पैसा माणसाला जगायला शिकवतो हे म्हणायला कितीही जरी चुकीचे वाटत असले तरी ते वास्तव सत्य आहे. याला जोडून अजुन एक गोष्ट अशी आहे जी नसली की माणसाला चैन पडत नाही,मग ती कुठलीही आपल्याला असलेली सवय ती चांगली असो कींवा वाईट....
गेले दोन महिने झाले सकाळी चहा बरोबर हवे असणारे वृत्तपत्र हल्ली घरोघर उपलब्ध होत नाहीये. ज्याची काही जणांना इतकी सवय झाली असते की,सकाळ झाली की आपसूक आपले पाय ज्या जागी पेपर टाकलेला असतो त्या जागेला भेटून येतात...पण अलीकडे वृत्तपत्र येत नाहीये गेले काही दिवस म्हणुन सतत अस्वस्थ वाटत आहे...
काहीजण म्हणतात पेपर नाही आला तरी आम्हाला काही वाईट वाटत नाही. कारण ऑनलाईन तो फुकट उपलब्ध होतो,सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणारी माहिती भेटतच असते...मान्य आहे हे सर्व खरे आहे अलीकडे या गोष्टीचा परिणाम वृत्तपत्र निर्माता,विक्रेता,पत्रकार या सर्वांवर झाला आहे कुठेतरी ती अस्वस्थता जाणवतही असते...
हे सर्व कितीही खरे असले तरी ज्याप्रमाणे पत्र जसे अजूनही या आधुनिक युगात तग धरून कायम उभे आहे त्याच्या चाहत्यासाठी आजही,कुठलीही खंत न बाळगता...त्याच्याशी जोडून असलेले माणसे सेवा देत आहे,काळाच्या ओघात थोडा बदल झाला आहे अन् तो त्यांनी स्वीकारला आहे व आजही सर्व छान चालू आहे...
वृत्तपत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याचा प्रवास हा कायम अनोखा,माझ्यासाठी तरी हवाहवासा आहे...पत्रकाराचे ते बातम्या शोधण्याचे कार्य त्यासाठी असलेला प्रामाणिकपणा,हो अलीकडे जेव्हा माझे काही लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागले तसे या वर्गाशी माझी बऱ्यापैकी ओळख झाली. माझा त्यांच्या बाबतीत असलेला अनुभव आजवर खूप चांगला आहे,सतत कामाशी प्रामाणिक असतात ही माणसं...
त्यानंतर निर्माता,एडिटर,वृत्तपत्र प्रेस हा सर्व प्रवास
आणि रात्री बारा-एक वाजेच्या सुमारास आपल्या ठरल्या ठिकाणी जाण्याचा तो वृत्तपत्राचा प्रवास अप्रतिम असेल.हो असेल... कारण हा सर्व प्रवास आजवर मी अनुभवलेला नाही,पण इथून पुढे त्यांचा होणारा सर्व प्रवास मी अनुभवला आहे. म्हणूनच कदाचित त्या बाबतीत एक आकर्षण आणि जाणीव कायम मनात राहिलेली आहे....
सकाळी जेव्हा बसस्टँडवर सर्व पेपरचे पार्सल येतात तेव्हा सुरू होतो,घरोघरी ठरलेला पेपर ठरलेल्या व्यक्तीने टाकायचा प्रवास. हे काम मी पाच वर्ष केले आहे,यात अनेक वृत्तपत्र वाचक चाहत्यांची भेट झाली... पेपर कसा वाचायचा अन् ती वाचण्याची त्यांची सवय तो आनंद खरच फक्त एक पेपर टाकणारा मुलगाच अनुभवू शकतो...
सकाळी ५:३०ला सुरू होणारे हे काम ७-८ वाजता संपून जायचे,महिन्याला त्यावेळी भेटणारे ४५०रुपये कमी नव्हते त्या वयात पैशाची गरज,व्यवहारीपण शिकण्यासाठी असलेलं ते एक काम होते...
गेले दोन महिने वृत्तपत्र येत नसल्यामुळे या वर्गाचा विचार करवत नाही,आणि रोज चहासोबत झालेली वृत्तपत्राची सवय हल्ली वृत्तपत्राशिवाय झालेली सकाळ काहीतरी चुकत असल्याचा भास करून देत असते कायम...प्रसंगी चिडचिडही होत असेल कारण वृत्तपत्र वाचणारा बहुतांशी वाचक वर्ग हा जाणता,वृत्तपत्राचा चाहता वर्ग आहे.ज्यांना त्यांच्या सवयीशी झालेला हा बदल गेल्या कित्येक वर्षात झालेला हा एकमेव बदल अवघडता वाटत असल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा