#industrialCity.
#aurangabadcity.
महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला आहे.
त्यामध्ये आता लवकरच पुर्णत्वास येणारा प्रकल्प म्हणजेच दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरम यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला 'ऑरिक आधुनिक वसाहत' हा प्रकल्प याची एक नवीन भर पडली आहे...
उद्योग वाढीला,उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला विविध कंपन्यांना औरंगाबाद शहरात एक मोठी स्पेस,प्लेटफाॅर्म उपलब्ध होणार आहे...
बरेच नवीन प्रकल्प ऑरीकच्या माध्यमातून समोर येतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार,इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असल्यामुळे औरंगाबादचा औद्योगिक क्षेत्रातील विकास पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल.
औरंगाबाद शहर औद्योगिक वसाहतींचे शहर म्हणून जो आलेख रेखाटला गेला आहे तो नियमित उंचावत राहीलेला असेल...
'ऑरिक सिटी' हा केंद्र सरकारचा हा एक महात्वाकांशी प्रकल्प असून,देशातील स्मार्ट औद्योगिक वसाहतीमध्ये ऑरीक सिटी आणि संबंधित औद्योगिक समुहांचे प्रामुख्याने यामध्ये नाव घेतली जातील.
जपान सरकारच्या सहकार्याने भारतात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात विकास,अतिउच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे लक्ष आहे जे पुर्णपणे पुर्णत्वास आले आहे.
औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली 'ऑरीक' ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्माणाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे.
परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...
औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असलेल्या कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो...
औरंगाबाद शहर आणि सभोवतालच्या परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी,चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोडला जोडून असलेली एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि शेंद्रा एमआयडीसी,ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती,एमआयडीसी आहेत...
पुढील लेखमध्ये औरंगाबाद शहरातील नामांकित कंपन्या ज्यांच्यामुळे औरंगाबाद शहराला "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी"ही नवीन ओळख मिळाली त्या कंपन्यांची संक्षिप्त रूपात माहिती देण्याचा प्रयत्न असेल...
Bharat Sonwane.
MBA-(production & operation).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा