#सखाराम_बाईंडर... सध्याच्या या लाॅकडाऊनच्या काळात अनेक चित्रपट,नाटक बघत घेत आहे,ज्यांना इतरवेळी वेळे अभावी बघायला जमत नाही... नाटकं मला फार आवडत नाही,म्हणजे "लक्ष्मण देशपांडे" यांचे "वऱ्हाड चालले लंडनला" नाटका नंतर मी आजवर पूर्ण नाटक कुठलेच बघितले नाही...हे नाटक मात्र याला अपवाद ठरले "सखाराम बाईंडर" जे सुर्वाती पासूनच माणसाला बसलेल्या ठिकाणाशी खिळवून ठेवते... सखारामचा तो त्याच्या घरातील रुबाब,कणखर विचारांची चंपा आणि हळवी लक्ष्मी हे पात्र मनाला भिडतात. नक्कीच बघा... सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे.१९७२ मध्ये रंगभूमीवर सादर झालेलं हे नाटक.राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक पातळीवर प्रचंड विरोध,मोठमोठे वाद,बंदी आणि असं सगळं वादळ अनुभवलेल्या या नाटकाला आणि त्याच्याशी संबंधित लोकांना याच त्याच्या चाहत्या वर्गाकडून भरभरून प्रेमही मिळाले... हे प्रेम सखाराम बाइंडरचं होतं का? की मुक्तावरचं होतं? की नाटककार विजय तेंडुलकरांवरचं होतं? ते या सगळ्यांसकट मराठी नाटकावरचं होतं.आणि अगदी खरं सांगायचं तर ‘सखाराम...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!