बाभळीची फुले..!
लाल मातीने माखलेल्या रस्त्यावर चालतांना चहुकडे पडलेलं पिवळसर ऊन अंगावर घेत झापझाप पावले टाकत कितीवेळ तो अंत नसलेल्या रस्त्याने अनवाणी पावलांनी चालत आहे...
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी बाभळीची झाडं एखाद्या म्हातारीसारखी मधोमध बाक आल्यासारखी कुबडी झालिये,कोणाला माहित...
ऐन तारुण्यात त्यांनी पदार्पण केलं की,आयुष्यातील शेवटच्या क्षणाचे डोहाळे त्यांना लागले आहे म्हणून ऐन पाऊस पडायला अन् त्यांच्या त्या पिवळसर फुलांचा लाल मातीच्या रस्त्यावर सडा पडायला वेळ जुळून येण्याचे हे एक नवीन उदाहरण असावे...
कारण आयुष्यात आता बराच बदल झाला आहे आणि कुठलातरी तो बदल जो हवाय जो अपेक्षित आहे तो होतच नाहीये.चलो कुछ ना होने से सहीं यहीं अच्छा है..!
इतकंच काय त्या कुबड्या झालेल्या बाभळीसाठी माझ्या आतून आले बस माझं काय वेगळं..?
हा प्रश्न पडला की,त्याला काही नाही इतकेच उत्तर योग्य वाटते...
मनाने मनाचे काल्पनिक डोहाळे पुरवून घ्यायला शिकून घ्यावं आता इतकंच काय ते...
अनवाणी पायांना क्षणांचा गारवा अन् फुलांच्या पायघडीवर झालेला पायांचा हा सत्कार कमी का काय म्हणून,अजून वेगळे काय ते समाधान हवेय.समाधान,खुशी,सुख,दुःख ही या अश्या क्षणिक गोष्टीत शोधून घ्यायचं इतकंच काय ते....
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बाभळी जश्या सरत जातील तशी पायाला जाणवणारी रस्त्यावरील गर्मीची धगधग अजून अजून वाढत जाणार आहे बघू पुढं अजून काय सहन करायचं आहे तुर्तास बरं...
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा