गौताळा अभयारण्य...
गौताळा अभयारण्यबद्दल यापूर्वी माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे,ट्रेकर्स सज्ज झाले आहे...खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा विषय घेऊन चर्चा होत आहेत तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून माझा हा तुमच्यासाठी माहितीपर लेख लिहण्याचा एक प्रयत्न...त्यानिमित्ताने माझ्या माध्यमातून गौताळा अभयारण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख होईल...
तर मित्र/मैत्रणींनो गौताळा अभायरण्य हे मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे अभयारण्य आहे.थोडक्यात या ठिकाणी आल्यावर तुमची कुठलीही निराशा होणार नाही कारण एकाच तालुक्यात तुम्हाला ट्रेकिंग करण्यासाठी खूप मोठे अभयारण्य आहे,अनेक व्हिव पॉइंट,विविधतेने नटलेली वृक्ष,वेली संपदा, धबधबे,धरणे,किल्ले,लेणी अन् विविध दर्शनीय मंदिर हे आपल्याला काही 40 ते 50 किलोमीटर आतील अंतरात बघण्यास मिळेल...
येणार कसे -
रेल्वेने आलात तर - चाळीसगाव रेल्वस्थानकापासून पुढे बसेसने 20 कि.मी.
विमानाने आलात तर -औरंगाबाद येथून 65 कि.मी. पुढे बसेस उपलब्ध आहेत.
बसेस ने आलात तर - कन्नड येथून पुढे 10 कि.मी.अंतरावर गौताळा अभयारण्य...
सिता न्हाणी
थोडक्यात गौताळा अभयारण्यबद्दल:
औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्यादृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. विविध प्रजातींची वृक्ष,वेली प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत केले...
अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचे 19706 हेक्टर तर जळगावचे 6355 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.
गौताळा ओट्रम घाट अभयारण्य कन्नड गावापासून 15 कि.मी अंतरावर आहे तर चाळीसगाव पासून 20 कि.मी अंतरावर. औरंगाबादपासून कन्नड 65 कि.मी अंतरावर आहे,हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो.कन्नडहून 2 कि.मी पुढे गेल्यानंतर एक हिवरखेडा फाटा आहे. या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचतो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू,पळस,रानपिंपळ,रानशेवगा,कडुनिंब,साग, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पणडुब्बी,पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो.तेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवग्याची झाडं, प्राणी,पक्षी पाहू शकतो.अभयारण्यात बिबट्या,लांडगे,चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर,यासह इतर 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.
या ठिकाणी पुरातन काळातील मंदिर अन् दर्गाह सुद्धा आहे तसेच विविध छोटेमोठे धबधबे लक्ष वेधून घेतात,धवल तीर्थ धबधबा,चंदन नाला,सितान्हाणी,प्रसिद्ध गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कुटी,पुरातन मंदिरे,लेणी,महादेव मंदिर,हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर,केदारकूंड अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते..
धवलतीर्थ धबधबा
गौताळा अभयारण्य बघून झाले की जवळपास अनेक स्थळं ही बघण्यासारखे आहेत जसे की,अंतुरचा कील्ला,सातमाळ डोंगररांगा,अंबाडी प्रकल्प,कालीमठ कालिकामाता मंदिर,शुन्याचा शोध ज्या ठिकाणी लागला ती पितळखोरा लेणी, पाटणादेवी,विविध ठिकाण हे बघण्यासारखे व आनंद,माहिती देणारे आहेत...पितळखोरा लेणी
या ठिकाणांना भेट दिल्यावर जवळपास अनेक जगप्रसिद्ध ठीकाणंही बघण्यासारखे आहेत...औरंगाबाद शहर याची ओळखच ऐतिहासिक शहर असल्याने ते पुर्ण शहर बघण्यासारखे आहे,वेरुळची लेणी, कैलास आश्रम,बदलला मारुती,थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ,देवगिरी किल्ला हे सर्व ठिकाण बघण्यासारखे आहे...
Written by,
Bharat Laxman Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा