#D_For_Dमार्ट... आता माझ्यासारखे मुलं D-मार्ट मध्ये जाऊन काय करत असतील ते मला माहित नाही. पण अलीकडे मला D-मार्ट फिरायला खूप आवडते,म्हणजे काही काम नसले की मी काहीतरी तुरळक गोष्ट घेऊन यायची म्हणून सुद्धा D-मार्टमध्ये जाऊन येतो... तुम्ही म्हणाल औरंगाबादमध्ये एवढा मोठा प्रोझोन मॉल सोडून तू काय फिरतो D-मार्ट मध्ये,तर त्यांना नाही समजणार की जी शांतता तिथे आहे,कुठली गरबड नाही ती मॉलमध्ये नाही भेटत... मॉलमध्ये खरेदी कमी अन् फोटो काढणारे हौशे नौशे जास्त असतात म्हणून मी तिकडे जाणे प्रकर्षाने टाळतोच,आता D-मार्टला शेवटची चक्कर दोन महिने पूर्वी झाली आहे.आता त्याची खूप आठवण येत आहे, तुम्ही म्हणाल इतके काय आहे तिथे ? तर... आमचं असच आहे जिथे फारशी गरबड नाही, गर्दी आहे थोडीशी पण it's okay सगळ मनासारखं भेटत नाही,नाहीतर जा मग किराणा दुकानात.... D-मार्टमध्ये आत एन्ट्री करत्या वेळी आपली बॅग बाहेर ठेवायची असते,ती सुविधा अन् हे सर्व हॅण्डल करणारे मित्रवर्ग सगळे भारी आहे येथे.कामाशी प्रामाणिक असलेले मस्त बिनधास्त बॅग द्यायची सोबत दिलेले कूपन खिश्यात घालायचे, मग चेकिंग करून आत जायचे भा...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!