मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जगणे हरवलेली माणसे... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जगणे हरवलेली माणसे...

सांजवेळ दाटलेली, पैल पोहचला थवा..! जीर्ण आभाळास आता सुर्य का हवा नवा, मंत्र झालेल्या मैफिलीला चंद्र का हवा नवा...! कधीतरी काही दृश्य मनात पक्के खिळवून बसतात अन् कधीतरी नकळत अश्या काही ओळी कानावर पडल्या की,ते दृष्य डोळ्यासमोर येत जाते...मग तो क्षण विचारांमध्ये अनुभवण्यासाठी मनातच विचारांचे काहूर निर्माण होते... पुढे कितीवेळ मन त्या ओळींचा अर्थ शोधत गुंतवून घेतं स्वत:ला त्या दृश्यात... भर उन्हात कधीतरी अनुभवलेला तो क्षण असतो,अाठवून जातो अन् तेव्हाच या ओळींशी त्याचे साधर्म्य जुळवून येते.... भर दुपारी रस्त्याच्या कडेला कोरलेल्या डोंगरात कधीतरी दिसून जातो तो माणूस,काय करत असतो माहीत नाही.... विस्कटलेले केस,बहुतेक पांढरा सदरा घातलेला असतो त्याने,घामाच्या ओघळामुळे एक विचित्र आकृती त्याच्या पूर्ण अंगावर निर्माण झालेली असते,अनवाणी असतो भटकत डोंगरांनी खांद्यावर एक पिशवी घेऊन.काय असते माहीत नाही त्यात,पण तिला तो खूप जपवत असतो अगदी जिवापाड... या पिशवीत बघून त्याच्या निरागस चेहऱ्यावर येणारं ते क्षणिक हास्य त्याला व मलाही सुख देऊन जाते....त्याच्या या मला सुखात भागीदार व्हायचे न...