मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सैर पर्यटनाची.... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सैर पर्यटनाची....

#सैर_पर्यटनाची.... औरंगाबाद ते चाळीसगाव महामार्गावरील कालिमठ फाट्यापासुन मध्ये 2 कि.मी.असलेलं कालीमातेचे मंदिर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत कालिकामाता मंदिर आहे. कन्नड तालुक्यातील या निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली आहे. निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक भव्य कलाकृती लाभलेलं कालीमातेचे मंदिर... कन्नड शहरापासून अवघ्या 9 कि.मी.अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालीमातेचे मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली. मुळचे कोलकात्याचे रहिवाशी असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी राजवैभवाचा त्याग करून 1968 रोजी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीला वास्तव्यास आले. तब्बल 19 वर्षे इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांनी कालीकामातेचे एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला. मंदिरासाठी कालिमठ येथे जागा विकत घेऊन तेथे हे मंदिर उभं केलं. कालिकामातेचे मंदिर हे आधुनिक स्थापत्य कलेचा,शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. ह...