मुख्य सामग्रीवर वगळा

Aspirantsमित्रमैत्रिणभेटगप्पाचहा...

सांज ढळायला होती अन् अस्ताला जाणारा सूर्य शहराच्या उंच उंच इमारती टिपत अंधाराशी एकरूप होत होता. शहरातील ऑफिसेस सुटले होते पॉश वस्तीतील पॉश लोकं त्यांच्या पॉश गाड्या घेऊन त्यांच्या घराची वाट जवळ करत होते. शहरातील प्रत्येक सिग्नल गर्दीने भरून गेलेला होता. माणसांची रेलचेल अन् वाहनांचा आवाज या सगळ्या घाई गर्दीत शहर हरवून गेलं होतं. 

रमजानची नमाज अदा होत होती. आठ दिवसांवर रमजान ईदच्या सांजेला आकाशात चंद्रकोर दिसली की रमजानची सांगता होणार होती. सांजेची अजाण झाली तसं दूरवरून येणारी हुजुर साहिब डोळ्यांच्या टप्प्यात आली. ग्रीन सिग्नल लाल, लाल सिग्नल ग्रीन झाले ट्रेन औरंगाबादेच्या रेल्वे स्टेशनवर नांदेड जाणाऱ्या माणसांना घेण्यासाठी थांबली.

अस्ताला जाणारा सूर्य एरवी काळोख दाटल्या आकाशात हरवून गेला होता. माणसं ट्रेनमधून उतरत होती, कुणी ट्रेनमध्ये चढत होती. दहापाच मिनिटांच्या थांब्यानंतर ट्रेन पुढे नांदेडच्या दिशेनं डिपार्ट झाली. चहा अन् क्रीमरोल घेऊन आम्ही दोघेही बराचवेळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर आम्ही बसून राहिलो. दोघांना अस्ताला जाणारा सूर्य रेल्वे स्टेशनमधून बघायला आवडतं म्हणून दोघांचं आठ–दहा दिवसांत इथे येणं ठरलेलं असतं.

आता रेल्वे स्टेशनवरून Exit घेऊन आम्ही बाहेर आलो होतो. जायकाचा Self Service वाला चहा दोघांची वाट बघत होता. मागच्या आठवड्यात इथेच कट्ट्यावर बसून बॅचलर मुलांची सध्या झालेली अवस्था ती मला सांगत होती, मी ऐकत होतो.
जगभरात युद्धाचे असलेले सावट आणि युद्धाचे वारे वाहू लागले होते. त्यामूळे निर्माण झालेली गॅस टंचाई. बंद झालेल्या कित्येक मेस १० रुपयांची १२ रुपयांना झालेली चहा, १५ रुपयांचे २० रुपयांना झालेले पोहे या सगळ्यांची गणितं जुळवत आम्ही एकमेकांचे होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आमच्यासारख्या तरुण मुलांच्या आयुष्याची गणितं जुळवत बसलो होतो.

दोघे तरूण मित्र रोमँटिक गप्पांना भुलवून कधी युद्ध, माझी दोन वेळचे पोट भरेल अशी जेमतेम नोकरी, राजकारण, महागाई, Prelims,Mains, Psi Results, तिची सुरू असलेली JMFC ची तयारी, मैत्रिणीचे PSI साठी झालेले Selection अश्या अनेक विषयांवर गप्पा करत बसलो होतो.

तुझं विचारांनी प्रॅक्टिकल असणं मी गप्पा करत तुझ्या डोळ्यात बघत बसलो होतो. तुला थोड्या थोड्या मार्क्सने यश हुलकावणी देत होते, तुझ्या आयुष्याला लवकरच पूर्णत्व प्राप्त होणार होतं. पण;  कधीतरी थोडक्यात राहून गेलेला तुझा रिझल्ट अन् तुझं तुटत जाणारं मन बघितलं की असं अधूनमधून तुझ्या भेटील येणं व्हायचं.

कसली अपेक्षा नव्हती की कुठलं नातंही बस तुझा संघर्ष जवळून बघितला होता, यश मिळत नाही तोवर Give up करायचं नाहीये हे सांगण्यासाठी असं येणं व्हायचं. तुझ्या गप्पा तुझी स्वप्नं आयुष्याला आयुष्य जगण्यासाठी तू आखून ठेवलेली परिमाणं बघितली की तुझं मैत्रीत असणं हवं वाटायचं.

सांज सरल्या सर्व शहर विकासात हरवून गेलं होतं. तुझ्या माझ्यासारखी पोरं हरवून बसलेल्या विकासाच्या गप्पा करत कट्ट्यावर बसली होती. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांचे विषय पृथ्वीवरून चंद्र आणि जगातील युद्धजन्य परिस्थिती, लाल दिव्याची गाडी, वर्दी, एपस्टीन फाईल अश्या अनेक विषयांवर चर्चा घसरली होती. आजच्या भेटीत मला तुझ्यासाठी अस्वस्थ वाटत होतं. पण; भेट झाली वाऱ्याच्या झुळकेत तुझ्या विचारांचा, तुझ्या गप्पांचा मी होत गेलो अन् तुझी काळजी करणारे माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे मला भेटत गेली.

एरवी रात्रीचे साडेआठ वाजले होते. मेस बंद होईल म्हणून जेवायला जायचं होतं. दोघांनी एकमेकांच्या हाताला ओझरता स्पर्श करत एकमेकांना नजरेत सावरले अन् पुढच्या भेटीसाठी एकमेकांचे निरोप घेतले. तुझ्या डोळ्यात भेटण्याची खुशी होती. अन् माझ्या डोळ्यात तुझं यशस्वी होणं डोळ्यांनी वाट्याला दिलं होतं. मन हायसं झालं होतं. पुढे कित्येक दिवस ना कॉल, ना मॅसेज, ना बोलणं ना काही कारण आयुष्याची गणितं जुळवायची होती.

पुन्हा भेटू म्हणून TTMM करायचं ठरवलं पण ; यावेळी मी पुढच्या वेळी तू अशी गणितं केली आणि गर्दीचे होऊन आम्ही गर्दीत हरवून गेलो. सामान्य माणसांसारखं सामान्य होऊन.

#Aspirantsमित्रमैत्रिणभेटगप्पाचहा...

Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...