मुख्य सामग्रीवर वगळा

परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

शनिवारच्या संच्याला शहरातून परीक्षा देऊन गावाला आलो,रैवारची सुट्टी असल्यामुळे अन् शतात बरचसं काम करायचं बाकी असल्यामुळे घरच्याला आलो....

अंगात ताव आला होता,सततचा झालेला प्रवास सकाळच्याला अंगाला झोंबणारा वारा,फकस्त नाकातून रगत येण्याचं बाकी ठेवत हुता,अंगात हुडहुडी भरली हुती....

आलो तस पलंगावर जाऊन पडलो,तेच सकाळच्याला उठलो.पारावर जाऊन यरंडाणा दात घासले,मग कुठं जीवाला शांतता मिळाली....

गरम बकरीचा दुधाचा गिल्लासभर चहा त्यात दोन बटर कोंबून चमच्याने खाता झालो,मायना चुलीवर मेथीची भाजी अन् भाकर केली. पेंडक्यात गुंडाळून,कडीच्या डब्ब्यात भाजी घेऊन मी अन् माय फावड घेऊन,वावरात जायला बिगी बीगी निघालो....

सकाळची लहीन आली हुती मोटार चालू करून, गव्हाला पाणी भरत बसलो हुतो.माय बांधावरल गवत खुरपत बसली हुती....

जसजसं ओला हुत हुतो,तसतसा अंगात ताव यत हूता,पाय जड पडत हुते,पोटर्या गरम हूत हुत्या, अन् डोक्याला धस्का घ्यावा वाटत हुतं. दुपारच्याला भाकर खाऊन,पाणी भरल अन् सानच्याला जरा लवकरच घरला आलो.....

मातीच्या कोरड्या पायाला घेऊनच फरशीवर लोळत पडलो हूतो,मग मायना गरम पाणी हातपाय द्युयाला काढून दिलं,हातपाय धुतले.चुली जवळ जाऊन बसलो शखा समोर जरा आराम वाटत हुतं,सांच्याला बेसन भाकर खाले....

उपरण्यानाने डोक्याला बांधून,नाकाला.छातीला झंडू बाम लाऊन अंगावर गोधडी घेऊन जे झोपलो तेच सकाळच्याला उठलो.माय थकली असल्यामुळे चुलीवर पाणी ठून,दात घासत बसलो,अंघोळ करून तयार झालो.....

बापानं आयुष्भर पाईपाई जमा करून घेऊन दिलेल्या गाडीला पुसल,बूट सोक्स,कॉलेजचं दप्तर,हेल्मेट घेऊन मायला सांगून,मोरच कावड लाऊन पुन्हा शहराला गेलो.....

आज शेवटचा प्पेपर दय्याएला आलो हुतो,नव्हतं कुठल गाईड,नव्हतं कूठल काही.भर रस्त्याने विचार करत होतो काय लिहावं पेपरात? काय यनार पेपरात?

पेपर हुता IT FOR MANAGER चा,आयुष्याचा मॅनेजर रोजच काहीतरी नवीन शिकवत हूता,मग  काय गरज या कागदाची,पण माणसं पेक्षा या कागदाला हल्ली ज्यादा महत्त्व द्यायला लागला होता माणूस आता....

#परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

लिखित: भारत सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औंरगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...