#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_क्षेत्र... #भाग_एक. महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर नव्याने ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,काही प्रकल्प काही कारणास्तव येऊ शकली नाहीत. तो भाग वेगळा... या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला... औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि शेंद्रा (एमआयडीसी) ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे,परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!