मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पहिला पाऊस... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पहिला पाऊस....

#पहिला_पाऊस_अन्_प्रत्येकाचे_वेगवेगळे_भिजणे... पहिला पाऊस पडून बारा तास उलटून गेले अन् मी अजुनही खिडकीचा पडदा सावरत त्याला बघत बसलो आहे... अधून-मधून एखादी पावसाची सर येऊन जातेय,ती मी आलो आहे म्हणून खुणावत मला अस्वस्थ करत पुन्हा पुन्हा तीच जाणीव करून देत आहे.माझ खिडकीचा पडदा सावरणं होतं,सोबतीला पहिला पाऊस अन् कॉफी समीकरणही रात्रीच जुळुन आले आहे... अजुनही तो कॉफी कप खिडकीच्या ग्रील जवळ तसाच पडून आहे,पाऊस त्याला निमित्त मात्र की काय म्हणून त्याला भेटायला येणाऱ्या मुंग्या काही त्याला भेटायला आलेल्या नाहीये.... कसे असतं नाही का... प्रत्येकाचं पहिल्या पावसात भिजणं त्याला अनुभवणं वेगवेगळं असते,जस माझं पावसात भिजणे नसून ते फक्त आठवणीत भिजणे असते..‌. पण असो हा आठवणींचा विषय इथेच थांबवूया कारण मग दोघांचं पावसात भिजणं राहून जाईल.पहिला पाऊस आहे सो तो फार वेळ थांबणारा नाहीये,फक्त सरीवर सर तो अधून मधून बरसत राहणार आहे,आपणही वेळोवेळी एकमेकांवर बरसत राहूत.... तर पहिल्याच पावसात भर उन्हाळ्यात साथ देणारा प्राजक्त अंगणात उन्मळून पडलेला आहे. शेवटचं त्याचं बरसणे देऊन आयुष्यभर फुलांची मुक्त ...