#HashtagMe... कधीतरी काळोख आपलासा वाटतो,कॅनव्हासवर अधुरे राहीलेले चित्र पूर्ण झालेल्या चित्रापेक्षा आवडू लागते...गवंड्याकडून प्रोपर सोयीची करून घेतलेली माझी बेडरूम मला आवडत नाही,फर्निचरवाल्याकडून कित्येक डिझाइन बघुन सलेक्ट केलेलं काचेच बुकशेल्फ नकोसं वाटतं त्यातील कोऱ्या करकरीत एकही पान न दुमडलेल्या कित्येक कादंबऱ्या मला नकोश्या वाटतात.... आपल्या सभोवताली असलेल्या या रोजच्या वापरात,हाताळण्यात येणाऱ्या वस्तूंचे किती झालो असतो नाही का आपण..? कधीतरी त्याही आपल्याला जेव्हा नकोश्या वाटू लागतात तेव्हा मात्र समजून जायचे आपल्या आत असलेलं नैराश्य हे वाढत आहे... एकवेळ असते आपण आपल्याच माणसांना इग्नोर करू लागतो कारण काहीच नसते एकांत,आपली हवी असणारी उत्तरे जी इतरांकडे नसतात.मनाची लहान बाळासारखी खोटी समज घालायची अन् अपेक्षित उत्तर भेटले आहे आपल्याला आपल्याकडूनच म्हणून तितक्यावेळ डोळ्यातील पाण्याला सावरत बसायचं... समाधान झालेलं नसते खूप अती झालंय असे वाटू लागले की,ही आपली माणसे आपोआप आपण सोडून देतो.आपली बेडरूम आपल्याला प्रिय वाटायला लागते,बुकशेल्फ मधील कादंबऱ्या वाचून संपू लाग...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!