उरल्या दोन घटकांच्या सुखाचा हिशेब आहे तो, मी मांडत नाही हल्ली दोन सुखाच्या घटकांचा हिशोब तो..! कधीतरी भर उन्हात पाय भाजून निघायचे पण,बकरीच्या पिलाला पाणी पाजण्याचा दोन आनंदी घटकांचा हिसेब आहे तो..! कधीतरी अनवाणी चालणाऱ्या म्हातारीला वाट सरुस्तोवर दिलेल्या,वाहनांचा दोन घटकांचा हीशेब आहे तो..! कधीतरी भरल्या देवळात माझ्या रिकाम्या झोळीला घेऊन,देवासमोर भिक मांगतांनाचा दोन घटकांचा हिशेब आहे तो..! कधीतरी सांजवेळी देव्हाऱ्यात दिवा लावताना, वातीच्या जळण्याचा दोन घटकांचा हीशेब आहे तो..! रितेपणाच्या ओंजळीत कल्पनेतील पडणाय्रा गुलमोहरांच्या फुलांच्या,आनंदी क्षणांचा दोन घटकांचा हिशेब आहे तो..! कधीतरी आईच्या पायाशी वंदन करण्या झुकता, तेहतीस कोटी देव दिसतात, तेव्हा त्या दोन घटकांचा हिशेब आहे तो..! अन् अन् शेवट आठवणीत बापाच्या आसवांच्या फुटलेल्या बांधास सावरतांनाचा त्या दोन घटकांचा हिशेब आहे तो..! उरल्या दोन घटकांच्या सुखाचा हिशेब आहे तो, मी मांडत नाही हल्ली दोन सुखाच्या घटकांचा हिशोब तो..! नांव:भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र). Email:bs7880544@gmail.com मु.पो:कन्नड जि:औरंगाबाद....
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!