हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर... सांजेच्या प्रहरी रामाबाबा आपली बैलगाडी अन् दुधाची क्याटली घेऊन वावरातून निघाला,रस्त्यात गुरांसाठी काढून ठेवलेला हिरवा घास,मक्काची बारीक केलेली कुट्टी घेऊन तो ती बैलगाडीत टाकून तो रस्त्याला लागला. रस्त्यात सुमनबाई,शैली अन् सुमनबाईची नवी सूनबाई त्याला दिसल्या त्यांनाही त्याने बैलगाडीत बसवुन घेतले... रस्त्यात चहूकडे बैलांच्या खुराने उडणारी धूळ,त्यात लालभडक दिसणारा मावळता सुर्य मी बघत होतो...पायी चालत असल्याने एरवी रामाबाबा माझ्यापुढे निघून गेला हुता. बोडक्या टेकडीवर भिलाबाबाच्या दावणीला असलेल्या बक्र्या म्या... म्या... करीत ओरडत होत्या,भिलाबाबा तांब्या घेऊन बकरीचं दूध काढत बसला होता,मला बघून त्यानं शीळ फुंकली अन् मला त्याच्याकडे यायला खुणावू लागला मी हातवारे करून सांगितले येतुया... मी ठोकरा खात कसातरी भिलाबाबाच्या झोपडी पर्यंत पोचलो,अंगणात उभी केलेली खाट त्याने आडवी केली व मला बसायला लावले,मी बसलो...त्याने त्याच्या लेकीला राणुबाईला बकरीच्या दुधाची तीन कप चहा ठेवायला सांगितली अन् तो बकऱ्या बांधू लागला व मला बोलूही लागला... मग काय छोटे सरकार आज...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!