मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Happy New year....2020

सुरुवात करण्या आधीच काय लिहु ? व कोणत्या विषयवार लिहु ? याबद्दल काही सुचत नसल्यामुळे दोन-तीन शब्द टाइप करून पुन्हा डिलीट करतोय,पुन्हा लिहितोय,पण आज लिहायचे आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काहीतरी म्हणुन हा प्रयत्न... माझ्यासाठी २०१९ हे वर्ष शैक्षणिक,समाजिक,आर्थिक,नोकरी,लेखन,इत्यादींसाठी कसे होते ? हा प्रश्न पडला त्याला उत्तर म्हणुन हा एक प्रयत्न... हे वर्ष खरतर प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देणारे ठरले.जग झपाट्याने कसे बदलत आहे,माणसे कसे बदलत आहे,कोण चांगले कोण वाईट हे ओळखण्यासाठीचे काही प्रमाणात यावर्षी मला अनुभव आले.... प्रत्येक गोष्टींसाठी वाढलेली स्पर्धा,मेहनत घेण्याची आपल्यात असलेली कुवत व सर्वात महत्त्वाचे आपल्यातील अंतर्गत कौशल्य,राहणे,बोलणे,इतरांसमोर आपण स्वताला नकली मुखवटा न घालता कसे present करायचे हे ज्ञान  यावर्षी भेटले.मग ते शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,कुठल्याही क्षेत्रातून असो.... शिक्षण:माझ्यासाठी शैक्षणिक बाबतीत सांगायचे झाले तर हे वर्ष माझ्यासाठी सर्वात यशस्वी वर्ष आता पर्यंतचे होते. CET देऊन मी MBA सारख्या शिक्षणासाठी मी प्रवेश मिळवला,जे की माझं स्वप

अंगणी परसदारच्या सक-सकाळी भरते शाळा पक्षांची,ऐकु येता किलबिलाट कानी हौस होते साखर झोपेची....!

अंगणी परसदारच्या सक-सकाळी भरते शाळा पक्षांची,ऐकु येता किलबिलाट कानी हौस होते साखर झोपेची....! माय करत असे अंगणी सडासमार्जन,घालत असे रास रांगोळ्यांची...! बाप गोठ्यातले करत असे काम ते नित्य नियमाचे, गाय पाजत असे दूध तान्हुल्यास ते नित्य नियमाचे... घर सकाळी भासत असे गोकुळा परी मजला आवाज लहानग्यांचा,अन कल्लोळ आईच होत असे शाळेत त्यांना धाडण्या साठीचा...! आजी घालत असे पाणी मोहरच्या अंगणी तुळशी वृंदावनाला,बाबा जात असे परसदारच्या विठूमाऊली रखुमाईच्या देवळाला...! मी शोधतो हरवल्याया माझ्या आठवणींना,रोज नव्याने शहरातही या हरवलेल्या माझ्या माणसांना.... सवयीचे झाले मजला  हे शहरीपण आता,की नित्याच्या झाल्या आठवणी रमने शहरात न रमणे गावात माझे आता..... विसर पडला माझ्या माणसांचा की,मी बळी होत आहे नकली मुखवट्यांचा, नकली म्हणुन कसे चालेल आधार तेच ठरता जगण्या रोज माझ्या आता.... अंगणी परसदारच्या सक-सकाळी भरते शाळा पक्षांची,ऐकु येता किलबिलाट कानी हौस होते साखर झोपेची....! लिखित:भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र). कन्नड,औरंगाबाद.

असेच_कधीतरी_काहीतरी_सुचलेलं...

खरं सांगु का ? म्हणजे कसे होते माहीतीये का तु काही तरी शब्द द्यावा,व तो पाळण्यासाठी मग मी दिवसाचा रात्र करावा किंवा जे अशक्य आहे ते सुद्धा करून बघावे.म्हणजे इतके कसे मन गुंतत असेल काही क्षणांच्या भेटीत...... मला कधी समजले नाही,म्हणजे तु अशी काय जादू करतेस या पेक्षा असे म्हणेल की,माझ्या मनावर काय भुरळ घालते की तुझा विचार हा एक क्षण ही सोडावासा वाटत नाही.प्रत्येकदा तेच तुझे स्थुतीसुमने उधळण्याचा काम..... मला इतर कामे नसता का ? मी बांधील झालो असतो तुझा विचारान मध्ये हे आकर्षण आहे की प्रेम हे सुद्धा मला साधे समजत नाही.फक्त तुझा सौंदर्यावर फीदा होऊन,फक्त तुझा शब्द झेलावा मान्य आहे तुलाही नसते कुठली अपेक्षा माझ्याकडून पण तरीही हे गुंतणे का ? बस् मग काय अजुन तुझं ते निखळ सौदर्य,प्रेम कित्येकदा अनुभवायचे असते,त्यात जे भेटतं त्याच्या पुढे सर्व काही अपुरे आहे.... ‌#असेच_कधीतरी_काहीतरी_सुचलेलं.....

घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता...!

घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता, झाली गोळा जमा बेरीज आयुष्यातील चांगल्या क्षणांची...! घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता, जगण्याच्या या शर्यतीत माझीच माझ्याकडून हरवलेली माणसे शोधून घ्यावी म्हणतो आता...! घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता, शोधार्थ हरवलेल्या माणसांचा मी आठवणींचे काही क्षण अनुपस्थित त्यांच्या जगून घ्यावे म्हणतो आता...! घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता,ओळखीच्या माणसाला अनोळखी बघत होतो असताना त्याच्या शिवाय काही विरह क्षण जगून घ्यावे म्हणतो आता...! घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता,स्मशानी सोवळे माझी खोटे गायली जात होती पण डोहाळे जगण्याचे पुन्हा एकदा जगुन घ्यावे म्हणतो आता...! घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता...! लेखन:भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र). (कन्नड,औरंगाबाद).

पेपर जगणं शिकवणारा एक दुवा....

सकाळी सकाळी फिरायला गेले की पावले आपोआप नाक्याकडे वळतात,मग तिथे एक-दोन पेपर विकत घेतले जातात..... पेपर हे माझा आयुष्यातला खुप महत्वाचा भाग आहे,म्हणजे माझा वाईट काळात ते माझे पैसे कमविण्याचे साधन होते,फुकटचे ज्ञान मिळवण्याची पण साधन होते..... माझी सकाळ व पेपर घेण्याचे ते ठिकाण, सकाळ सकाळी बरेचसे लोक फिरून येताना पेपर,दुधाचे पाकीट,ब्रेड,इत्यादी घेऊन येत असतात..... यातलाच मी पण एक सकाळी नाक्याकडे फिरत फिरत गेलो की आपसूक पावले तिथे येऊन थांबतात.बरेच शाळा,कॉलेज चे विद्यार्थी खेड्यातून गावावरून बसणे या थांब्यावर उतरतात.... माझा सारखे फिरायला आलेलेही त्यांची उपस्थिती रोजची दर्शवत असतात,कुणी दूध, कुणी पेपर,कुणी भाजी-पाला,कुणी खारी टोस्ट विकत असते, सर्व व्यस्त असतात ज्याच्यात्याच्या कामात..... यात मला त्यांचा एक वर्ग खुप आवडतो जो फक्त पेपर वाचायला अन् घ्यायला आलेला असतो. माझा सारखी तरुण मुलं रोज आज आपल्या नशिबात नोकरी असेल म्हणून पेपर घ्यायला येतात.... कुणी नोकरी विशेष पेपर घेते,कुणी वाचनाची आवड असेल तर ज्या पेपरला चांगल्या पुरवण्या असेल तो घेता,कुणी ठराविक पेपर रोज वाचतो तर ते तो घेता,

माझीच मला चिंता आता कुठे...

माझीच मला चिंता आता कुठे ....! माझीच मला चिंता आता कुठे, आयुष्भर जगण्याचे अंदाज माझे ठरले होते खोटे...! मी गातो सोवळे आनंदाचे, त्यापरि बरे सोहळे अठरा विश्व दारिद्र्याचे...! आसवांनी भरून घेतो नयनांना,खंत आता असे कुणापाशी मोकळी वाट करून देऊ आता माझाच आसवांना...! गणिते मी त्रासलेल्या आयुष्याची रोज सोडवितो,सूत्र कधी न जुळले माझे जगण्याशी बळजबरीने आता जुळवून मी घेतो...! श्र्वासांची माळ रोज माझी जपली जाते,रितेपणाच्या या जगण्यात मात्र ती रोज खुंटीला अडकविली जाते...! प्रश्नांचे काहूर माजते रोज अंगणी माझ्या,नसे उत्तरे देण्यास मग त्यांना चौकटीस परसदारच्या झाले ओझे माझ्या...! शब्दांचेही दांड फुटावे आता,विखुरली जावी कविता माझी,नियतीस मान्य असे माझे हाल आता,झुकावे तिनेही जवळ माझा येता...! जीवना मी माझाच घडवीत जातो,गाणी मी दारिद्र्याची माझी मी माझाच माणसान पाशी गात जातो...! माझीच मला चिंता आता कुठे, आयुष्भर जगण्याचे अंदाज माझे ठरले होते खोटे...! लिखित:भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र). रा.कन्नड,औंरगाबाद.

बालपण आठवणीतले.....

लहानपण खरच किती निरागस असते नाही का ? म्हणजे त्यावेळी नसते आपल्याला कुठली समज, काय वाईट,काय चांगले फक्त पोटभर खायला, फिरायला,अन् टवाळक्या मरायला भेटलं की बस काही लागत नसायचे.... लहानपणी अनेक गोष्टींचे आकर्षण असते ते पुढे आयुष्यभर कायम सोबत असते असे मला तरी वाटते. मग ते चांगले कपडे,चांगले बुट,चप्पल,कटिंग,केव्हा आई कुठे बाहेर गेली की उंच ठिकाणी ठेवलेला साखर,शेंगदाण्याचा डब्बा काढणे असो हे आपल्याला खुप आवडायचे.... लहानपणी मला किचन मधले जवळ जवळ सर्व डब्बे कुठे असता हे पाट होते.हा साखरेचा,तो पत्तीचा,मसाल्याचा,चटणीचा,शेंगदाण्याचा, खोबऱ्याचा,लाडूचा,चिवड्याचा,सर्व... आता मात्र या उलट आहे जसा मोठा होत गेलो तसे किचनमध्ये जाणे कमी झाले.काळाच्या ओघात आता आईच म्हणते अरे खाऊन घे,भूक लागली नाही का ? अन् ते डब्बेही आता मला कुठे ठेवले आहे सापडेनासे झाले आहे.... लहानपणी माझा दिनक्रम एकूण असा असायचा   मोठा दादा व एक छोटी दीदी आहे मला.मग लहानपणी दादा शाळेत जायचा तेव्हा त्याचे अनुकरण मी करायचो.... मग मलापण त्याच्या सारखे दप्तर,पुस्तक,पाटी होती,डब्बा होता मग दादा शाळेत गेला की माझी शाळा आमच्या ओट्याव

संवादावाचुन_अनुत्तरित_राहीलेली_भेट

कधी कधी मला काय होते कुणास ठाउक मी असं वेगळं काही दृश्य बघितले,की माझ्या आतला तो लेखक जागा होतो..... त्याच क्षणाला असे वाटत असते की या क्षणाला टिपून टाकावं पानावर, म्हणजे ते लिखित स्वरूपात तरी माझ्याकडे आठवणीत राहतील. कधी कधी ती डायरीचे पान पलटी केली तर येईल ते पानही समोर अन् ती आठवणही..... तर तो दिवस नेहमी सारखाच भासत होता,मी पण  आवरले अन् परिक्षा असलेल्या ठिकाणी वेळेच्या एक तास आधीच जाऊन तिथं उपस्थित होतो..... म्हणजे माझी ही सवय आहे,की मी कुठंही ठरवून दिलेल्या वेळेच्या कमीत कमी ३०मिनिटे आधी जातो मग काम कोणतेही असो कुणाला भेटणे असो,केव्हा कामा निमित्त असो पण दिलेली वेळ पाळायला मला आवडते..... नेहमीप्रमाणेच मी तिथे पोचलो,मग पुन्हा एकदा पाठांतर म्हणून मोबाईल मध्ये असलेली पीडीएफ फाईल मी वाचत बसलो होतो.परीक्षेचे टेन्शन होतेच,सवयी प्रमाणे परिसर न्याहाळत होतो..... समोर इंजिनिअरिंगचे कॉलेज असल्यामुळे अनेक मुलं मुली ये-जा करत होत्या,परीक्षसाठी साठी येणारे मुलंही हळू हळू येत होती. मी झाडाला केलेल्या त्या छोटेखानी भिंती वर बसून वाचत होतो..... कुणी हातात चहाचा कप घेऊन चाले होते,कुणी

संवादावाचुन_अनुत्तरित_राहीलेली_भेट

कधी कधी मला काय होते कुणास ठाउक मी असं वेगळं काही दृश्य बघितले,की माझ्या आतला तो लेखक जागा होतो..... त्याच क्षणाला असे वाटत असते की या क्षणाला टिपून टाकावं पानावर, म्हणजे ते लिखित स्वरूपात तरी माझ्याकडे आठवणीत राहतील. कधी कधी ती डायरीचे पान पलटी केली तर येईल ते पानही समोर अन् ती आठवणही..... तर तो दिवस नेहमी सारखाच भासत होता,मी पण  आवरले अन् परिक्षा असलेल्या ठिकाणी वेळेच्या एक तास आधीच जाऊन तिथं उपस्थित होतो..... म्हणजे माझी ही सवय आहे,की मी कुठंही ठरवून दिलेल्या वेळेच्या कमीत कमी ३०मिनिटे आधी जातो मग काम कोणतेही असो कुणाला भेटणे असो,केव्हा कामा निमित्त असो पण दिलेली वेळ पाळायला मला आवडते..... नेहमीप्रमाणेच मी तिथे पोचलो,मग पुन्हा एकदा पाठांतर म्हणून मोबाईल मध्ये असलेली पीडीएफ फाईल मी वाचत बसलो होतो.परीक्षेचे टेन्शन होतेच,सवयी प्रमाणे परिसर न्याहाळत होतो..... समोर इंजिनिअरिंगचे कॉलेज असल्यामुळे अनेक मुलं मुली ये-जा करत होत्या,परीक्षसाठी साठी येणारे मुलंही हळू हळू येत होती. मी झाडाला केलेल्या त्या छोटेखानी भिंती वर बसून वाचत होतो..... कुणी हातात चहाचा कप घेऊन चाले होते,कुणी मोबाईल

परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

शनिवारच्या संच्याला शहरातून परीक्षा देऊन गावाला आलो,रैवारची सुट्टी असल्यामुळे अन् शतात बरचसं काम करायचं बाकी असल्यामुळे घरच्याला आलो.... अंगात ताव आला होता,सततचा झालेला प्रवास सकाळच्याला अंगाला झोंबणारा वारा,फकस्त नाकातून रगत येण्याचं बाकी ठेवत हुता,अंगात हुडहुडी भरली हुती.... आलो तस पलंगावर जाऊन पडलो,तेच सकाळच्याला उठलो.पारावर जाऊन यरंडाणा दात घासले,मग कुठं जीवाला शांतता मिळाली.... गरम बकरीचा दुधाचा गिल्लासभर चहा त्यात दोन बटर कोंबून चमच्याने खाता झालो,मायना चुलीवर मेथीची भाजी अन् भाकर केली. पेंडक्यात गुंडाळून,कडीच्या डब्ब्यात भाजी घेऊन मी अन् माय फावड घेऊन,वावरात जायला बिगी बीगी निघालो.... सकाळची लहीन आली हुती मोटार चालू करून, गव्हाला पाणी भरत बसलो हुतो.माय बांधावरल गवत खुरपत बसली हुती.... जसजसं ओला हुत हुतो,तसतसा अंगात ताव यत हूता,पाय जड पडत हुते,पोटर्या गरम हूत हुत्या, अन् डोक्याला धस्का घ्यावा वाटत हुतं. दुपारच्याला भाकर खाऊन,पाणी भरल अन् सानच्याला जरा लवकरच घरला आलो..... मातीच्या कोरड्या पायाला घेऊनच फरशीवर लोळत पडलो हूतो,मग मायना गरम पाणी हातपाय द्युयाला काढून दिलं,हातपाय