घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता,
झाली गोळा जमा बेरीज आयुष्यातील चांगल्या क्षणांची...!
घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता,
जगण्याच्या या शर्यतीत माझीच माझ्याकडून हरवलेली माणसे शोधून घ्यावी म्हणतो आता...!
घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता,
शोधार्थ हरवलेल्या माणसांचा मी आठवणींचे काही क्षण अनुपस्थित त्यांच्या जगून घ्यावे म्हणतो आता...!
घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता,ओळखीच्या माणसाला अनोळखी बघत होतो असताना त्याच्या शिवाय काही विरह क्षण जगून घ्यावे म्हणतो आता...!
घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता,स्मशानी सोवळे माझी खोटे गायली जात होती पण डोहाळे जगण्याचे पुन्हा एकदा जगुन घ्यावे म्हणतो आता...!
घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता...!
लेखन:भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र).
(कन्नड,औरंगाबाद).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा