तब्बल चार वर्षांपूर्वी पाठवलेला मॅसेज काही दिवसांपूर्वी seen झालेला होता,मॅसेज पाठवणं व मेसेज बघणं यातला वेळ बघितला तर खरच सांगु अलीकडे खूप गोष्टी बदलल्या आहे.... तेव्हा फक्त मर्यादित विचार होते,अलीकडच्या काळात त्यांना भविष्यातील स्वप्नांचे डोहाळे लागले आहे.... माझं अन् भविष्य...काय भविष्य आहे ? सारा अंधारच तर दिसतो भिंतीवर तुझ्या.तू ना...हो मीच हरवला आहे चिंतेच्या काळोखात तुझ्या मनात मोजकेच विचार आहे फक्त.... करियर,लेखन,वाचन,कधीतरी मुड बदलेला असला की मग ती आठवते तुला,ऐकल होतं मन बोलतं ते खरे असते.... होनं तर ऐक मग,मी खरच बोलतो आहे या पलिकडे नाहीये ओळख तुला जगाची.... ती नाही आवरत तुला,मी तिला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्या तिने पाळल्या आहे. यशाची उत्कर्षाची,शिखरे ती सर करत आहे,तुला कसला इतका आव तिने तुझा मॅसेज बघावा,इतकं होऊनही तिने तुझी विचारपूस करावी,तुझा Attitude इथेही आड यावा इतकेच सांगेल,सावर स्वत:ला मी मन आहे तुझं फक्त.... अरे हो खरे आहे,पण माणूस कसा असतो नाही का मॅसेज seen होऊनही बोलत नाही. एकतर असे आहे की,सध्या मी विचारांमध्ये दिवसाची रात्र करतो,रात्रीचा दिवस क...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!