#कोरोनासदृश्य काळ आणि नोकरीसाठी,नोकरी टिकविण्यासाठी,नोकरी मिळविण्यासाठी तरुणांची होत असलेली तडजोड.... सध्य परिस्थितीचा एकूण आढावा जेव्हा बघितला,तेव्हा मृत्यूपेक्षा सर्वाधिक मोठे वाटणारे संकट जर कोणते असेल तर ते असणार वाढणारी बेरोजगारी.बरेचजण म्हणतील की,इथे जीवांची परवा यांना नाही अन् बेरोजगारीची चिंता करताय पण मृत्यू अन् वास्तव परिस्थिती यांचा विचार केलातर आपण बेरोजगारी या विषयावर येऊनच थांबणार आहोत. कारण पुढील काही काळ जरीही आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करून जनजीवन सुरळीत करुत,परंतु बेरोजगारीमुळे पुढील काळात नैराश्यात जाणाऱ्या वर्गाची संख्या ही खूप मोठी अन् खबरदारी घेणारी असेल.... सद्या देशातील नव्हे तर जगातील सर्वच देशांची अवस्था ही आर्थिक बाबतीत खूप वाईट झालेली आहे.प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्या नामांकित कंपन्या ज्या लाखो लोकांना एकावेळी रोजगार उपलब्ध करून देत असत त्यांनी समोर घोंगावत असलेलं संकट बघून कंपनीतील जवळ जवळ बराच मजूरवर्ग घरी बसवला आहे. यात उच्चपदावर असलेले कंपनीतील अधिकारी वर्ग सुद्धा आहेत,हळूहळू काम पूर्वपदावर येतही आहे परंतु हे सावरण्यासाठी झालेलं नुकसान...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!