एक भाषा संपणे म्हणजे या जगातून एका मुळ संस्कृतीचा नामशेष होणे होय.हे खरच खूप वाईट आणखी यावर अभ्यास,विचार करण्यासारखे आहे..... काही दिवसांपूर्वी एका भाषेचा मृत्यू झाला म्हणजेच तीचं अस्तित्व या जगातून समुळ नष्ट झाले,या विषयवार एक लेख लिहला होता परंतु त्या लिखाणातून मला मनाला संतुष्टी वाटले नाही म्हणुन आज पुन्हा हा एक लेख.... कारण एक भाषा संपणे म्हणजे जगाच्या पाठीवर झालेली ही एक खूप मोठी हानी आहे,जी कधीही न भरून निघणारी असेल.जगाच्या या नकाशावर अनेक जवळ-जवळ तेवीसशे भाषा बोलल्या जातात,म्हणजे तेवीसशे प्रकारच्या विविध भाषा,संस्कृती या जगात वापरल्या जातात.... म्हणजेच एका शब्दाला पर्यायी तेवीसशे शब्द आपल्याला भेटतात,आज अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे...काही भाषा तर शेवटचा श्वास घेत आहेत,हो श्वासच कारण अजूनही या भाषांची या तंत्रज्ञानाच्या युगात कोठेही लिखित स्वरूपात जपवणूक केली गेली नाहीये,कदाचित त्याची दखलही घेतली गेली नाहीये.... एक भाषा संपते म्हणजे तिचा इतिहास पूर्णपणे संपला जातो,इतिहास संपणे म्हणजे आपल्या पुढील पिढीला आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या फक्त त्या भाषेत...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!