#Happy_Mothers_Day...♥️
"आकाशाचा केला कागद,समुद्राची केली शाई तरी आईवर निबंध पूर्ण होणार नाही." असा लहानपणी सुविचार आपण म्हणायचो हे किती खरे होते माहित नाही पण आता...
आता...नाही व्यक्त होता येत आईसाठी मला तरी शब्दांतून,शब्द आणी भावना वळीवाच्या पावसा सारख्या असतात...कधी कधी मनातुन खूप काही व्यक्त करून जातात पण जेव्हा याच भावनांना शब्दरूपात कागदावर उतरवयाची वेळ येतेना नाही जमत व्यक्त होयला आणी ते लिखित रुपात मांडायला...
काय असेल याचे कारण माहित नाही,पण खूप काही व्यक्त करायचं असते मनातले,खूप काही कैद करायचं असत त्या लिखाणात जे फक्त लिखनाशीच शेअर करता येतं...पण हक्काच्या माणसांसाठी इथेही शब्दांना,भावनांना वाहणेच हाती येते,कदाचित माझं हळवं मन इथं त्याची जागा घेत असेल...
आईबद्दल काय बोलायचं,फार फारतर आठवणी शेअर करू शकतो तिच्या बद्दलच्या शब्दरुपात.तिलाच शब्दात व्यक्त करायचं म्हंटले की नाहीच येत,कधी कधी वाटते की लहानपण छान असते....
आईबद्दल असलेल्या भावनांना व्यक्त करता येतं आईशी,परंतु जेव्हा आपलेच पाऊल तारुण्यात पडायला लागते तसे तसे यावर मर्यादा यायला लागतात तिची काळजी असेल की आपलं विचारांच आकाशात मुक्तपणे स्वैर करणं वाढलेलं असेल...
लहानपणी जी आई आपल्या सोबतीच्या प्रत्येक पहिल्या क्षणासाठी हळवी होत असते,आनंदाचे अश्रू गाळत असते...ती आई नाही अनुभवता येत आपल्याला आपल्या तारुण्यात कदाचित तिचं आपल्या नजरेत बाळ होणं सुरू झालेलं असतं...
आपल्या तारुण्यात ती मनाने झालेली लहान,आणी तितकीच पहिल्या सारखी हळवी असते.तिची आपल्या प्रतिची काळजी असो कींवा तिच्या या वयात तिच्यातले आपलं बालपण आपल्यालाच परत देणारी ती,तिची काळजी,वेळोवेळी येणारी तिची आठवण हे सवयीचं होत असतं...
म्हणजे कसं असतं नाही का,ती तिच्या स्वतःसाठी मुलांकडून काहीच घेत नाही अगदी त्या मुलाच्या बाबतीत अनुभवलेले बालपण सुद्धा ती त्याला भेट देऊन टाकते...
आईचं आयुष्यातलं स्थान म्हणजे,उगवत्या सूर्याप्रमाणे अढळ आहे ते आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तसेच असते...कारण त्याला अस्त नसतो,त्याचा अस्त होणे म्हणजेच आपल्या जीवनाचा शेवट होणे हे असते....
अलीकडे आईचं माझ्यासाठी हळवे होणं अनुभवत असतो,माझ्यातले लहान बाळ तसेच आहे का माहित नाही.पण माझ्यातले लहानपण तिच्यात उतरले आहे...तिच्यात हल्ली एक बाळ दिसतं जे माझ्यासारखेच खूप हट्टी आहे....
बस तिच्या या हट्टाला (माझ्या प्रत्येक स्वप्नाला) पूर्णत्वास न्यायचे आहे आता,माहीत नाही ते कितपत जमेल पण तिचं बालपण माझ्या नजरेतून अनुभवायचा आहे आता अन् ते तिलाही पुरेपूर जगुन द्यायचं आहे....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा