मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Early Morning...

साधारण साडेपाचची ठरलेली वेळ नेहमीप्रमाणे ऊन असो,पाऊस असो, वारा,थंडी असो पण ही वेळ कधी चुकायची नाही वृत्तपत्र विक्रेत्याला ती कधी चुकतही नाहीच.मुळात या वृत्तपत्र मीडियाशी जोडून असलेले सर्वच निवांत झोप फार कमी घेतात प्रेसवाले सर्व मान्यवर,मित्र परिवार रात्रभर पेपर छापून त्या गरमा गरम पेपरच्या पार्सलला सर्व जिल्ह्यात वितरित करतो हे,वितरित करण्याचं काम अवघ्या चार ते पाच तासात पूर्ण जिल्ह्यात होत असते...  तिथून पुढे जबाबदारी असते ती मग घरोघरी सायकलवर,गाडीवर,स्टॉलवर पेपर विकणाऱ्याची आपल्या वाचकाच्या हातात सकाळच्या गरम-गरम चहासोबत वृत्तपत्र त्याला कसे मिळेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेऊन पहाटेचे हे काम सुरू होते... साडेपाचची वेळ स्वेटर,शूज घालून सायकलला टांग मारायची दोन किलोमीटर नाक्यावर पेपरची काळी-पिवळी गाडी पार्सल घेऊन पावणे सहाच्या दरम्यान येते.माझ्यासारखी अजून पाच-सहा पोरं,आमचा मालक सकाळी सकाळी कुठलाही दांगुडा न करता गाडीमधुन पार्सल काढायचे,व्यवस्थित रचायचे बारा वर्षापूर्वी आठवते जेव्हा सकाळ पेपर एक रुपयाला होता तेव्हा कन्नड शहरात सत्ताविसशे पेपर आम्ही रोज तीन तासात वाटत असायचो

सांजेचा किनारा..!

सांजेचा किनारा..! उतरत्या दुपारच्या सोबतीने उगवत्या सांजेची सोनेरी किरणे डोळ्यात साठवत किनाऱ्याने कितीवेळ चालत राहणे.समुद्रातील खारटपणा वाऱ्याच्या अधून-मधून येणाऱ्या झोताने जाणवायचा तितकाच काही क्षणांपूर्ता अंगाशी आलेला चिडचिडेपणा,विचारांची मनाशी लागलेली तंद्री विभक्त होवुन कितीवेळ त्या सागराला न्याहाळत फक्त अन् फक्त चालत राहणं... हातात काही नाहीये आलेला क्षण अथांग पसरलेल्या किनाऱ्यावर समुद्रातल्या पाण्याने धडकत राहतो,कितीवेळ त्याला न्याहाळणे.परतीच्या पाण्यासोबत माझ्या विचारांचे पुन्हा एकदा समुद्रात निरंतर वाहून जाणे बस इतकेच... सांज ढळून येते,एरवी मनुष्य वस्तीपासून सागर किनाऱ्यावर बसायला एकांत कुठे भेटल शोधत शोधत खूप दूरवर येऊन पोचलेलो असतो,आता मनाचीच खोटी समज घालून एकांत व वाऱ्याचे निवांत वाहणाऱ्या झुळकेचे लोट अनुभवत किनाऱ्यावर मातीत पाय रोवून बसून घेणं. पुढे अथांग सागर आहे,एकांत आहे,वाऱ्याची झुळूक आहे आता मी एकांत शोधतोय.तो भेटल न भेटल पण सागरात कितीवेळ नजर लावून दूरवर नावड्यांचा चालू असलेला मासोळी पकडण्याचा जीवनमरणाचा खेळ अनुभवयास मिळतो आहे... छान आहे एकूण विस्तीर्ण पसर

बाभळीची फुले..!

बाभळीची फुले..! लाल मातीने माखलेल्या रस्त्यावर चालतांना चहुकडे पडलेलं पिवळसर ऊन अंगावर घेत झापझाप पावले टाकत कितीवेळ तो अंत नसलेल्या रस्त्याने अनवाणी पावलांनी चालत आहे... रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी बाभळीची झाडं एखाद्या म्हातारीसारखी मधोमध बाक आल्यासारखी कुबडी झालिये,कोणाला माहित... ऐन तारुण्यात त्यांनी पदार्पण केलं की,आयुष्यातील शेवटच्या क्षणाचे डोहाळे त्यांना लागले आहे म्हणून ऐन पाऊस पडायला अन् त्यांच्या त्या पिवळसर फुलांचा लाल मातीच्या रस्त्यावर सडा पडायला वेळ जुळून येण्याचे हे एक नवीन उदाहरण असावे... कारण आयुष्यात आता बराच बदल झाला आहे आणि कुठलातरी तो बदल जो हवाय जो अपेक्षित आहे तो होतच नाहीये.चलो कुछ ना होने से सहीं यहीं अच्छा है..!  इतकंच काय त्या कुबड्या झालेल्या बाभळीसाठी माझ्या आतून आले बस माझं काय वेगळं..? हा प्रश्न पडला की,त्याला काही नाही इतकेच उत्तर योग्य वाटते... मनाने मनाचे काल्पनिक डोहाळे पुरवून घ्यायला शिकून घ्यावं आता इतकंच काय ते... अनवाणी पायांना क्षणांचा गारवा अन् फुलांच्या पायघडीवर झालेला पायांचा हा सत्कार कमी का काय म्हणून,अजून वेगळे काय ते समाधा

World Space Week...

World Space Week... लहानपणी आपला वावर हा नेहमी दोन विश्वात असतो... एक कल्पनेतील विश्व तर दुसरे प्रत्यक्षात जगत असलेले विश्व,यातील कल्पनेतील विश्व म्हणजे जिथे कुठल्याही मर्यादा नसतात आपल्या मनाला वाटल तिथं आपण फिरून येतो. सेकंदात अवकाशात फिरून येणं असो,एखाद्या दुसऱ्या गृहावर जीवन असेल,ते कसे असेल याची कल्पना करून तेथेही वास्तव्य करून येऊ शकतो,तर कधी हडप्पा संस्कृती,जीवनशैली कशी असेल त्यांची घरे प्रत्यक्षात त्यांच्या काळात जावून बघण्याची सुद्धा कल्पना आपण करतो.एकूण हे कल्पनेतील विश्व खूप मोठ्ठं ज्याला सीमा नाही असे आहे... मग तुम्ही म्हणाल याचा फक्त लहानपणाशीच का संबंध जोडला..? मोठी व्यक्ती नाही करू शकत का ही कल्पना..? तर ती ही करू शकते पण,लहानपणी हे जग फारवेळ सोबत असते,त्याच्या प्रती अनेक प्रश्न आपल्याला आपण पाडून घेत असतो अन् त्याचेच उत्तर स्वतः आपण मिळवून घेत असतो.त्यामुळे कुठेतरी लहानपणीच हे कल्पनेतील विश्व कुठेतरी खूप मोठे भव्य असे वाटते,जितके आपण मोठे झाल्यावर या विश्वात रमत नाही.कारण हे फक्त कल्पनेपूर्ते मर्यादित असते असा आपला भाबडा समज असतो,मग कधीतरी योग्यही वाटते तर क

Industrial City...

#industrialCity. #aurangabadcity. महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये आता लवकरच पुर्णत्वास येणारा प्रकल्प म्हणजेच दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरम यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला 'ऑरिक आधुनिक वसाहत' हा प्रकल्प याची एक नवीन भर पडली आहे...   उद्योग वाढीला,उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला विविध कंपन्यांना औरंगाबाद शहरात एक मोठी स्पेस,प्लेटफाॅर्म उपलब्ध होणार आहे... बरेच नवीन प्रकल्प ऑरीकच्या माध्यमातून समोर येतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार,इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असल्यामुळे औरंगाबादचा औद्योगिक क्षेत्रातील विकास पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल. औरंगाबाद शहर औद्योगिक वसाहतींचे शहर म्हणून जो आलेख रेखाटला गेला आहे तो नियमित उंचावत राहीलेला असेल... 'ऑरिक सिटी' हा केंद्र सरकारचा हा एक

Daughter day...

#windowblinds.. #daughtersday...#special... सांजेचा पडता पाऊस त्याला खूप वेळ विंडोग्रील मधून आपले ते बघत राहणे,हे अनुभवणे गेले काही दिवस खूप खूप आवडायला लागले आहे...कितीवेळ मग खिडकीच्या काचेवर ओघळणाऱ्या थेंबांना टिपत बसायचं,कॉफी मग हातात घेऊन कल्पनेत कुठेतरी स्वार होऊन यायचं,डोळ्यांना मात्र समोर दिसणारं सुखच अनुभवायचं असते... ते टिपत राहतात पडणाऱ्या पावसाच्या सरींना तर कधी मग आपसुकच डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांना... पावसाच्या सरींना सोबत घेऊन दिवसाची होणारी सुरुवात,घरात एकाच वेळी वाढणाऱ्या आजी,आई,नात,यांची पिढी अन् सोबतीला संस्कारी आजोबा,अन् बाबा हे सर्व आहेच पण यांच्या सोयीने,सोयीचं,सवयीचं झालेलं ते घर..! घर घडवते आपल्याला आणि आपल्या सोबत आपल्याच पुढील पिढ्यांना.मग ते भिंतीवर रेघोट्या ओढत काढलेली पहिली बार्बी डॉल असो किंवा आई-बाबा हे सगळं त्या भिंतीवर उमटते,पुढे तारुण्यात मनाचे विस्तारलेले विचार हवीहवीशी ओढ अन् मग या सगळ्यात पावसाच्या साक्षीने आपण घरातील खिडकीच्या कधी प्रेमात पडतो समजत नाही.. कितीवेळ विंडोग्रील मधून तो पाऊस अनुभवणे,मग कधीतरी त्या आकाशी कलरच्या पडद्या आडून घरा

LABOR LAW...

#laborlaw. परवा संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने कित्येकांची औद्योगिक क्षेत्रात रोवलेली पावलं थरथरली असतील,त्यांची स्वप्ने,भविष्यात स्वतःचा आयुष्यासाठी केलेलं नियोजन हे सर्व कंपन्यांवर अवलंबून होते. कुठेतरी कोणी आत्ताच पर्मनंट झालेलं असेल,भविष्याचा विचार करून त्यांनी अनेक आर्थिक उलाढाली केलेल्या असतील,परंतु लाॅकडाऊनच्या काळात कंपन्यांवर आलेलं संकट यांमुळे आधीच बर्याच मजूर वर्गाला,कंत्राटी कामगारांना कंपन्यांतुन कमी करण्यात,बडतर्फ करण्यात आले होते. आता जेव्हा हा असा विधेयक संसदेत मंजूर होत आहे,त्याचा पुर्ण परीणाम हा औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांतील पर्मनंट,कंत्राटी कामगार मजुरांवर होणार आहे.सरकारचे कंपन्यांवर कुठलेही कंट्रोल कायद्यानुसार असणार नाही त्यामुळे बर्याच पर्मनंट मजुरांची,कंत्राटी कामगारांची गोची यामुळे होणार आहे... भविष्यात औद्योगिक क्षेत्र व त्याला जोडून असलेल्या विविध क्षेत्रांवर याचा खूप मोठा परिणाम होईल,बेरोजगारी वाढेल,भारतीय तरुणांची चालू पिढी यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेली असेल... संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने एमआयडीसी विश्वात याचे पडसा

हरवलेला गाव..

हरवलेला गाव...  माझा तो गाव हरला आहे,भर उन्हात दुपारच्याला उंच-उंच दुमजली वाड्यांच्या दगडी भिंतीच्या आडोश्याला सावलीत चालताना भिंतीना गाल लावून जो थंडावा अनुभवला आहे तो हल्ली अनुभवास मिळत नाही. गाव बदलला,गावातल्या वाड्यांची जागा उंच इमारतींनी घेतली... भर दुपारी पारावर बसलेल्या म्हाताऱ्या,म्हातारे आता गावात उरलेच नाही जी उरली बिचारी अंथरुणाला खिळून आपला शेवटचा काळ मोजता आहेत.ओट्यावर,कट्ट्यावर बसायला गावातली सारखी-वारखी पोरंच गावात राहिली नाही,जी आहे ती घरात बसली आहे म्हणून गाव माणसावाचून पोरका झाला आहे. गावातली दुकान बदलली अन् दुकांदरही बदलला दुकानात आता दोंड रुपायची रांगोळी,तिंड रुपयाचं तूप कागदात गुंढळुन नाही भेटत.गावाची रविवारची बंद शाळा कायमची बंद झालेली दिसती,एरवी रोज बंद अवस्थेत असलेली सरकारी दप्तरं मात्र आता रविवारीसुद्धा त्यांच्या शिक्यांची ठाकठूक करत बसलेली असतात.दप्तरातून मोडकळीस आलेल्या खिडकीच्या पल्ल्याड दिसणाऱ्या नदीच्या दृश्याला नजरेत टिपणारा तो साहेब बदली झाला आहे जणू,म्हणून दप्तरात हल्ली जीव लागत नाही. एक ब्येस केलं आहे या काळात दप्तरातील लाकडी कपाट बदलून नवी

#औरंगाबाद शहर आणि औद्योगिक वसाहतीची बदलणारी समीकरणे...

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_वसाहतीची_बदलणारी_समीकरणे. औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे...  औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी व तेथील कंपन्यांचा विचार केला असता... औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि आशिया खंडातील प्रमुख एमआयडीसी विश्वात ज्या एमआयडीसीचे नाव प्रामुख्याने उच्च स्थानावर घेतले जाते,ज्या ठिकाणी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्याचे प्रॉजेक्ट उभारले गेले आहेत अशी शेंद्रा एमआयडीसी तसेच सोबतच आता नव्याने स्थापन झालेली ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झ

धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!

धुक्यांच्या_सवे_Good_Morning...! आठ-सव्वा आठ वाजून गेले आहे,एरवी नेहमीच मॉर्निंगवॉक वरून परत येण्याची वेळ पण अलीकडे सर्वच बंद आहे मग काय गेले काही दिवस खिडकीतून बाहेरचं जग अनुभवायला मिळत तितकेच काय बाहेरच्या जगाशी माझा संबंध येतो...  गेले काही दिवस सकाळी-सकाळी शहरात छान धुकं पडू लागली आहे,त्यामुळे वातावरणात एक वेगळीच हवीहवीशी शांतता पसरलेली असते.शहर पूर्ण शांत झालं आहे,रस्त्यावर म्हणजे तो फक्त रस्ता नाहीये महामार्ग आहे पण त्यावरही क्वचितच एखादी गाडी दिसते,दूरवरून येणारी ती गाडी पिवळ्या रंगाच्या तिच्या उजेडात धुक्यातून वाट काढत काढत तिचा मार्ग शोधत जातेय... काही दिवसांपासून सकाळी पाच वाजता ऐन साखर झोपेच्यावेळी वातावरणात थंडी वाढल्यामुळे गारवा निर्माण होतो,नेहमीची जाग येण्याची माझी ती वेळ असल्यामुळे जाग येऊन जाते...कितीवेळ काय करावे हा विचार करून खिडकीपाशी येऊन बसतो,विंडोग्रिल पूर्णपणे दवाने ओली झालेली असते तिलाच गाल लावून कितीवेळ अंगावर ब्लँकेट घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत बसतो... मूडमध्ये असलो तर कॉफी मग हातात घेऊन हा निसर्ग अन् ती शांतता अनुभवतो,कधीतरी नशीब जोरावर अस

कन्नड शहर आणि निसर्ग सौंदर्य...

#कन्नड_शहर_आणि_निसर्ग_सौंदर्य... कन्नड तालुका म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती हिरवळ...निसर्गसौंदर्य हिरवळीची शाल पांघरलेला हा तालुका निसर्गसंपन्न,इतिहाससिक वास्तू लाभलेला,अभयारण्य असलेला आहे. यापूर्वी मी माझ्या ब्लॉग,विविध दैनिक,साप्ताहिक यांच्या माध्यमातून, बरेच लेखन कन्नड तालुका अन् तालुक्याला लाभलेली नैसर्गिक देणगी,इतिहास याबद्दल केले आहे.ते वेळोवेळी आपल्याला विविध माध्यमांतून देण्याचा प्रयत्नही केला आहे.आज आपण जाणून घेऊया कन्नड शहरातील त्या छोट्याश्या निसर्ग ठिकाणाबद्दल... जसे की आपल्याला औरंगाबाद शहरात असले की गोगा बाबा टेकडी,युनिव्हर्सिटी परिसर,सातारा परिसर आणि असे विविध ठिकाणे मनसोक्तपणे फीरण्यास भुरळ घालतात.अगदी त्याचप्रमाणे कन्नड शहरालाही अनेक टेकड्या,छोटी छोटी डोंगर नैसर्गिक देणगी म्हणुन लाभलेली आहे... त्यातील काही ठिकाण राम मंदिर टेकडी,शिवाजी महाविद्यालय लगत असलेली टेकडी,कारखाना परिसरात असलेले छोटेखानी डोंगर आणि असे खूप खूप ठिकाणं... नजरेला निसर्ग न्याहाळता आला की मग तो कुठेही भेटतो अन् आपण कुठेही त्याचा आनंद घेऊ शकतो,मग त्यासाठी आपल्याला फार फ

कॅनव्हास

#Backspace. कित्येक बॅकस्पेस घेऊन खूप प्रयत्नांनी काहीतरी लिहले आहे खूप वेळा पुन्हा पुन्हा आपणच आपले लिहलेले वाचत राहावे,एकवेळ अशी येते लिहलेले निरर्थक,चुकीचे आहे असे वाटते. मग पुन्हा तेच रिपीट-रिपीट लिहत राहायचं बॅकस्पेस देत राहायचे... विचारांचे गणित जेव्हा जुळत नाहीना तेव्हा ही अवस्था होते,सोप्पे गणिते अवघड होऊन बसतात.स्वप्न सत्यात उत्रवणे जितके अवघड तितकेच विचारांचे गणित जुळवणे आहे. खूप दिवस झाले ऐकलंय तू कॅनव्हासवर काही मुक्तपणे उधळण केली नाहीये,मग वाट कसली बघत आहेस यार उधळून द्यायचे रंग मुक्तपणे,उधळण करून साकारले तर माझी तू विचारी कॅप्चर केलेली छबी त्यावर साकारली जाईल. नाहीतर... मी ऐकलंय ब्लॅकवर व्हाईट छान दिसते,फक्त त्याला किती पसरवायचं हे आपल्याला उमगले पाहिजे मग काळोखातसुद्धा एखादा पांढराशुभ्र तुझा मुखवटा कॅनव्हासवर साकारला जाईल नाही का..? एक सांगू ऐकणार असेल तर... कॅनव्हास दुसरी संधी देतो,पर्याय देतो ज्यात काहीतरी सुंदर साकारले जाते...पण ना..! बॅकस्पेस देऊन केलेलं लेखन फक्त प्रश्न देतं त्याला उत्तरे नसतात,मग पुन्हा पुन्हा तेच वाचायचं तिथच चुकायच,तडफडत राहायचं स्वप्

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_क्षेत्र...

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_क्षेत्र... #भाग_एक. महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर नव्याने ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,काही प्रकल्प काही कारणास्तव येऊ शकली नाहीत. तो भाग वेगळा... या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला... औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि शेंद्रा (एमआयडीसी) ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या.  औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे,परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे

प्रवास निसर्गाच्या सानिध्यात..!

 #प्रवास_निसर्गाच्या_सानिध्यात..! #औरंगाबाद_ते_पालघर... कोकण विभाग आणि त्या बाजुस कोकण विभागास जोडून असलेले काही शहर,गावे म्हणजे स्वर्ग..! कोकण म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवतो तो समुद्रकिनारा,होड्या,माडाची उंच-उंच झाडे,भरघोस पडणारा पाऊस अन् तेथील स्थानिक संस्कृती,पाककला,कोकण किनाऱ्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य,आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे कोकणचा दर्यादील माणूस..! रात्रीच्या साडेबारा वाजता औरंगाबाद येथून सुरू झालेला माझा प्रवास अजूनही चालू होता.सकाळची सहा वाजलेले अजूनही सर्वदूर अंधार त्यात हिवाळा असल्या कारणाने थंडीने रात्रभर कुडकुडत होते...पुन्हा एकदा चहा पिण्यासाठी म्हणून आमची गाडी थांबली अन् आपण कुठे आहोत हे जेव्हा मी मित्राला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, भाई स्वर्गात पोहचलो आहोत..! स्वर्गात म्हणजे नेमके काय..?  म्हणून मी गाडीच्या बाहेर आलो आणि समोर तो आसपास असलेला निसर्ग,उंच-उंच झाडे,धुके अन् या सर्वात समोर काही अंतरावर एका टपरीमध्ये चुलीवर तयार होणारा चहा मला दिसला.रस्त्यावर चहुकडे धुके आणि या धुक्यात मला फक्त ती एक छोटीशी चहाची टपरी अन् आमची गाडी याशिवाय कोणी

#HashtagMe...

 #HashtagMe... कधीतरी काळोख आपलासा वाटतो,कॅनव्हासवर अधुरे राहीलेले चित्र पूर्ण झालेल्या चित्रापेक्षा आवडू लागते...गवंड्याकडून प्रोपर सोयीची करून घेतलेली माझी बेडरूम मला आवडत नाही,फर्निचरवाल्याकडून कित्येक डिझाइन बघुन सलेक्ट केलेलं काचेच बुकशेल्फ नकोसं वाटतं त्यातील कोऱ्या करकरीत एकही पान न दुमडलेल्या कित्येक कादंबऱ्या मला नकोश्या वाटतात.... आपल्या सभोवताली असलेल्या या रोजच्या वापरात,हाताळण्यात येणाऱ्या वस्तूंचे किती झालो असतो नाही का आपण..?  कधीतरी त्याही आपल्याला जेव्हा नकोश्या वाटू लागतात तेव्हा मात्र समजून जायचे आपल्या आत असलेलं नैराश्य हे वाढत आहे... एकवेळ असते आपण आपल्याच माणसांना इग्नोर करू लागतो कारण काहीच नसते एकांत,आपली हवी असणारी उत्तरे जी इतरांकडे नसतात.मनाची लहान बाळासारखी खोटी समज घालायची अन् अपेक्षित उत्तर भेटले आहे आपल्याला आपल्याकडूनच म्हणून तितक्यावेळ डोळ्यातील पाण्याला सावरत बसायचं... समाधान झालेलं नसते खूप अती झालंय असे वाटू लागले की,ही आपली माणसे आपोआप आपण सोडून देतो.आपली बेडरूम आपल्याला प्रिय वाटायला लागते,बुकशेल्फ मधील कादंबऱ्या वाचून संपू लागतात पण हे

छोटे सरकार अन् त्यांची सवंगडी...

कथा-छोटे सरकार अन् त्याची सवंगडी... भाग-एक ते दहा. सूर्योदय केव्हाच झाला होता,चुलीवरच पाणी इसन घेण्या इतपत तापलं होतं. मायची अंघोळ झाली अन् मायनं मधल्या घरातून आवाज दिला,छोटे सरकार उठ की...!आता बकऱ्याच दूध काढायचं हायसा,बकऱ्या घेऊन रानात जायचं हायसा..! उठ रं लेका,चंल उठ..! गोड गुणाचं हाय माझं ते लेकरू उठ चल...! आवर बिगी.. बीगी..! मला बी जयवंता काकुच्या वावरात सरकी निंदाया जायचं हाय..! मोहरच्या घरात राच्या भांड्याचा गराडा पडला हायसा..! मायचं बोलणं ऐकुन तावा-तावात मी ताडकन अंगावरची गोधडी पायाने लोटून देत उठलो... परसदरच्या चुल्हंगणावर ठेवलेलं गरम पाण्याचे घमीलं मोरीत आणून पितळीच्या बादलीत टाकलं.पाच मिनिटात पाणी तांब्यानी साऱ्या अंगावर घेऊन अंघोळ केली अन् मधल्या घरात कपडे बदलून मायकडे गेलो ... मायनं चुलीवर कोरा चहा ठेवला होता अन् तो पार उकळून उकळून साऱ्या घरात त्याचा उकळायचा सुगंध पसरला... मी कंगव्याने मोठे झालेल्या केसांचा भांग पाडत मायकडे कप,बशी,चाळणी घेऊन गेलो,आये मला बटर खायचे दोंड रुपये दे..! आईला पैसे मागितले, माय हसत हसत मला म्हणाली, छोटे सरकार..तुम्ही मोठे झ