अनुत्तरित राहिलेले प्रश्न...
अनुत्तरित आहे काही प्रश्न उत्तराविना अजूनही,प्रश्नच होते कुठे ते मागं सोडून दिलेल्या अडचणीच त्या...!
प्रश्न उत्तरांचा खेळ जुळवून येतो बळजबरीचाच रोजचा,
टीचभर पोटासाठी धंदा मांडलाय
वेशीवर गरीबांच्या इज्जतीचा...!
शब्दांना मुभा आहे फक्त जित्यापणी मागत्या हाताने मागण्याची,बाकी हात आमचे तेव्हाच कलंक झाले जेव्हा सत्याची ओढ त्यांना लागली...!
प्रश्न उत्तरांच्या या खेळात रोज हरण्याशी मुक्काम आमचा,उत्तरे मिळालेल्या निःशब्द त्या भावनांना...!
प्रश्र्नच किती ते आमचे उत्तरे शोधत उत्तरांनाच तुम्ही प्रश्न निर्माण केली,त्या जीवाला आता नव्या पद्धतीने मागायची सवय वेगळी फक्त तुम्ही ती लावून दिली...!
सावरा तुम्हीच आता प्रश्न आणि उत्तरांना,फक्त जगण्यासाठी लागणाऱ्या गरजेवर भागवुन घेऊ आम्ही नका बोलवू पुन्हा कधी आम्हा गरीबांना...!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा