#D_For_Dमार्ट...
आता माझ्यासारखे मुलं D-मार्ट मध्ये जाऊन काय करत असतील ते मला माहित नाही.
पण अलीकडे मला D-मार्ट फिरायला खूप आवडते,म्हणजे काही काम नसले की मी काहीतरी तुरळक गोष्ट घेऊन यायची म्हणून सुद्धा D-मार्टमध्ये जाऊन येतो...
तुम्ही म्हणाल औरंगाबादमध्ये एवढा मोठा प्रोझोन मॉल सोडून तू काय फिरतो D-मार्ट मध्ये,तर त्यांना नाही समजणार की जी शांतता तिथे आहे,कुठली गरबड नाही ती मॉलमध्ये नाही भेटत...
मॉलमध्ये खरेदी कमी अन् फोटो काढणारे हौशे नौशे जास्त असतात म्हणून मी तिकडे जाणे प्रकर्षाने टाळतोच,आता D-मार्टला शेवटची चक्कर दोन महिने पूर्वी झाली आहे.आता त्याची खूप आठवण येत आहे, तुम्ही म्हणाल इतके काय आहे तिथे ?
तर...
आमचं असच आहे जिथे फारशी गरबड नाही, गर्दी आहे थोडीशी पण it's okay सगळ मनासारखं भेटत नाही,नाहीतर जा मग किराणा दुकानात....
D-मार्टमध्ये आत एन्ट्री करत्या वेळी आपली बॅग बाहेर ठेवायची असते,ती सुविधा अन् हे सर्व हॅण्डल करणारे मित्रवर्ग सगळे भारी आहे येथे.कामाशी प्रामाणिक असलेले मस्त बिनधास्त बॅग द्यायची सोबत दिलेले कूपन खिश्यात घालायचे, मग चेकिंग करून आत जायचे भाई स्वर्गात आल्यासारखे वाटते...
काय बघावं अन् काय नाही,इथे सगळ्यात पहीले माझी सुरुवात होते नवीन आलेले ड्रेस,टी-शर्ट बघण्यापासून पण काय गोष्ट आहे काय माहित, मी इतक्या वेळा मला शर्ट बघून आजवर मला तिथले ड्रेस टी-शर्ट आवडलेच नाही.मग कुठेतरी इथे आपला जुना टेलर अन् शिवलेले कपडे आठवून जातात,या रांगेत खूप वेळ फिरले की पुढे असतो कप बश्या चिनी मातीची भांडी असलेलं काउंटर हे खूप आवडत्यापैकी एक.इथली प्रत्येक वस्तू माझासाठी तयार केली आहे असे वाटते मला,इकडे कितीही वेळ थांबले तरी मला बोअर होत नाही कारण नाजूक अन् सुंदर गोष्टी
असतात इथे सर्वच....
पुढे गेले की स्कीमवाला काउंटर ज्याचे नाव मी ठेवले आहे तो येतो,इथे सहा वर एक फ्री ही स्कीम हमखास असते तो म्हणजे साबण सर्व प्रकारच्या त्याही बघयाला खूप आवडतात.पुढे वॉशिंग पावडर,टूथपेस्ट, यांच्या विविध व्हरायटी हे पण भारी आहे,मग पलीकडे असलेले किराणा असलेले काउंटर जिकडे मी फार काम असल्या शिवाय जात नाही...
पुढे गेले की सगळ्यात जास्त आवडत्या लिस्टमध्ये दोन नंबरवर असलेले काउंटर म्हणजे चप्पल-बुटांचे काउंटर,इथे एक भारी असते इथे माझ्यासारखे घेणारे कमी अन् बघणारे जास्त असतात...
मग काय मी तर प्रत्येक शूज बघून घेतो,चप्पल मला आवडत नाही पण शुज आपला प्राण आहे.नवीन कोणते आले असेल ते पाहून घेतो इथे खूप दिवसांपासून न विकलेले शुज तर मला खूप शिव्या देत असतील,कारण त्यांच्या ओळखीच्या चेहऱ्यापैकी मी एक हमखास असेल मी खूप अन्याय करतो बिचार्या गरिबांवर....पण असो त्यांना माहितीये मी किती मोठा फॅन्स आहे त्यांचा मग घेतात दरवेळी adjust करून मला ते ही,इथे खूप वेळ दिला सगळ्यांच्या गळ्यात पडून झाले की मग आमचा मोर्चा पुढे सरकतो....
ते एक नंबर आवडणाऱ्या काउंटरकडे (सॉरी काउंटर शब्द खूप वेळा वापरला मी) ते म्हणजे विविध प्रकारच्या वॉटर बॉटलेचे काउंटर हे एक छोट स्वर्ग आहे...मी इथे आलो की मला भान नसते मी कुठे आहे,काय करतोय फक्त त्या प्लॅस्टिकच्या लहानपणी शाळेत घेऊन गेलेल्या बॉटल पासून तर आता ऑफिसमध्ये लागणाऱ्या बॉटल पर्यंत सर्व बॉटल मी बघतो...
अलीकडे मला ती स्टीलची ब्लॅक वॉटर बॉटल खूप आवडते,तिला बघण्यासाठी इकडे येऊन जातो मी.बाकी हे सर्व खूप गोड आहे यार इथे नेहमी एकतरी लहान बेबी त्याच्या आईला त्रास देताना भेटत असते,ती नको मला तीच बॉटल हवी आहे असे म्हणणारे.... त्या लहान मुलांमध्ये मग मी पण दिसतो मला,कारण मी पण त्या बॉटलला जीवापाड प्रेम करतो...
खूप भारी आहे हे काउंटर खूप वेळ इथे घालवला की मग शक्यतो मी D-मार्ट मध्ये थांबत नाही अन् बाहेर जायच्या गेटवर चेकिंग करून बाहेर पडतो पुन्हा लवकर कधीतरी यायला....
म्हणून हे आवडत आपल्याला मॉलपेक्षा जास्त...♥️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा