मुख्य सामग्रीवर वगळा

लेखक आणि मित्र

#प्रत्येकाच्या_आयुष्यात_असावा_असाही_एक_मित्र..!

रात्रीचे जेवण झाले की नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी मी बाहेर फिरायला म्हणजे घराच्या आसपास असलेल्या परिसरात फिरायला जात असायचो. काही दिवसांपासून कोरोना आला आणि माझे सांजवेळी फिरायला जाणेही मी बंद केले...

सांजवेळी फिरायला जाणे कसले ते एक निमित्तमात्र असायचे त्या एका मित्राला भेटायला जाण्यासाठीचे...
एक वेळ होती जेव्हा आयुष्य म्हणजे मित्र आणि मित्र म्हणजे आयुष्य इतकीच काय ती जीवनाची व्याख्या केलेली,त्यामुळे असंख्य मित्र केलेली होती. सर्वांना वेळ देणे,त्यांच्या सानिध्यात राहणे यातच दिवस कसे निघून जायचे समजायचे नाही.

आपण जसे म्हणतो की,आयुष्यात काही चढउतार येतात आणि आपण आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने बघू लागतो तसेच काही दिवस माझ्याही आयुष्यात आले. हे दिवस विचार केला तर फार लवकर माझ्या आयुष्यात आले,ते स्वीकारून आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देत आयुष्य जगायचे होते.

यात झाले काय की नकळत का होईना किंवा कामाच्या व्यापात हे सर्व मित्र मी सोडून दिले किंवा बळजबरी सोडावे लागले,पण आज जेव्हा आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन मागे बघतोना तेव्हा वाटते की मित्र सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता...

आजही हे सर्व मित्र भेटतात सर्व विचारपूस होते आणि पुन्हा आपले आयुष्य,आपले प्रॉब्लेम्स,आपले सुख यात मी गुंतून जातो. काही हक्काचे मित्र अजूनही जपवून ठेवले आहे जे आयुष्यात कुठल्याही वेळी कायम सोबत असतील,हे मित्र फक्त हातावर मोजण्या इतकेच आहे,दोन्ही हातावर नाहीतर फक्त एकाच हातावर इतकेच. यातही मी विचार करत असतो की कोण योग्य, कोण अयोग्य वगैरे वगैरे....

पण काय आहेना सध्या मित्र वगैरे या गोष्टींना आयुष्यात फार स्थान नाही,असेलही तर त्यांना ठरवून मी तितकासा वेळ देऊ शकत नाहीये. इतकं सर्व मी पर्सनली करून ठेवलं आहे माझं आयुष्य... नको वाटतो माझ्यामुळे त्यांना झालेला त्रास अन् हे नेहमीच मी जपवत असतो,जपवत आलोय...

वरती सांगितल्याप्रमाणे सांजवेळी फिरायला जाणे कसले ते एक निमित्तमात्र असायचे त्या एका मित्राला भेटायला जाण्यासाठीचे. 

हो अलीकडे एक मित्राबरोबर रोजचे उठणे बसणे होत असायचे,फार काही मोठा नव्हता तो सामान्य पण मनातले सर्व काही त्याच्याशी शेअर करू शकतो असा हा मित्र...

सेम आयुष्य आहे दोघांचे,त्याचेही कमवण्याचे दिवस आहे वय फार नाही माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा आहे. एकाच शाळेत असल्यामुळे त्याची माझी ओळख झालेली,शाळा संपली व संपर्क तुटला तो थेट या दिवसापर्यंत,तोही त्याच्या नियतीने आखून दिलेल्या आयुष्यात व्यस्त आणि मी पण...

नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळी जेवण झाले की मी फिरायला जातो,माझ्या त्या आवडत्या जागी अन् नकळत एक दिवस कळते की तो तिथे वॉचमन म्हणून काम करतो...मेहनती आहे,आयुष्यात काय वाईट,काय चांगले हे त्याला कळते त्यामुळे मलाही फार काही वाटले नाही अन् मी पण तितका पर्सनली विचार कधी
केला नाही त्याच्याबद्दल,जाणून बुजून मला तो करायलाही नाही आवडत...

अलीकडे रोज भेट होत असते माझंही रोजचे फिरायला जाणे, Facebookवर तो मला add असल्यामुळे माझ्या तोडक्या-मोडक्या लिखाणाबद्दल त्याला माहीत होते.तो नियमित वाचतोही पण कधी रीअॅक्ट होत नसतो,त्याने बोलण्यात खूप वेळा सांगितले की छान लिहतो कविता,लेख नेहमीच वाचत असतो तुझी.

हे ऐकुन आनंद झाला कारण,असे अनपेक्षित कौतुक होत असले तर आनंद होतोच...

मग काय नियमित होणारी भेट एरवी,तो त्याच्या मित्रांमध्ये असला की त्यांचे बिनधास्त बोलणे वगैरे असायचे हे मी खूप वेळा दुरून बघायचो. पण मी जेव्हा त्याच्या सोबत बोलायचो त्यावेळी मोजके विषय,एकमेकांची होणारी नित्याची विचारपूस इतकेच.कुठेतरी नकळत मनाला वाटायचे की,हा बोलतांना आपली रिस्पेक्ट ठेऊन कुठेतरी बोलत असतो...(पण हे का ? मी तर त्याचा मित्रच आहेना)

मी काही कुणी मोठा किंवा नवोदित वगैरे नव्हतो पण त्याच्यासोबत बोलतांना हे खूप वेळा मला वाटायचे,कळायचे.
कदाचित तो करत असलेला जॉब यामुळे हे सर्व त्याला ज्ञात असेल का ?  असेही खूप वेळा वाटायचे,कारण दिवसभरात बऱ्याच मोठमोठ्या लोकांना तो बोलायचा प्रामाणिकपणे,पूर्ण मेहनत,इमानदारीने तो त्याची ही नोकरी करत होता अन् म्हणून मला खूप वेळा त्याच्याशी बोलतांना केलेल्या निरिक्षणातून त्याच्या रिस्पेक्ट देऊन बोलण्याबद्दल खूप काही वाटुन जायचे....

पुढे खूप वेळा त्याची माझी भेट,रोजचे होणारे बोलणे,ठरलेले विषय छान वाटायचे...
लेखन म्हंटले की प्रतिक्रिया येतच असतात,त्यामुळे खूप वेळा मला त्याच्या समोर प्रतिक्रीयेसाठी वाचक वर्गाचे येणारे फोन अन् त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर असलेले समाधान,आनंद तो न्याहाळत बसायचा.

मी पण त्याच्या चेहर्याकडे बघून फोनवर बोलत असायचो,काहीवेळ बोलणे झाले की त्याने घेतलेला हातात हात अन् कौतुकाची दिलेली शाब्दीक पोचपावती...
वाह...!

यापेक्षा अजून एक लेखकाला काय हवे असते एका मित्राकडून,खरे सुख तर यापुढील त्याच्या माझ्या झालेल्या संवादात असायचे. या संवादात तो जे काही बोलयचा ते एक जाणकार लेखक आपल्या लिखाणाला प्रतिक्रिया देतात,तसे असायचे.

त्याच्या चेहऱ्यावर असणारा माझ्या लिखानासाठीचा आनंद,जितका मला एक वाचकाचा फोन आल्यावर आनंद होत असायचा,त्याच्या काही पट मी त्या फोनला प्रतिउत्तर देतांना तो मित्र जेव्हा माझ्या चेहऱ्यावरील हावभाव बघत असायचा तेव्हा त्याच्या चेहर्यावर आपसूक माझ्यासाठी असलेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसायचा...
पुढे तो नकळत बोलून जायचा,
भाई खरे आयुष्य जगतोय तू...
आयुष्यातील सुख,समाधान काय असेल तर ते हेच...
तुझा चाहतावर्ग तुझी इतकी आपुलकीने दखल घेतो याला तोड नाही...

बस्स अजून काय हवंय भाई...
तुझी ही प्रतिक्रिया लिखाणाला बळ देते रे,भेटुयात सर्व ठीक झाले की तुर्ताच तु पण काळजी घे....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...