मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

After long time Cricket..!

After long time Cricket..! #Afterlongtime..! आता सध्या मला असलेलं रिकामपण अन् लहानपणीची दोन्ही हातांवर मोजता येईल इतकी मित्र सध्या रोजच्या माझ्या आयुष्यात सोबती असल्यानं आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला जातोय.होय,तब्बल नऊ ते दहा वर्षांनी पुन्हा एकदा क्रिकेटची बॅट हातात धरली आहे,गेले आठ-पंधरा दिवस वेळ भेटल तसं खेळत असतो.... आता पूर्वीसारखं खेळता येत नाही पण आयुष्याच्या या वळणावर जसं समजून घेणारी ही मित्र भेटली आहे अगदी तितकंच अन् तसच क्रिकेट मध्येही ती सांभाळून घेतात... १३-१४ व्या वर्षी आमच्या टीमचा असलेलो मी युवराज आता खरंच नाही खेळत पहिल्यासारखं,पहिल्यासारखे सहज बाँड्रीपार सिक्स नाही जात माझ्याकडून किंवा नाही टीमच्या अडीअडचणीवेळी विकेट घेऊन टीमला संकटातून तेव्हाच बाहेर काढता येतं मला आता.आता एक छान आहे हेच मित्र समजदार झाल्यानं समजून घेतात हल्ली अश्यावेळी मला... सुरुवातीच्या चार-पाच दिवस तर हातात धरलेली बॅट पहिल्यासारखी घुमवतासुद्धा येत नव्हती,की बाँड्रीत गेलेला बॉल बॉलरपर्यंत सुद्धा फेकता येत नव्हता,हात खांद्यापासून दुखायला लागायचा. फिल्डींग करतांना कित्येक हातातल्या क

सिमांतनी भाग ५

सिमांतनी-भाग - ५ सिमांतनी- भाग ५. कोजागिरी होवुन आठ दिवस सरले होते,अश्याच एका अंधाऱ्या रात्री सिमांतनीच्या पोटात एकाकी कळा येऊ लागल्या सिमांतनी अंथरुणाला रेटा देत त्या कळा सहू लागली होती... अंधारी रात्र अन् गोठवलेली थंडी यामुळे तिची अजूनच जास्तीची अबळ होत होती,इतक्या सर्व थंडीतही तिला धरधरुन घाम फुटला होता,सर्व अंग घामाने घामेजलेलं झालं होतं.तिची ही अवस्था बघून तिच्या पायथ्याशी झोपलेली तिची सासुबाई जागी झाली अन् तिच्या बाळंतपणाचे शेवटचे दिवस तिच्या नजरेसमोरून तरळुन गेले... तिला हे कळुन चुकले होते की होणारा त्रास हा तिचा अन् बाळाच्या जीवाशी खेळणारा ठरु शकेल,म्हणुन तिला ज्या काही उपाययोजना करता येईल त्या तिनं केल्या.या उडालेल्या धांदलीत सिमांतनीचा दादला उठला त्याला हे सर्व नवं असल्यानं सिमांतनीकडे पाहून त्याला अपराधी वाटु लागलं,तो स्वत:ला कोसत होता,जीवाचा त्रागा करत होता काळोखाची असलेली मध्यरात्र सरता सरेनाशी झाली होती,होणाऱ्या प्रसववेदना मिनिटागणिक वाढु लागल्या होत्या... ही सर्व धांदल ऐकून ओसरीत झोपलेला सिमांतनीचा सासरा कचाकच शिव्या देत मधल्या घरात आला अन् डोळ्यासमोर असलेली

कविता माझ्या आयुष्याची..!

कविता माझ्या आयुष्याची..! स्वप्नांशीच मी बांधील राहिलो, कल्पनेतले सत्यात ते कितपत उतरले स्वप्न, कल्पनेतल्या स्वप्नांना सत्यात उत्रविण्या, मग मी झुरतच राहिलो..! बंदिस्त खोलीत मी माझ्याच राहिलो, खोलीत उतरले ते कितपत किरणं, कावड फटीतून येणाऱ्या आशेच्या तिरीपेस, मग मात्र मी बघतच राहिलो..! उन्हं कावडा पल्याडची अन्  सावलीस मी सहवत राहिलो, कुणी वार केला मग कावडावर, त्या भीतीनं मात्र मी कडी-कोंड्याच्या आत  मलाच मग बंदिस्त करत राहिलो..! ठेचकाळल्या चौकटीवरील बिजागिरी जश्या, असे वाटते की, घाव माझ्यावरीच झाले ते दगडांचे, अन् मग काय, माझ्याच आयुष्याला घेऊन मीच मला, बरबाद होतांना बघत राहिलो..! रक्ताळलेल्या हातांकडे माझ्या मी बघत राहिलो, हातांनी हातांशीच तो मागण्याचा करार केला, जेव्हा वार झाले,तेव्हा सावरले किती, तेव्हा हाताकडे बघुनच मग मी, माझ्या आयुष्याचीच गोळा बेरीज करत राहिलो अन् मग पुन्हा पुन्हा उद्याच्या उज्वल भविष्यासाठी मी भिकच मागत राहिलो..! Written by, Bharat Sonwane. Written by, Bharat Sonwane.

Travel Diary - कास पठार...!

Travel Diary - कास पठार..! बरेच दिवस झालेत निसर्ग भ्रमंतीपर कुठलेही लेखन करू शकलो नाही.कित्येक दिवसांचा मनात विचार चालू होता की,"कास पठार" विषयी लेखन करावं,परंतु हा केलेला विचार सत्यात उतरत नव्हता... कारण सोबतीला अनेक प्रश्न होती काय लिहावं..? कुठून लिहावं..?, सुरुवात कुठून करावी..?,माझ्या माहितीपर लेखातून कास पठार बघणाऱ्या पर्यटक वर्गाचं समाधान होईल का..? असे अन् अनेक प्रश्न होती... कारण "कास पठार" म्हंटले की तिथलं रम्य वातावरण अन् तिथले जग प्रसिद्ध अनेक सर्व नाजूक नजाकत असलेली फुले,झाडे,वेली,वनस्पती या सर्वांच्या सौंदर्याला न्याय मिळायला हवा असतो."कास पठार" हे त्याच्या विशेष गोष्टींमधून नेहमीच लक्षात असते,मग मी नेमकं काय लिहावं हा विचार गेले कित्येक दिवस करत होतो... तर चला आता पावसाळा परतीच्या वाटेवर आहे अन् हिवाळा आपल्या उश्याला येऊन ठेपला आहे,गेले तीन-चार दिवस पहाटे थंडीचा पारा चढता आहे.यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर समाधानकारक पाऊस पडला असल्या कारणाने,सर्वच निसर्ग हा हिरवी शाल पांघरून आपल्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत आहे... नद

गाव पोरका झाला..!

गाव पोरका झाला..! पितृपक्ष संपला पण पितृपक्षातील उन्हं अजूनही पहाटेच्या पहारे शरिराची काहीली काहीली करून जात आहे.अश्या या भरउन्हात पहाटे दहाच्या सुमाराला गावच्या जुन्या येशीतुज जाणं होतं,येशीत मधोमध असलेल्या मुंज्याला शिवनामायचे पाणी तांब्यात आणून त्याला न्हांनुंन घेतलं,कपूरची एक वडी तिथं जाळली की त्याचा येणारा सुगंध अनुभवत,यशीत डोकं टेकवून उतरतीच्या दिशेनं पावलं चालू लागली..! गावातले गुरखे रानाला,डोंगराला,धरण पाळेला असलेल्या हिरव्या कुरणाच्या रानात गाय,म्हशी,बकऱ्या चरायला घेऊन निघाले.डोईवर बांधलेलं उपरणे,कंबराला बांधलेली छोटी कुऱ्हाड,तारेच्या पिशीत भाकरीचं पेंडकं अन खांद्यात अडकवलेला रेडू घेऊन येशीतून रांनच्या वाटेला लागलं की त्यांना न्याहाळणं होतं,दूरवर त्यांच्या पावलांनी उधळलेली धुळ आसमंतात त्यांचं सकाळच्या प्रहरी अस्तित्व निर्माण करते... गावच्या नव्या तरण्या सुना हौसे खातर नदीच्या तीरावर धुने धुवायला म्हणून निघायच्या,येशीतून दहाच्या सुमाराला यांचा ऐकू येणारा गलका.नदीच्या तीरावर गुळगुळीत झालेल्या दगडांवर धुणे धुण्याचा येणारा आवाज अन् ऐकायला हव्या अश्या त्यांच्या गप्पा,मा

जगणं औद्योगिक वसाहतीचं..!

जगणं औद्योगिक वसाहतीचं..! औद्योगिक वसाहतीत काम करणारा मजूरवर्ग अन् माझे नाते मला नेहमीच खूप जवळचे वाटत आले आहे,का..? माहित नाही. औद्योगिक वसाहतीत गेलो की,माझी नजर नेहमीप्रमाणे त्या माझ्या प्रत्येक जवळच्या मजूर मित्रांना शोधत असते.कारण या प्रत्येक मित्राच्या आयुष्यामागे प्रत्येकाची एक वेगळी कथा असते,त्यांचं जीवन न अनुभवतासुद्धा फक्त पारखायची कुवत असलेली नजर असली की आपण त्यांच्या या जीवनाशी संवाद करू लागतो... मला शेतकऱ्याच्या जीवनापेक्षा काही अंशी का होईना यांचं जीवन खूप कष्टी अन् खूप काही सोसायला लावणारे वाटते.म्हणजे शेतकऱ्याचा संघर्ष काही कमी नाही तोही मी अनुभवला आहे,पिढीजात शेतकरी असल्याकारणाने पण आता सध्याची परिस्थिती बघता एकर दोन एकर शेती असलेल्यांनी शेती न केलेलीच मला योग्य वाटते,कारण शेतीत कुठलाही ताळमेळ उरलेला नाही... असो शेती हा माझा आजच्या लिखाणाचा विषय नाही, औद्योगिक वसाहतीत गेलं की काही ठराविक वेळेला तुम्हाला कावर्याबावर्या करत फिरणाऱ्या तरुणांच्या नजरा तुम्हाला दिसतील,अर्धवट शिक्षण झालेल्या अन् अलीकडे बऱ्यापैकी सुशिक्षित असलेला तरुणही यात असतो... पर्याय नाहीये का

सिमांतनी भाग - ४

सिमांतनी - भाग-४ सिमांतनी - ४ सिमांतनीचे नऊ महिने नऊ आठवड्यासारखे सरून गेले अन् ऐन बोचनाऱ्या थंडीत सिमांतनीचे दिवस भरले असल्याचे गावच्या सुईनीने सांगितले.सिमांतनी आता कुठल्याही वखताला बाळंत होईल,हे सहा बाळंतपण झालेल्या तिच्या सासुबाईला कळलं... आता मात्र सिमांतनीच्या दादला असलेला जो एकुलता एक मुलगा असा तरी या पहिल्या खेपेला सिमांतनीला व्हावा अन् तिला देवानं मोकळं करावं अन् मलाही हा नातूच व्हावा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी,असं सिमांतनीची सासू सांच्याला भांडे घासत स्वतःशीच बडबडत होती... सांच्याला जेवणं आवरून,सिमांतनीची सासू भांडे घासून तिने,सिमांतनीला अंथरूण टाकून दिलं. थंडी खूप असल्यानं अन् शेणानं सांजवेळी सारलेल्या भिंती असल्यानं घरात अजूनच हुडहुडी भरून आल्यासारखे तिला वाटत होते.तिच्या सासूने तिला खाली अंथरायला दिलेली घोंगडी चांगली उबदार असल्यानं तिनं गरमट धरली होती अन् अंगावर पांघरूण म्हणून लेपड्याची केलेली गोधडी अंगावर असल्यानं आता तिला बर वाटत होतं... सासरा महुरच्या पडवीत टाकलेल्या खाटेवर खोकत-खोकत बिड्या फुंकीत सिमांतनीच्या सासुबाईच्या आई-बापाच्या नावाचा उद्धार करत होता

सीमांतनी भाग-३

सिमांतनी भाग-३ रात्रीची भाकर खावून झाली अन् सिमांतनीने भांड्यांचा गराडा परसदारच्या अंगणात घेऊन ती भांडे घासायला बसली.तिच्या जोडीला आता सासूबाई भांडे नारळाच्या काथीने रखुंड्यात घासून देत होती अन् सिमांतनी ते भांडे हिसळून भांड्याच्या घमिल्यात टाकत होती... एरवी सिमांतनीचा सासरा बाहेर टाकलेल्या लाकडी बाजीवर खोकलत निपचित पडला होता,बिड्यांच व्यसन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यापर्यंत त्याला घेऊन आलं होतं.तो चेहऱ्यानं पार कृश झाला होता,काळा पडला होता,खोकून खोकून पार छातीचा भाता झाल्यागत त्याची छाती उघडी पडली होती... सिमांतनीच्या दादल्याने मधल्या घराच्या वळकटीत चटई अंथरली अन् गादी टाकून,अंगावर गोधडीचे पांघरूण घेऊन तो दिव्याच्या उजेडाकडे तर कधी त्याच्या सावलीकडे बघत सिमांतनीची वाट बघत लोळत पडला होता... दिवसभराच्या बकऱ्या राखणीच्या कामामुळे त्याला त्याच्या बायकोशी बोलायलासुद्धा फुरसद नसायची अन् रानात दिवसभराचा वखत कसा निघुन जातो याचीही त्याला कल्पना यायची नाही... अलिकडे सिमांतनीच्या या अडेलतडेल दिवसांत मात्र त्याला आपली तिला वेळ न देण्याची चुकी कळू लागली होती अन् तिला कमीतकमी या दि

सिमांतनी भाग-२

सीमांतनी भाग-२ अस्ताला गेलेला सूर्य अन् पूनवेचा उगवता चंद्र,कोरा चहा घश्याखाली नेऊन सोडला अन् सिमांतीने दोन्ही हात टेकवत वाढलेला पोटाचा घेर सावरत पडवीत ठेवलेल्या चहाच्या कपांना अन सकाळपासून सांजवेळेपर्यंत पडलेल्या भांड्याच्या गराड्यास मोकळ्या परसदारच्या अंगणात घासायला म्हणून घेऊन आली. पोटूशी बाई असल्यानं चिरायची कामं सबबीने तिची सासूबाई तिला करू देत नव्हती यामागे काळजी कितपत होती अन् विचारांची अंधश्रद्धा किती हे कळून चुकलंच होतं.त्याला पर्याय नव्हता काही का असेना काही कामांपासून सिमांतनीची तूर्ताच तरी सुटका झाली होती... सिमांतनी मोकळ्या अंगणात भांडे घासत बसली होती,मनात आपल्या बाळाचा चालू असलेला विचार अन् बाळासाठी असलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत असायचा,भांडी हिसळत असतांनाचा आवाच अंगणातुन महुरच्या घरापर्यंत जायचा अन् भांड्याचा आवाज जसजसा वाढायचा तसतसा सिमांतनीच्या दादल्याच्या चकरा काळजीने आत बाहेर चालू असायच्या... घमील्यात असलेल्या पाण्यात पूनवेचा उगवता चंद्र हलत्या पाण्यात हलताना तिला दिसत होता,कित्येकवेळ त्याला न्याहाळत ती भांडे घासत राहिली.दिवसभरच्या कामामुळे तिच