मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुगीचे दिस भाग -१

सुगीचे दिस भाग -१ सूर्य अस्ताला गेला तसे गाव, रानात दिवस मावळतीला आला. अंधार पडायच्या आत शेतातून घराकडे जायची ओढ लागली. ढोरांना हौदावर पाणी पाजून, वैरण टाकून, गोठ्यात बांधली. गायीचे दूध वासराला पाजून,काही सांच्या चहाला म्हणून केटलीत काढून घेतलं. हातपाय धुवून वावरातले कापडंबदलून तो विष्णू म्हातार बाबा घराच्या दिशेनं निघाला होता. अंगात इरलेला सदरा, चार ठीकाणी ठीगळं दिलेल धोतर घालून तो उरे दिवस पुरे करत होता. वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढत होता, त्याला नको होत सुटर अंगाला की नाही वाजली त्याला कधी थंडी. हा पण हल्ली दिसायला कमी झालं होतं विष्णू म्हातार बाबाला की काय म्हणुन लेकानं शहरातल्या सरकारी दावखण्यातून त्याला एक चष्मा आणला होता. विष्णू म्हातार बाबा त्याला जीवापाड जपत होते, गळ्यात तुळशी माळ अन् आता उतारवयात त्या तुळशी माळेच्या सोबत ही या चष्म्याची सुतळी होती. विष्णू म्हातार बाबा त्याचा तो निघला होता सावकाश केटलीला हातात घेऊन, मी न्याहाळत राहिलो दूरपर्यंत जास्तोवर त्याला. मी पण निघणारच होतो आता इतक्यात पण; आता कुठं बोर पिकली होती, मग गेलो बोरं खायला. अजून म्हणा तशी बोरं पिकली नव

गावची उतारवयातली माणसं..! भाग १-६

गावची उतारवयातली माणसं..! भाग १-६ दहाच्या सुमारास कर्ते मंडळी गावातल्या मुख्य पेठेतून घरी येणं, न्याहारी करून वावरात रोजच्या कामाला जाणं, मजुरी करायला जाणं. अकरा वाजता गाव पूर्ण सामसूम होतो रात्रीची शांतता जशी भासते तशी ही शांतता असते. गावातल्या प्रत्येक मोकळ्या गल्लीत वाहत राहणारा तो कोरडा, शुष्क वारा ओट्यावर बसलेल्या म्हाताऱ्यांना आधार असतो. झुंबरआई दाळी-साळी सुपात घेऊन दळण करत बसलेल्या, त्यांच्या सोबतीला चार म्हाताऱ्या त्यांच्या जीवनाचा सारीपाट सांगत धान्य निवडत बसलेल्या असतात. या सगळ्यात कधी कोणाच्या शब्दाची जोड नाही भेटली तर एकट्यात ओव्यांशी जुळवून घेणं झुंबरआईचं चालू असते,पूर्वीची प्रत्येक स्त्री एक छान कवयित्री होती तिला ही देणगी पिढीजात भेटत असायची पण काळ बदलत गेला अन् ओवी संपत गेली. गावात त्या पिढीच्या दोनचार म्हाताऱ्या आहे झुंबरआई, झोल्याआई, विठाई, किस्नाई, मुसलमान मोहल्यातील इस्मत आपा. तिच्या ओव्या तर जिव्हारी लागतात तिला पांडुरंगाचं भलते वेड दिवसातून पाच वेळ नमाज पडून इस्मत आपा दोन टाईम विठ्ठल रखमाईच्या देवळात दिवाबत्ती करती तिचं हे विठू माऊलीच्या भक्तीचं वेड साऱ्या गावाला

सुगीचे दिस..! भाग - ७

सुगीचे दिस..! भाग - ७ भोळ्या राजू त्याची कपडे अन् त्याची बासनं धुवून, झुळक्या बावडीतून पाणी काढून घमील्यात ओतून गुरांना दाखवीत होता. सोबतच पाटलांशी कामाच्या बाबतीत बोलत होता, पाटील त्याला प्रश्न करत अन् तो दोन- चार शब्दात पाटलांच्या प्रश्नांचे उत्तर देत असे. एरवी भोळ्या राजू फार बडबड्या साऱ्या गावाला बोलून गाभण करेल इतका बडबड करत असे. बरं त्याला बोलायला कुठले विषय शोधायची गरज नसे की, कुणी मित्र शोधायचीही गरज नसे. चालत्या बोलत्या अनोळखी वाटेवर चालणाऱ्या माणसांशी लगट करून तो बोलत असे. त्याचा भोळसर चेहरा बघून मग गावच्या वाटेला जाणारे लोकंही थांबून मग त्याच्याशी दोन-चार गोष्टी करून घेत असे. गप्पा करायला कुणी नाहीच भेटलं तर मग तो हनुमान देवाच्या मंदिराला असलेल्या ओट्यावर जाऊन बसे अन् मोठ्यानं हनुमान चालीसा घोकीत असे. दोन-चार अक्षरंही धड न येणारा भोळ्या राजू हनुमान चालीसा तर इतकी सुंदर म्हणत असे की, लोकं त्याच्या तोंडाकडे बघून हा काहीतरी दैवी चमत्कार आहे असं समजत. पण; त्याला हनुमान भक्तीचे खूप वेड होते, त्याला वाटायचं माझी ही प्रामाणिक भक्ती कधीतरी फळाला येईल अन् माझी सर्व प्रश्न नकळत सुटत ज

सुगीचे दिस..! भाग - ६

सुगीचे दिस..! भाग - ६ झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्यावर येऊन आम्ही भाकरी खाण्यासाठी येऊन बसलो. मायना केलेलं भरले वांगे अन् भाकर बघून मला कधी एकदा बासनात भाकर,कोड्यास घेतो अन् खाता होतो असं झालं होतं. भुकीने पोटात कावळे ओरडत होते, त्यात भोळ्या राजूने भाकरी संगतीने तोंडाला लावायला म्हणून काल गावच्या देवऋष्या धनगराच्या पोरीच्या लग्नाला गावभरच्या पंगतीसाठी देवऋष्या धनगराने केलेली बुंदी भोळ्या राजुने आजही आता भाकरीसोबत खाण्यासाठी आणलेली होती. त्यामुळे आज एकूणच भाकरी खायला मज्जा येणार होती. इस्माईलच्या मायने बोंबलाची खुडी अन् बाजरीची भाकर अन् लोणच्याची चिरी छोट्या बाटलीत आणली होती. तर शांता मामीने तव्यावर केलेलं जाड पिठलं भाकरी फडक्यात बांधून आणली होती. इस्माईलने अन् मी डब्याच्या एका झाकनात भाजी अन् बोंबलाची खूडी घेऊन भाकरीला हातात घेऊन खायला सुरू केलं. माय शांता मामी अन् इस्माईलची माय तिघीसुद्धा भाकरी खायला बसल्या. भोळ्या राजूने एका केळीत पाणी भरून घेतले अन् त्याची भाकर डांगराची भाजी घेऊन तो ही आमच्या वर्तुळात भाकर खायला येऊन बसला . घास-दोन घास खाल्ले की पाणी पीत मी अन् इस्माईलने पाणी पि

सुगीचे दिस..! भाग - ५

सुगीचे दिस..! भाग - ५ दूध घालून झालं तसं, भोळ्या राजू दिनकर आबांच्या टपरीवर जाऊन तासभर बसायचा. मग गावभरच्या गप्पा टपरीवर व्हायच्या अन्; पाच पैश्यात दोन बिड्या घेऊन भोळ्या राजू त्या शिलगवून खडकावर उक्खड बसून त्या तिथं ओढीत बसायचा . भोळ्या राजू जेव्हा बिडी शीलगुन प्यायचा अन् त्याचा धूर जेव्हा तो सोडायचा तेव्हा बुटका राजू त्या धुरात हरवून जायचा. मग तलफ लागल्यासारखे भोळ्या राजू त्या दोन्ही बिड्या फुकीत फुकित पिऊन घ्यायचा. बिडी पिऊन झालं की दिनकर आबांच्या टपरीला रामराम करून पुन्हा पाच पैश्यात दुपारच्या साठी दोन बिड्या घेऊन त्यांना कोपरीच्या खिश्यात टाकून तो हनुमानच्या देउळ कडे जायचा.देऊळामध्ये हनुमानाचे दर्शन घेऊन तो मोठ्यानं हनुमान चालीसा म्हणायचा अन् डोळे लाऊन दहा-पाच मिनिटं देऊळमध्ये बसून चिंतन करत बसायचा.  मग आरती झाली की शिळणीचा प्रसाद वाटून द्यायचा सगळ्या लोकांना. पाटलांच्या वाड्यावर जाऊन भाकरीचा भुगा खाऊन घेत न्याहारीचा डब्बा घेऊन साऱ्या पांदीने गाणे म्हणत तो पायीच वावरात यायचा. वावरात आला की पुन्हा ढोरगुरांना चारापाणी करून रोजची कामं करायला लागायचा. रोजंदारीवर बायका आल्या की त्यांना

सुगीचे दिस..! भाग - ४

सुगीचे दिस..! भाग - ४ शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय फार पुढं गेली की आम्ही ती बुडूखं खांद्यावर घ्यायचो अन् पळत सुटायचो. पाटलांचे वावर मोघम दूर असल्यानं लच्ची आईच्या वावराजवळ आम्ही आलो की, तिच्या केळीत तिनं भरून ठेवलेलं पाणी आम्ही पोटभर पिऊन घ्यायचो. पुन्हा पाटलाच्या वावराच्या वाटा जवळ करायचो. इतक्या लवकर पाटील कसला येतोय शेतात म्हणून माय लच्ची आईच्या केळीतून शिशी भर पाणी भरून घ्यायची. कारण इस्माईल अन् मला का तरळ भरली तर आम्ही काम न करता जीवावर येतं म्हणून भटकत बसायचो. हे शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय जाणून असल्यानं ती असं उक्त्याच्या कामाला आम्ही सोबत येणार असलो की शीशी भरून घ्यायची. मजल दर मजल करत रानाच्या रानवाटा भटकत, अख्ख्या पायवाटेच्या धुळीशी खेळून झालं की आम्ही एकदाचं पाटलाच्या वावरात पोहचायचो. वावरात गेलं दहा - पाच मिनिटं आम्ही पाटलाच्या वावरात असलेल्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाच्या पडसावलीत बसून आराम करायचो. मग पाटलाच्या तिथं सालाने असलेला भोळ्या राजू आम्हाला चरवीत पाणी आणायचा अन् मग पाणी पिऊन आम्ही कामाला लागायचो. मग कांदे काढायला म्हणून आम्ही सऱ्या वाटून घ

सुगीचे दिस..! भाग - ३

सुगीचे दिस..! भाग - ३  रात सरली तसं पहाटे पाचच्या ठोक्याला नेहमीपेक्षा लवकरच माय उठून अंगण झाडून शेणाने तिनं सारवून घेतलं. चुल्हीला पोचारायला गावच्या मधोमध असलेल्या जनाईच्या पांढऱ्या मातीच्या मढीला कोरून काही डेपूड घेऊन आली. अन् त्यांना जोत्याच्या एका पोत्यात ठेऊन दिलं अन् काही डेपूडचा भुगा करून, त्यात पाणी ओतून मायनं चुल्हील पोचारून घेतलं. जोत्याच्या पोत्यात ठेवलेला बाकी डेपूड मायनं माझ्यापासुन लपून कावडाच्या मागे लपून ठेवला. कारण मला माहीत झालं की, मी वेड्याखुळ्या येताजाता मायची नजर चुकवून तो डेपूडच मूठ मूठ काढून खात बसलो असतो. त्याची कोरट माती खायला खूप कोरट अन् हवीहवीशी वाटते म्हणून मी किती मोठी माती खाऊन घ्यायचो. पण बरसदीच्या दिवसांत एकदा एकाकी माझं पोट दुखायला लागलं अन् डॉक्टरकडे मला नेलं. तेव्हा डॉक्टरांना मी खरं सांगितलं मी माती खातो असं तेव्हा त्यांनी मला खूप बोल लावले अन् मग सात इंजेक्शन मला देणार म्हणून तिथेच गडबडा लोळत मोठ्यानं भोकाड पसरून मी रडायला लागलो. मायच्या कुशीत जाऊन रडायला लागलो. काही दिवस ही मातड खायची सवय सुटली पण; नंतर पुन्हा जैसे थे. पांढऱ्या मातीचा डेपूड दिस

सुगीचे दिस..! भाग- २

सुगीचे दिस..! भाग- २ सांज सरली भाकर खाऊन झाली तसं मी अंगावर रग घेऊन खाटेवर पडलो होतो अंगणात न्याहाळत ये-जा करणाऱ्या वाटसरूंना. आज शेतात जरा जास्तच काम झालं असल्याने पाय खूप दुखायला लागले होते. इतक्यात मागे भेटलेल विष्णू म्हातारं बाबा मला पुन्हा दिसलं. मी राहूनच त्याला आवाज दिला ये बाबा कुट निघालासा थंडीवाऱ्यात..? त्यानं हातानं खूनवलं सावत्या माळ्याच्या देवळात जातोय असं..! झोप काय येत नव्हती, कितीवेळ आकाशात तार्यांना पाहत बसलो, अंगात हुडहुडी भरून आली. तसं अंगात सुटर घालून गल्लीत पोरांनी शेकोटी पेटीली हुती तिथं मी जाऊन बसलो. गावकुसाच्या सतरा लोकांच्या, सतरा विषयांच्या सतरा गोष्टी तिथं चालू होत्या. मी काहीवेळ थांबलो अन् पुन्हा झोपेने डोळे लागायला लागले तसे घराच्या दिशेने आलो. सारी मुलं घराच्या वाटा जवळ करून घरी झोपायला निघून गेली होती. ज्या तरण्या पोरांची आज मंदिर राखायची पाळी होती, ती पोरं मंदीर राखायला म्हणून मंदिराच्या चहूबाजूंनी असलेल्या ओट्यावर बसून हातात तंबाखू घेऊन तिला चोळीत गप्पा झोडीत बसली होती. संत्या, रामू, जगण्या यांच्या गप्पा तर विझून गेलेल्या शेकोटी पुढे फतकल मारून बसून निव