अंगणी परसदारच्या सक-सकाळी भरते शाळा पक्षांची,ऐकु येता किलबिलाट कानी हौस होते साखर झोपेची....!
माय करत असे अंगणी सडासमार्जन,घालत असे रास रांगोळ्यांची...!
बाप गोठ्यातले करत असे काम ते नित्य नियमाचे, गाय पाजत असे दूध तान्हुल्यास ते नित्य नियमाचे...
घर सकाळी भासत असे गोकुळा परी मजला आवाज लहानग्यांचा,अन कल्लोळ आईच होत असे शाळेत त्यांना धाडण्या साठीचा...!
आजी घालत असे पाणी मोहरच्या अंगणी तुळशी वृंदावनाला,बाबा जात असे परसदारच्या विठूमाऊली रखुमाईच्या देवळाला...!
मी शोधतो हरवल्याया माझ्या आठवणींना,रोज नव्याने शहरातही या हरवलेल्या माझ्या माणसांना....
सवयीचे झाले मजला हे शहरीपण आता,की नित्याच्या झाल्या आठवणी रमने शहरात न रमणे गावात माझे आता.....
विसर पडला माझ्या माणसांचा की,मी बळी होत आहे नकली मुखवट्यांचा,
नकली म्हणुन कसे चालेल आधार तेच ठरता जगण्या रोज माझ्या आता....
अंगणी परसदारच्या सक-सकाळी भरते शाळा पक्षांची,ऐकु येता किलबिलाट कानी हौस होते साखर झोपेची....!
लिखित:भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).
कन्नड,औरंगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा