मनावर स्वार झालेला एकांत आणि अंधारलेल्या वाटा,अंधारून आलेलं काळंभोर आकाश.
पुन्हा तेच सांगतो अंधारलेल्या वाटा,अंधारून आलेलं काळंभोर आकाश आणि मनावर स्वार झालेला एकांत...
घरातून नजर कल्पनेतल्या टेकडीवर असलेल्या काळ्या खडकात फिरत आहे,काळ्याभोर आकाशासोबत सोसाट्याचा घराच्या दिशेने वाहणारा वारा...
काल सांगितलेली स्ट्रीट लाईट बंद चालू करायची सवय.हो तीच सवय 24 तास उलटून गेले आणि अजूनही तोच विचार चालू आहे का ?
तर हो..हाच तर असतो मनावर स्वार झालेला एकांत अन् कायमचा शांत झालेलो मी,आकाश ढगाने भरले असल्यामुळे आजूबाजूला चहूकडे प्रकाश नाहीचे.तरीपण काल एक दोघे म्हणाले की प्रकाश असावा आसपास,मग आपलीच आपल्याला काळजी असते आणि आपण त्या दिशेने मार्गक्रमण करतो.
सर्वच अंधार दिसत असला तर बळजबरीने प्रकाश बघायचा का अंधारात..?
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा