गौताळा अभयारण्य... गौताळा अभयारण्यबद्दल यापूर्वी माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे,ट्रेकर्स सज्ज झाले आहे...खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा विषय घेऊन चर्चा होत आहेत तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून माझा हा तुमच्यासाठी माहितीपर लेख लिहण्याचा एक प्रयत्न... त्यानिमित्ताने माझ्या माध्यमातून गौताळा अभयारण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख होईल... तर मित्र/मैत्रणींनो गौताळा अभायरण्य हे मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे अभयारण्य आहे.थोडक्यात या ठिकाणी आल्यावर तुमची कुठलीही निराशा होणार नाही कारण एकाच तालुक्यात तुम्हाला ट्रेकिंग करण्यासाठी खूप मोठे अभयारण्य आहे,अनेक व्हिव पॉइंट,विविधतेने नटलेली वृक्ष,वेली संपदा, धबधबे,धरणे,किल्ले,लेणी अन् विविध दर्शनीय मंदिर हे आपल्याला काही 40 ते 50 किलोमीटर आतील अंतरात बघण्यास मिळेल... येणार कसे - रेल्वेने आलात तर - चाळीसगाव रेल्वस्थानकापासून पुढे बसेसने 20 कि.मी. विमानाने आलात...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!