सकाळी सकाळी फिरायला गेले की पावले आपोआप नाक्याकडे वळतात,मग तिथे एक-दोन पेपर विकत घेतले जातात.....
पेपर हे माझा आयुष्यातला खुप महत्वाचा भाग आहे,म्हणजे माझा वाईट काळात ते माझे पैसे कमविण्याचे साधन होते,फुकटचे ज्ञान मिळवण्याची पण साधन होते.....
माझी सकाळ व पेपर घेण्याचे ते ठिकाण,
सकाळ सकाळी बरेचसे लोक फिरून येताना पेपर,दुधाचे पाकीट,ब्रेड,इत्यादी घेऊन येत असतात.....
यातलाच मी पण एक सकाळी नाक्याकडे फिरत फिरत गेलो की आपसूक पावले तिथे येऊन थांबतात.बरेच शाळा,कॉलेज चे विद्यार्थी खेड्यातून गावावरून बसणे या थांब्यावर उतरतात....
माझा सारखे फिरायला आलेलेही त्यांची उपस्थिती रोजची दर्शवत असतात,कुणी दूध, कुणी पेपर,कुणी भाजी-पाला,कुणी खारी टोस्ट विकत असते, सर्व व्यस्त असतात ज्याच्यात्याच्या कामात.....
यात मला त्यांचा एक वर्ग खुप आवडतो जो फक्त पेपर वाचायला अन् घ्यायला आलेला असतो. माझा सारखी तरुण मुलं रोज आज आपल्या नशिबात नोकरी असेल म्हणून पेपर घ्यायला येतात....
कुणी नोकरी विशेष पेपर घेते,कुणी वाचनाची आवड असेल तर ज्या पेपरला चांगल्या पुरवण्या असेल तो घेता,कुणी ठराविक पेपर रोज वाचतो तर ते तो घेता, इथे ज्याची त्याची आवड समजत असते.....
खुप वेगवेळे पेपर आलेले असतात,मी इथे काम केले आहे म्हणून मला सर्व पेपर माहीत आहे.जसे सकाळ,लोकमत,पुण्यनगरी,पुढारी,आनंद नगरी,मुंबई चौफेर,गावकरी अग्रोवन,सम्राट,दिव्य मराठी,दैनिक भास्कर,देशोन्नती,सामना,लोकमत टाइम्स,नोकरी विशेष,इंडियन टाइम्स,इंडियन एक्स्प्रेस, क्राईम नामा,काली गंगा,पोलिस टाइम्स टाइम्स,अनेक दिवाळी अंक, शेती व्यवसाय विशेष अंक,आंबट शौकीन लोकांसाठी सुद्धा खुप मासिक उपलब्ध असतात.....
एकूण काय पूर्ण जग आपल्याला या टेबलवर उपलब्ध झालेले असते.आजही मी कधी कधी आवर्जून पेपर विकणाऱ्या मुलाला काही काम असले की अर्धा पाऊण तास त्याला मदत म्हणून नाक्यावर पेपर विकत बसतो.....
छान वाटत असते पुन्हा ते बालपण आठवते, अनेक माणसे,अनेक विचार करणारे कोण कसे इथे सगळे समजते.एक खंत मात्र मनात कायम साठी राहून गेली आहे या पेपर विकणाऱ्यांसाठी, जे आपल्या देशाचे,भावी पिढीचे देणे लागतात त्यांना कुठीली सुविधा उपलब्ध नाही.....
आजही मी बऱ्याच वर्ष पासून पाहतो त्यांचे काऊंटर बदलेले नाही आहे, त्यांना पावसापासून सुरक्षा म्हणून अजूनही जागा उपलब्ध नाही आहे. एकूण वाईट आहे सर्व पण ते याचा फार विचार करत नाही.....
सकाळी उठून पूर्ण शहराला हातात चहासोबत पेपर कसा मिळेल याची ते पुरेपूर काळजी घेत असतात,यामुळे नेहमीच यांचे अप्रूप वाटत असते. एकच इच्छा कायम असेल,वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे त्यांना एक हक्काची जागा उपलब्ध व्हावी. ही सुविधा परदेशात उपलब्ध आहे कुठेतरी अभाव फक्त आपल्या देशात आहे.....
#पेपरजगणंशिकवणाराएकदुवा.....
लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औंरगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा