मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

तिचा फुलनारा संसार... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तिचा फुलनारा संसार...

#परसदारच्या_अंगणातला_फुलणारा_तिचा_संसार.... नेहमीप्रमाणेच सांजवेळ झालेली आकाशात ढगांची गर्दी होऊ बघत आहे... काही वेळातच पाऊस येणार याची चिन्हे दिसू लागतात,पाऊस येऊ लागतो. परसदारच्या अंगणात असलेल्या जाईच्या वेलाची फुले सोसाट्याचं सुटलेलं वावधन,पावसामुळे जमिनीवर बरसु लागतात व आपलं फुलणारं बाळसं तिथेच सोडवून देतात... पावसाचा अंदाज घेऊन तो ही वेताची केलेली छोटीशी कुरकुली घेऊन,परसदारी असलेल्या जाईच्या वेलावरील फुलणाऱ्या फुलांना सकाळी पुजेत देवाला वाहण्यासाठी तोडून आणायला गेला... हल्ली तीच फुले पावसात पडून मातीत खराब होऊन जातात,त्यामुळे हे सर्व ही एकच भावना त्या फुलांना तोडण्यामागची त्याची असते... ऐरवी सांज ढळुन काळोख पसरलेला,पाऊसही आता बऱ्यापैकी बरसू लागलेला असतो. सांजवेळी आईने हातपाय धुवून,डोक्यातील केसांचा अंबाडा घालुन देव्हाऱ्यात दिवा लावावा. तसे घरात प्रसन्नमय वातावरण निर्माण होते अन् अलिकडे आजारी असलेली आई यावेळी चेहर्यावर तेजस्विता असलेली,प्रसन्नमय दिसु लागते... जसजसा ढगांचा काळोख,प्रसन्न दिव्यांचा उजेड घरात पसरु लागतो आणि घरातली सायंकाळची कामं सुरू होतात... सर्व स्वयं...