#कन्नड_शहर_आणि_निसर्ग_सौंदर्य... कन्नड तालुका म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती हिरवळ...निसर्गसौंदर्य हिरवळीची शाल पांघरलेला हा तालुका निसर्गसंपन्न,इतिहाससिक वास्तू लाभलेला,अभयारण्य असलेला आहे. यापूर्वी मी माझ्या ब्लॉग,विविध दैनिक,साप्ताहिक यांच्या माध्यमातून, बरेच लेखन कन्नड तालुका अन् तालुक्याला लाभलेली नैसर्गिक देणगी,इतिहास याबद्दल केले आहे.ते वेळोवेळी आपल्याला विविध माध्यमांतून देण्याचा प्रयत्नही केला आहे.आज आपण जाणून घेऊया कन्नड शहरातील त्या छोट्याश्या निसर्ग ठिकाणाबद्दल... जसे की आपल्याला औरंगाबाद शहरात असले की गोगा बाबा टेकडी,युनिव्हर्सिटी परिसर,सातारा परिसर आणि असे विविध ठिकाणे मनसोक्तपणे फीरण्यास भुरळ घालतात.अगदी त्याचप्रमाणे कन्नड शहरालाही अनेक टेकड्या,छोटी छोटी डोंगर नैसर्गिक देणगी म्हणुन लाभलेली आहे... त्यातील काही ठिकाण राम मंदिर टेकडी,शिवाजी महाविद्यालय लगत असलेली टेकडी,कारखाना परिसरात असलेले छोटेखानी डोंगर आणि असे खूप खूप ठिकाणं... नजरेला निसर्ग न्याहाळता आला की मग तो कुठेही भेटतो अन् आपण कुठेही त्याचा आनंद घेऊ शकतो,मग त्यासाठी आपल्याला फार फ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!