मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गावाकडचा कोरॉना

काय तो रोग आलाया म्हणे करुणा...कोरोणा म्हण ओ हौशे... आपल्याला कसला हुतो आहे बाई रोग अन् राग.... आपल्याकडे बघून आपल्याला होणार बी नाय त्यो....आपल्याच पोटाची खळगी भराया काम नाय इथं कुठं सफरचंद आणायला पैसा घालू रोग बोलून लक्षे.... बोलणं ऐकून मी थांबलो,तालुक्याच्या गावाला माझं राहणीमान माझ्या डोळ्यासमोरून गेलं.इथे हे काय चालू आहे हा प्रश्न पडला.... चालत चालत शिवनामायच्या किनारी येऊन थांबलो,गावात पाऊस येवो म्हणुन जसं महादेवाच्य मंदिरात पाणी भरून,मंदिर बंद करून ठेवता तसे कडी कुलूप लावून सर्व मंदिर बंद करून,देवाला राखण एक पोलिस ठेवला होता.... चालत चालत नदी पुलावर गेलो,माझ्या वयातल्या दोन-तीन तरण्या नवीन लग्न झालेल्या सूना धूने धोपटीत माहेरच्या गोष्टी करत होत्या... मी थांबलो अन् त्यांच्या जवळ जाऊन गप्पा ऐकत बसलो,"काय वो दिर साहेब कुठं फीरायले इकडं ?"वहिनीचा आवाज कानी आला,कुणी येतंय का काय भेटायला माझ्या दिराला असं बोलून त्या हसायला लागल्या... नाय वो वहिनी बघायलो,गावचे हाल-हवाल आमच्या सारख्या शहरी माणसाला कोण यतंया भेटायला इथं,मग भटकायलो एकटा एकटा... बरं हायसा जास्त फिरु नका दु

परभ्या दुनियादारीतला मित्र

तो आजही आठवतो परभ्या मेरी जान साला... दुनियादारीच्या नादी लागून या मित्राला गमावून बसलो... नेहमीप्रमाणे रस्त्याला खेटून असलेल्या पुलावर बसुन मी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना बघत मी एकटाच बसुन राहायचो पुलावर.मस्त हापचड्डी,फुल बाह्याचा ड्रेस घातलेला असायचा रस्त्याने येणारी थंडगार हवा शरिराला लागायची,पुलाखालून येणारा पाण्याचा आवाज खळ..खळ... खुप सुंदर वाटत असायचा.... तेव्हा माझा मित्र परभ्या मला भेटायला यायचा, पाच-सहा दिवसांतून एकदा यायचा तो.भोळा होता बिचारा पण माझा लाडका होता,साधारण फाटलेले कपडे घालायचा,पण त्याला सुद्धा तो विन करायचा.... दोन्ही पायात दोन वेग वेगळ्या चप्पल व नुकताच तरुणपणात पाऊल ठेवत असल्यामुळे आलेली  ती त्याची बोकड्यासारखी दाढी,अन् बारीकशी मिशी भारी दिसायचा तो या अवतारात.... माहीत नाही पण लहानपणी तो काही कारणास्तव थोडा भोळसर झाला असावा.त्याची माय पण त्याच्या सारखी विस्कटलेले केस,फाटलेली साडीमध्ये असत पण मेहनत करायचे दोघेपण.... शहरातल्या चौकात बसून असायचे धुळीला माखत शहरात एखाद डुक्कर,कुत्रं मेलं की परभ्याला लोकं बोलावून आणायचे.परभ्या हे काम चांगलं करतो हे शहरात सर्वां

कविसंमेलन तुझ्या सोबतीने

ऐकन आठवणींच्या कवि संमेलनात झाल्या कैक कविता सादर करून माझ्या,तू पण घे म्हणतो मनावर अन् कर भावना व्यक्त तुझ्या.... प्रत्येक कविता साजरी करतो तुझी दाद मिळावी म्हणून,तू पण कधीतरी अलवार डोळ्यांनी व्यक्त करत जा साथ तुझी माझ्याकडे बघुन... कधीतरी एखाद दोन शेर पेश होतात गझले आधी फक्त तुझ्यासाठी,तू ही म्हण एकदा इर्शाद अन् कर एकदा सुटे दोन शेर माझासाठी... मी कविता करतो त्यातही तुच असते,ऐकतानही डोळ्यांची डोळ्यांना साथ देणारी खरच तू मला माझीच लाडकी चारोळी भासते... मी नाही करत कधी व्यक्त मनाला आपल्या अव्यक्त नात्यावर,पण आठवणींच्या प्रत्येक क्षणाला कविसंमेलनात सादर करतो तुझ्यावर... भारत सोनवणे...

Claidestine love....

कुठेतरी व्यक्त व्हायचं असत,भावनांच्या आड लपून रोज-रोज तोच कोंडमारा,तो कोंडनारा श्वास फक्त चालू ठेवायचा आहे,म्हणून फक्त व्यक्त व्हायचं आहे.... चार भिंतीच्या आड बंधिस्त होनं काय अन् या पृथ्वीच्या अंडाकृती मध्ये कैद होनं काय सारखच आहे,पण.... पण काय आहेना हे मन थाऱ्यावर असलं तर सगळ अव्यक्त ठेवता येतं.... त्यामुळे मग असं अधून-मधून पडलेले मनातील उत्तर अन् त्याच उत्तरांना पुन्हा पडलेले प्रश्न हे चक्र काही संपत नाही,पण कुठेतरी विसावा दोन क्षणांचा अन् बळजबरीचंच मनाला हायसे वाटावं म्हणून व्हायचं व्यक्त कधीतरी... मग ते बोलण्यातुन असेल नाहीतर लिखाणातुन असेल,इतकेच नाही जमले तर बस मनसोक्त बंद कावडाच्या आत उशीखाली तोंड घालून रडून घ्यायचं,पण व्यक्त व्हायचं.... कालपरवा एका कोणत्यातरी पुस्तकात वाचलं,जे चालू काळाच्या एखादं शतक मागचं पुस्तक असेल,माणूस स्वत:च्या शरीराशी व्यक्त होऊन पण मनातील अव्यक्त भाव अन् चाललेली घुसमट थांबवू शकतो.हो अगदी तेच Masturbation,म्हणजे लेखन काय चुकीचं अन् काय बरोबर शिकवत हे आपण ठरवायचं असत,यात काही गैर नाही... कधीतरी तो मनातील विद्रोह मनाशीच चालेला शोधत असतो मी,मन कधीतरी घ

कविता दिन

पुस्तक प्रेमींना माहीत असलेले संघर्षही खुप आहे यात प्रेम,सहवास,विद्रोह,एकाकीपण हे फक्त कवितेतून खूप छान वाटते कारण कविता अप्रतिम अलवार आहे.ही माझी माझ्याच मनातील शुद्ध भावना अन् ते तितकेच सत्यही आहे..... जेव्हा एखादा वाचक कवितेच्या पुस्तकाच्या पृष्ठांमध्ये प्रवेश करतो,तेव्हा तो अशा जगामध्ये प्रवेश करते जिथे स्वप्ने भूतकाळाला विद्यमान ज्ञानाने रूपांतरित करतात आणि जिथे भविष्यासाठी विलक्षण संभाव्यतेत ती कविता रूपांतरित करत असते,हे सर्व फक्त वर्तमान काळामध्ये घडत असते.... त्यावेळी हे जे सर्व कवितेतून शब्दबद्ध होते तेव्हा आपण कोण आहोत याची पर्वा नाही, तेव्हा तेथे एक कविता आहे जी आपल्याला स्पर्श करेल,आपल्या हृदयाशी मनाशी अन् अंगावर येऊन जाणाऱ्या शहार्यांशी स्वगत करेल ही सुंदर भावना मनावर अधिराज्य करत असते... #मग_कधीतरी..! कधीतरी माझी कविता होते आठवणीतल्या बापावर तर कधी मला पदराआड घेऊन दुध पाचणार्या आईवर...! कधीतरी माझी कविता होते माझ्या शोर्य सांगणार्या भारत मातेवर तर कधी माझ्या तिरंग्यात शहिद झालेल्या माझ्या फौजीवर...! कधीतरी माझी कविता होते समाजाने रांड ठरवलेल्या माझी माय वेश्येवर

घाट एक जीवन

एकटा फीरत असलो की येऊन जातो चालत चालत रस्त्यानं घाटात,चालत राहतो मनातील विचारही माझ्या सोबत चालत राहतात.... समोर दिसतो तो विस्तारलेला खुप मोठा रानपसारा,रस्त्याने जाणारी येणारी मोठ्ठाली वाहनं  त्यात ट्रका घाटात मोसम कटू नये म्हणुन फुल स्पीडने रेस होत असतात लोड खुप असल्यामुळे... कधीतरी असे वाटत असते की,त्या तश्याच मागे आल्या तर एकदाचा माझा हा भटकणारा जीव तरी घेऊन जाईल.निपचित पडुन राहील मी त्यावेळी नाही वल्गना करणार तांब्याभर पाण्यासाठी सुद्धा कोणाची,पण नाहीना येत त्या ट्रक मागे त्यांनीपण ठरवले आहे की काय कोणास ठाऊक पुढेच जायचं अन् मला अजुन या मूर्ख जीवनात जगत ठेवायचं.... तोंडावर धूर सोडुन निघून जातात माझ्या साल्या पण कधीतरी पुढच्या वळणावर जेव्हा अशीच एक ट्रक पलटी होऊन जीवन मरणाच्या शेवटच्या थरारक क्षणांना जेव्हा तो जगत असतो,तेव्हा माझा हात साला एक तांब्याभर पाणी सुद्धा देऊ शकत नसतो.... तेव्हा असं वाटतं कलंक करून टाकावा या हाताचा,इतकं कसं निष्टुर असतो आपण.इतके कसे त्यावेळी भावनांच्या आहारी गेलेलो असतो समजत नाही,जेव्हा रक्ताचा ओघळ भर रस्त्यात वाहताना दिसतो एक मिनट सुद्धा ही जिंदगी थांब

मी वेडा....

मी वेडा भुकेचा.... आम्हीच ठरलो ठार वेडे इथे कित्येकदा जेव्हा जुळवता नाही आला भुकेचा व जगण्याचा प्रश्न...! रितेपणाच्या ओंजळीत वेचली कैक फुले सुगंधाची,जेव्हा मार्ग जगण्यासाठीचा शोधाया निघालो बेसूर दुनिया मला सारी भेटली...! डोळ्यांना सोबत आसवांची करून घेतली कायमची,निष्ठुर देहाला उपासमारीचा चिमटा घेऊन जगत आलो घाई नाही केलीये परतायाची...! संवाद कधीतरी जगण्याशी    हरलेल्या बेताल वक्तव्याने केला,मी जगत राहिलो अन् जगतांनाच रोज थोडा थोडा मी वेडा मरत राहिलो...! गणिते नाही जुळलेली कधी पोटासाठी भाकरीची,अनवाणी पायांनी हरवलेल्या वाटेला मी वेडा शोधत राहिलो...! सूर्य उदयाला एक मागणी करत राहिलो जगण्यासाठी,अस्थाला जातांनी सूर्य मी वेडा फक्त रिकाम्या पोटासाठी लढत मरत राहिलो...! पुन्हा रोजच होते सकाळ भेटल काहीतरी या आशेने पोटाला,अन् मी वेडा फक्त झोळी घेऊन मावळलेल्या आश्याना घेऊन भिक मागत  राहिलो...! लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र) मु.पो.कन्नड जि.औरंगाबाद. संपर्क 9075315960/9307918393.

गोड आठवणी

सूनो...सूनो... भाईयो,बहेनो, नौजवानों सूनो... आज श्याम को मिथुन का फिल्म लगणेवाला है ठीक नौ बजे.... उर्सात अशी हाक यायची अन् मी काही वेळासाठी स्तब्ध होऊन जायचो,एकाच ठिकाणी उभा राहून त्या पिक्चर टाकीकडे बघत राहायचो.तो टाकीच्यावर एक माणुस उभा असायचा त्याचा हा मार्केटिंग करायचा फंडा मला खुप आवडायचा.... हातात एक झटकण्यासाठी काठीला बांधलेले फडकं हात हलवत हातवारे करायचा,त्याच्या सोबत एक बुट्टा माणुससुद्धा असायचा जो माझ्यासारख्या पोरांना हात दाखवत आम्हाला खुश करायचा.... मला वाटायचं हेच अमिताभ,मिथुन,सर्व आहे. कधी कधी एखादी सुंदर कटम्याडी घातलेली तरूणी पण त्या टाकीवर चडून सर्वांना चित्रपट बघायला या असे हातवारे करून सांगत असायची.... मराठी चित्रपटांसाठी यापेक्षा थोड वेगळं असायचं,त्याचं पोस्टरच पूर्ण कथा सांगून द्यायचं. अन् ते पाहून त्या वेळच्या हौशी स्त्रियांना तो चित्रपट बगयाला जायचं हे ठरलेलं असायचं, कधीतरी एखादी अभिनेत्री यायची मग चित्रपटाचे तिकीट ती स्वतः वाटायची अशीच माझीही एक आठवण आहे... एकदा ऊर्सात माहेरची साडी हा चित्रपट आला होता,त्याचे तिकीट वाटायला अलका कुबल या होत्या.काय मग त्य

हरवलेले_अनेक_प्रश्न_अनेक_उत्तरं_भटकताय_वणवण_करत

कधीतरी ऑफीसमध्ये भरदुपारी डोळे लागतात, तेव्हा असे वाटते की नाही आता रेस्टरूम मध्ये जाऊन झोपून रहावं..... हो होत असं कधीतरी,पण दुपारचं झोपणं हे रात्रीच्या झोपण्यासारखे नसतच विचारांचं काहूर इथे मानगुटीवर स्वार असत.मग काय अनेक प्रश्न असतात.... प्रॉजेक्ट पुर्ण होईल का ? तो पसंद पडेल का ? कंपनीला माझ्यामुळे फायदा/नुकसान होईल का ? असे अनेक अनेक प्रश्न.काम चालुच असतं अन् मग काय.... दुपारची झोप असते ती मात्र विचार रात्रीचेही येऊन जातात डोक्यात,तुझा भास होऊन जातो अनेकदा पण कल्पनेतला स्पर्श कल्पनेतच राहून जातो.... रात्रीच्या प्रहरी टेरेसच्या पन्हाळातुन बाईकच्या सिट कव्हरवर पडणाऱ्या पाण्याचा तो आवाज, मग संथ संथ शांत झालेली ती त्याची कमी.अन् फक्त त्या पडणाऱ्या धारे पेक्षा स्पष्ट ऐकू येतो तो टप टप पडणारा पाण्याच्या थेंबांचा आवाज.... सोबत पेट्रोलचा नाॅक चालु राहुन गेल्यामुळे वाऱ्याच्या झुळके सोबत येऊन जाणारा तो सुवास,डोकं पार सुन्न सुन्न होऊन जातं.मग ऐकू येते मध्येच घड्याळाच्या काट्यांची लगबग एकमेकांच्या पुढे जाण्याची.... यांना रोजचं माहीत असुन देखील का हे वेड्यासारखे फिरत असतील ? का कुणास ठाऊ