आज खुप वेळा वाटत आहे तुझ्यासाठी काहीतरी लिहावं,पण मला फारसं नाही व्यक्त होता येत आपल्या माणसांसाठी...
तुझं हे अकाली एक्झिट घेणं अजूनही मान्य होत नाहीये,सर्वच मनाला चटका लावुन जाणारं आहे....
माझं मन सिनेमा,मालिका यांमध्ये फारसे रमत नाही,परंतु या विश्वाततली तुझी जी थोडीफार ओळख आहे.ज्यात नेहमीच तू तुझ्या वेगळ्या भूमिकेने माझ्या आठवणीत आहेस...
आज तू कायमचा सोडून गेला आहेस,तरीही मी तुझा एकेरी उल्लेख करत आहे.हो अगदी,तो कायम एकेरीच करेल,कारण हे सर्व फक्त हक्काच्या माणसांसाठी आतून आलेले शब्द असतात...
काही दिवसांपूर्वी एका इंग्लिश पेपरमध्ये पूर्ण अर्ध्या पानावर तुझा तो ट्रॉफी हातात घेऊन फोटो बघितला.मला राहवलं नाही इंग्लिश मला फारसे समजत नाही,तरीही तो लेख पूर्ण वाचून काढला.यामध्ये बऱ्यापैकी खूप काही कळले,तू खूप उंचीचा स्टार झाला होतास,पण तू ते तुझ्या वागण्यातून कधी व्यक्त केलं नाहीस...
दोन वर्षापूर्वी तुला त्या दुर्धर आजारचं निदान झालं,हे जेव्हा कळलं तेव्हा मनात धडकी भरली...यात तु आतुन पुर्णपणे खचला होतास,पण तुझी आजाराशी चालु असलेली लढाई.कधीतरी तुझ्या पारड्यात सुख टाकत होती,तर कधी तुला दुख: देत होती...
पुढे चालुन तु बराही झाला पुन्हा सिनेसृष्टीत जोमाने कमबॅकही केलं.आता कुठंतरी वाटलं होतं सर्व ठीक होईल,पण तुझं ते पत्र मात्र आतल्या आत मनाला काचत होतं...कारण तुझं त्या पत्रात केलेलं ते वक्तव्य मान्य नव्हतं आम्हा सर्व चाहत्यांना....
पण ज्याप्रमाणे तु या रंगमंच्याच्या पडद्यावर तुझ्या भुमिकेत वेगळा,अव्वल ठरत होता.त्याचप्रमाणे इथंही तु अव्वल ठरला तुला तुझ्या मृत्युची जाणीव झाली होती,हे खुप त्रासदायक होतं.तुझ्या प्रत्येक चाहत्यासाठी पण हे तितकच कटु सत्यही होतं....
आज सकाळी मुंबईच्या कोकीलाबेन धीरुभाई अंबानीं हॉस्पिटलमध्ये तुला अॅडमिट केल्याचे वृत्त ऐकले,व मनात विचारांची पाल चुकचुकली....
कारण लीलावती रुग्णालय,हिंदुजा हॉस्पिटल,कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल,फोर्टिस हाॅस्पिटल अश्या मुंबई मधल्या नामांकित हॉस्पिटलचे नावे तेव्हाच ऐकु येता आम्हाला,जेव्हा काहीतरी वाईट घडणार असते.कोणीतरी माणसातला आपला हक्काचा माणुस आपल्याला सोडून जाणार असतो...
आजही तेच झालं तु अकाली एक्झिट घेऊन सोडून गेलास...
इतकंच म्हणेल,खुप घाई केलीस हे वय नसतं जाण्याचं.आईवरचं तुझं हे प्रेम होतं की काय माहित नाही... काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला व आज त्यांना भेटायला तु स्वर्गलोकी निघून गेलास...
#कायम_आठवणीत_राहशील...
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा