माझीच मला चिंता आता कुठे ....!
माझीच मला चिंता आता कुठे,
आयुष्भर जगण्याचे अंदाज माझे ठरले होते खोटे...!
मी गातो सोवळे आनंदाचे,
त्यापरि बरे सोहळे अठरा विश्व दारिद्र्याचे...!
आसवांनी भरून घेतो नयनांना,खंत आता असे कुणापाशी मोकळी वाट करून देऊ आता माझाच आसवांना...!
गणिते मी त्रासलेल्या आयुष्याची रोज सोडवितो,सूत्र कधी न जुळले माझे जगण्याशी बळजबरीने आता जुळवून मी घेतो...!
श्र्वासांची माळ रोज माझी जपली जाते,रितेपणाच्या या जगण्यात मात्र ती रोज खुंटीला अडकविली जाते...!
प्रश्नांचे काहूर माजते रोज अंगणी माझ्या,नसे उत्तरे देण्यास मग त्यांना चौकटीस परसदारच्या झाले ओझे माझ्या...!
शब्दांचेही दांड फुटावे आता,विखुरली जावी कविता माझी,नियतीस मान्य असे माझे हाल आता,झुकावे तिनेही जवळ माझा येता...!
जीवना मी माझाच घडवीत जातो,गाणी मी
दारिद्र्याची माझी मी माझाच माणसान पाशी गात जातो...!
माझीच मला चिंता आता कुठे,
आयुष्भर जगण्याचे अंदाज माझे ठरले होते खोटे...!
लिखित:भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र).
रा.कन्नड,औंरगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा