#परसदारच्या_अंगणातला_फुलणारा_तिचा_संसार....
नेहमीप्रमाणेच सांजवेळ झालेली आकाशात ढगांची गर्दी होऊ बघत आहे... काही वेळातच पाऊस येणार याची चिन्हे दिसू लागतात,पाऊस येऊ लागतो.
परसदारच्या अंगणात असलेल्या जाईच्या वेलाची फुले सोसाट्याचं सुटलेलं वावधन,पावसामुळे जमिनीवर बरसु लागतात
व आपलं फुलणारं बाळसं तिथेच सोडवून देतात...
पावसाचा अंदाज घेऊन तो ही वेताची केलेली छोटीशी कुरकुली घेऊन,परसदारी असलेल्या जाईच्या वेलावरील फुलणाऱ्या फुलांना सकाळी पुजेत देवाला वाहण्यासाठी तोडून आणायला गेला...
हल्ली तीच फुले पावसात पडून मातीत खराब होऊन जातात,त्यामुळे हे सर्व ही एकच भावना त्या फुलांना तोडण्यामागची त्याची असते...
ऐरवी सांज ढळुन काळोख पसरलेला,पाऊसही आता बऱ्यापैकी बरसू लागलेला असतो. सांजवेळी आईने हातपाय धुवून,डोक्यातील केसांचा अंबाडा घालुन देव्हाऱ्यात दिवा लावावा. तसे घरात प्रसन्नमय वातावरण निर्माण होते अन् अलिकडे आजारी असलेली आई यावेळी चेहर्यावर तेजस्विता असलेली,प्रसन्नमय दिसु लागते... जसजसा ढगांचा काळोख,प्रसन्न दिव्यांचा उजेड घरात पसरु लागतो आणि घरातली सायंकाळची कामं सुरू होतात...
सर्व स्वयंपाक झाला,जेवणाची ताटे डायनिंग टेबलवर आली की सर्वच जेवणासाठी येतात घरात असलेला तो,ती अन् आई जेवन करून तो,आई त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात. ती भांडीकुंडी आवरुन,थोडेफार अस्थव्यस्थ झालेल्या केसांना सावरत बाल्कनीत असलेल्या सोफ्यावर आई,वडिलांना,बालपणीच्या दिवसांना आठवत काहीवेळ बसलेली असते...
आतापर्यंत बाहेर पडणारा पाऊसही कमी झालेला भासतो,बरीच वेळ झालेली असते.ती झोपायला म्हणुन बेडरूममध्ये जाते तो अजुनही पुस्तक वाचत बसलेला असतो...
भव्य अशा दिवाणावर तिच्या बाजूने असलेल्या व्हाइट बेडशीट कव्हरवर तिने एक जुनी जाडसर गोधडी अंथरावी,जी बऱ्यापैकी तिला मायेची उब देत असते. हे ती तेव्हाच करते,जेव्हा तिचे ते आठ दिवस चालू असतात नकळत त्यालाही अंदाज येतो...
ती थकलेली असल्यामुळे गुड् नाईट म्हणून अंथरलेल्या गोधडीवर झोपी जाते. तो मात्र दिव्याच्या मंद उजेडात कीतीवेळ तिच्या चेहऱ्यावर असलेल्या तेजाकडे,तेजस्वी सौंदर्याकडे बघत बसलेला असतो.
तिचं ते खुललेल सौंदर्य दुरूनच अनुभवत असतो...
नेहमीची पहाट होते,रात्री केव्हा डोळा लागला त्यालाही समजलेलं नसतं...
अर्थात आज देवपूजा त्याला करावी लागणार असते,कारण तिच्या या दिवसात सकाळची पुजा तोच करत असतो. कीचनमध्ये माठाच्या खाली असलेल्या छोट्या वाटीत थेंब थेंब पडणार्या पाण्यात रात्रीच भिजवत ठेवलेली जाईची फुलं आतापर्यंत बऱ्यापैकी ताजीतवान असतात...
तो सुई,दोरा घेऊन त्यांना छानपैकी देव्हार्याजवळ बसुन ओवु लागतो,तितक्यात ती अंघोळ करून त्याच्या समोरून स्वत:ला सावरत बाजुच्या खोलीत जाते. तो तिला बघत बसतो कारण काय माहित नाही,या दिवसात प्रत्येक स्री खूप सुंदर दिसत असते... स्त्री नेहमीच सुंदरच आहे सौंदर्याने आणि विचारानेसुद्धा पण लोकांनी तिचे समाजात आखलेले चित्र काही औरच आहे,असो तो लिखाणाचा भाग नाही. यावरही कधीतरी सविस्तर लिहल...
एरवी तो तिला कामाच्या व्यापात वेळ देऊ शकत नाही,पण हे असे छोटे छोटे सुटून जाणारे क्षण ते दोघेही नेहमी साजरे करतात. कारण हेच ते विशेष प्रेम असते,या दिवसात तिचं सौंदर्य हे अजून खुललेलं असतं,नजरेने नजरेशी घरात दोघांचे हे प्रेमाचे खेळ चालुच असतात. नेहमीच त्याची नजर तिने चुकवत राहावी अन् तो तिला नजरेत कैद करत रहावा हा खेळ चालूच असतो,हे क्षण अनुभवणं सुंदर आहे...
आतापर्यंत त्याचीही देवासाठी लागणारी माळ तयार करून झालेली असते,आता मात्र त्याचा विचार बदललेला आहे. त्याच्या माळेचे रूपांतर गजर्यामध्ये व्हावे. तिलाही त्याचं सुख,प्रेम अनुभवायला मिळावं,म्हणून तो इतके नक्कीच करू शकतो...
गजरा आणि तिला आवडणारा आलं घातलेला चहा तो हॉलमध्ये घेऊन येतो,तिच्या केसात त्यानं तो गजरा माळावा अन् चहा देऊन तो पुन्हा पूजेला येऊन बसतो...
ती सुंदर दिसतच असते,सोबत चेहऱ्यावरील तिचा तो आनंद बघण्या जोगता असतो,तो ही मनोभावे देवपुजा करु लागतो.
हे सर्व सुख पडद्याआड असलेली आई नकळत अनुभवत असते,एका आईला अजुन तरी काय अपेक्षा असावी. तिचा घटका दोन घटकांचा राहिलेला तो संसार असतो,पण या संसाराला पेलणारी दोन आपसात प्रेम असणारी व्यक्ती तिच्या उत्तरार्धात तिच्या आयुष्यात असतात...
मग नकळत कधीतरी,हे सुख बघवुन तिच्या डोळ्यातही आपसुकच आनंदाश्रु तरळुन जातात....
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा