मुख्य सामग्रीवर वगळा

लेखक व्यक्त होतांना...



#लेखक_व्यक्त_होतांना...


कुठेतरी शब्दांना धारदार तलवारीच्या पात्यांचे स्वरूप देऊन संविधानाला लक्षात घेऊन लिहणारा तू नामदेव ढसाळ वाटतो.तर कधी सांजेच्या प्रहरी शब्दांना चांदण्यात मोजणारा,अन् कधीतरी स्मशानात जळत्या प्रेताच्या उजेडात उडत्या विस्तवावर कविता करणार तू ग्रेस वाटतो.कधीतरी रेल्वे स्थानकात तुझ्या कविता रेल्वेच्या आवजाशी हितगुज घालू बघता,अन् तू तिथेच तुझे तारुण्यातले जीवन कवितेला वाहून देतो.तेव्हा खरच तू कवितेला शोभणारा,तिच्यासाठी असणारा बालकवी शोभतोस...

हे आणी... इतर सर्वच कवी आहेना हे जगायला शिकवतात.तुम्ही म्हणाल मी पण आता काहीतरी कवितेशी जुळवून व्यक्त होणे,अव्यक्त राहणे याबद्दल लिहत असेल तर तसे काहीही नाही.पण काय असतं जेव्हा कुठेतरी त्या क्षणाची (जो क्षण आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी झुरवत ठेवत असतो) आपल्याला जाणीव होत असते,तो तेव्हाच कृतीत व्यक्त करून मोकळे होऊन जायचे असते...

कसे आहेना,
लिहत्या हाताला आपण खूप वेळा विचारून बसतो की,
तुम्ही हे कसे लिहतात...?
कसं सुचतं..?कोणासाठी..?
असे अनेक प्रश्न...

या प्रश्नाला खरंतर उत्तरं नाही,

फक्त कुणाला विचारांना लिखित स्वरूपात व्यक्त करता येतं केव्हा करायला आवडते मग ते ज्याच्या-त्याच्या सोयीनं असते.कुणाला लिखान करूनही मनातले व्यक्त करता नाही येत जे मनात चालू असते,जे त्याला सांगायचं असते...
त्याला आपण की म्हणू शकतो मृगजळाला भासवत लिहिणे (आता इथं मृगजळच का तर ते सोयीचं वाटतं माझ्यासाठी) तो इतर जगत असतो काहीतरी अन् लिखाणातुन व्यक्त होतो काही ते काही वेगळंच....

नेमका तोच कुठेतरी या जगण्यातल्या चढाओढीला साधतो अन् यशस्वी होऊन जगतो.पण हे सर्व थोडक्यात संपणारे असते कारण त्याचं सत्यात जगणे हे मर्यादित असते,याउलट तो एक असतो जो व्यक्त करत असतो आपल्याच कवितेतून,लेखातुन आपल्या जीवनपटाला....

हे दोन्ही व्यक्ती मला खूप भावतात,अलीकडे कधीतरी लेखन स्वरूपात दिर्घ व्यक्त होणारे लेखक त्यांच्या लिखाणात खूप काही सांगत असतात.ज्यामधुन खूप काही भेटत असते यासाठी वाचत राहणे महत्त्वाचे वाटते...

हो आता
यात कसं सुचलं..?
या प्रश्नाला उत्तर नाही कारण कधीतरी तो लिखाणात त्याचं 'स्व' लिहत असतो,तर कधी कल्पनेत फुललेलं जीवन...कधी काय तर कधी काय याला उत्तर नाही,हे कसं सुचतं तर जगण्यातुन आलेला अनुभव,सभोवतालची परिस्थिती,वगैरे वगैरे खूप कारणे असतात...

लेखकाची माझ्या नजरेतून केलेली व्याख्याच अशी आहे की,डोळ्यांना दिसणाय्रा समोरील दृश्यापेक्षा,ज्याला आपल्या लिखाणातून सभोवताल बर्यापैकी समजतो व्यक्त करता येतो तो लेखक... इथं डोळ्यांना दिसणंच महत्त्वाचं नाहीये तर ते मनाला भावनं व ते बोलण्यातुन व्यक्तं करणं महत्त्वाचं वाटते,असते...

क्रमशः

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...