मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वृत्तपत्र जगणं शिकवणारा एक दुवा... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वृत्तपत्र जगणं शिकवणारा एक दुवा...

पैसा माणसाला जगायला शिकवतो हे म्हणायला कितीही जरी चुकीचे वाटत असले तरी ते वास्तव सत्य आहे. याला जोडून अजुन एक गोष्ट अशी आहे जी नसली की माणसाला चैन पडत नाही,मग ती कुठलीही आपल्याला असलेली सवय ती चांगली असो कींवा वाईट.... गेले दोन महिने झाले सकाळी चहा बरोबर हवे असणारे वृत्तपत्र हल्ली घरोघर उपलब्ध होत नाहीये. ज्याची काही जणांना इतकी सवय झाली असते की,सकाळ झाली की आपसूक आपले पाय ज्या जागी पेपर टाकलेला असतो त्या जागेला भेटून येतात...पण अलीकडे वृत्तपत्र येत नाहीये गेले काही दिवस म्हणुन सतत अस्वस्थ वाटत आहे... काहीजण म्हणतात पेपर नाही आला तरी आम्हाला काही वाईट वाटत नाही. कारण ऑनलाईन तो फुकट उपलब्ध होतो,सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणारी माहिती भेटतच असते...मान्य आहे हे सर्व खरे आहे अलीकडे या गोष्टीचा परिणाम वृत्तपत्र निर्माता,विक्रेता,पत्रकार या सर्वांवर झाला आहे कुठेतरी ती अस्वस्थता जाणवतही असते... हे सर्व कितीही खरे असले तरी ज्याप्रमाणे पत्र जसे अजूनही या आधुनिक युगात तग धरून कायम उभे आहे त्याच्या चाहत्यासाठी आजही,कुठलीही खंत न बाळगता...त्याच्याशी जोडून असलेले माणसे सेवा...