अलीकडे सांजवेळी जेव्हा सुर्य अस्ताला जात असतो...अन मी वेशीच्या पल्याड असलेल्या पिंपळाच्या झाडाला चहुबाजुंनी बांधलेल्या ओट्यावर बसलेलो,चहुकडं असलेली ती सर्व मोकळीक. दुपारची झोप अजुन डोळ्यात तरळत आहे,हातपाय धूवुन पारावर बसायला आलोय. डोळ्यांच्या पापण्यांची अन बुबुळांची झुकण्यासाठीची तडजोड जाणवत आहे... जसंजसं समोर सर्व दृश्य दिसतंय मन अस्वस्थ होत आहे,या अस्वस्थ होण्याला कारण माहीत नाही. कदाचित शांत असणारा परिसर,गरम झळ्यांतुन अलवार संथ वाहणाऱ्या वाऱ्याकडे होणारा वाऱ्याचाच प्रवास... पिंपळाची पानं स्वच्छ,हिरवीगार दिसताय. लाॅकडाऊनमुळे न झालेलं प्रदुषण आणी टवटवीत झालेली झाडं,वेली,पानं,फुल सुंदरच मांणसाच काय होईल माहिती नाही,पण निसर्गाला लाॅकडाऊन मानवला आहे. सर्व सुंदर वाटत आहे,स्वच्छ निर्मळ वाहणारे वारे झोके घेताय अन् मनाशीच आठवणींचे गुज गात आहे. पण...पण कितीही टाळले तरी डोळ्यांना दिसणारी अस्वस्थता टाळता येणारी नाहीये... मंदिराचे दरवाजे गेले दोन महीने बंदच आहे,कदाचित ती आता पुन्हा पाण्याचे संकट उभे राहिले की,मंदिरातील देव पाण्यात बुडविण्यासाठीच काही काळ उघडी केली जातील असे वाटत आहे....
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!