्या वेळेला अनवाणी पावलांनी मी चालत राहतो,गावाची वेस ओलांडायला काही अंतर बाकी असले की मारुतीरायाचं देऊळ लागतं. फुलाला देवाच्या सानिध्यात रहायला आवडत की काय म्हणून नदीच्या थडीला लागुन बेसरमाच्या झाडालगत एक पांढर्या फुलांच्या रुईचे झाड आहे.दोन-चार फुलं दोन-चार पाने घेतली की देउळ गाठायला पावले लागतात,मारुतीरायाच्या चरणाशी पानफुल वाहुन,भोळ्याभाबड्या मनाच्या चार गोष्टी त्याला सांगायच्या देऊळाला चहूकडे तीन चकरा मारायच्या अन् सभामंडपात येऊन काही वेळ शांत बसून राहायचं... यांचसाठी होतो अट्टहास रोजच्याला देऊळात जायचं..! सभामंडपात बसल्यावर देवाच्या सानिध्यात छान वाटतं,लॉकडाऊन लागलं अन् लोकं देऊळाकडे येणं विसरली.माझ्यासारखा हौशी येत असतो अधूनमधून कधीतरी माझं ठरल्यावेळी येणं असते,देव बोलत नाय तो फक्त ऐकतो आपण सांगत राहायच...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!