मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"गाफील"

गाफील..! मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते.... मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांचे "गाफील" हे पुस्तक काल वाचले.एकूण "२९१" पानांचे असलेले हे पुस्तक आपल्याला पुस्तकाचा नायक फिरोजसोबत अनेक वळणांवर फिरून आणते... "सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेले हे खूप उंचीचे अन् प्रत्येकाने "सुहास शिरवळकर" यांचे समग्र साहित्य वाचताना आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे जे की आपण एकदा पुस्तक वाचायला घेतले की शेवटपर्यंत बसल्याजागी बसून ठेवते... फिरोज इराणी नावाचं पात्र किंवा या पुस्तकाचा नायक या पुस्तकातील तीन कथा किंवा त्यांच्या आयुष्यात नसत्या लफड्यात पडल्यामुळे आलेली ही तीन वळणे आहे,जी प्रत्येकवेळा पुस्तकाच्या नावाप्रमाणे "गाफील" राहिल्यामुळे नेहमीच झालेली त्याची फसगत आणि सग

मलाला..! Bharat.L. Sonawane.

मलाला..! -भारत सोनवणे. "मलाला" "साकेत प्रकाशन" कडून प्रकाशित केलेलं लेखक "बाबा भांड" यांचं हे पुस्तक. शांततेचा नोबेल मिळवणाऱ्या व जगातील गरीब समूहातील एकही मुलगा शिकण्यासाठी वंचित नाही राहिला पाहिजे यासाठी सतत आपल्या कार्यातून जगाला प्रेरित करणाऱ्या मलाला युसूफझाई यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेणारे हे पुस्तक... सोबतच त्यांच्या आयुष्यात हे सर्व परिवर्तन घडून आणण्यासाठी त्यांना आलेल्या असंख्य अडचणी,पुढे त्यांनी ठरवलेल्या गोष्टीत त्यांना यश मिळणे यासर्व प्रवासाला कैद करण्याचं काम लेखक "बाबा भांड" यांनी "मलाला" या ९५ पानांच्या पुस्तकांत केलेलं... एका बैठकीत वाचून पूर्ण होणारे पुस्तक आपल्या आयुष्यात आपल्याला खूप प्रेरणादायी ठरणारे आहे... मुळातच "मलाला युसूफझाई" यांचे कार्य कुणाला माहित नाही पण या यशस्वितेच्या पलीकडेही त्यांना हे सर्व करण्यासाठी किती अडचणी आल्या हा सर्व प्रवास सांगणारं हे पुस्तक आहे.... मलाला युसूफझाई (पश्तो: ملاله یوسفزۍ‎; उर्दू: ملالہ یوسف زئی; जन्म: १२ जुलै १९९७, मिंगोरा, नॉर्थवेस्ट फ्रंट

स्ट्रीट लाईट अन् कैफाच्या दुनियेत..!

स्ट्रीट लाईट अन कैफाच्या दुनियेत... फार काही नाही पण अलिकडे मला सांजवेळी सूर्य अस्ताला गेला की काहीही कारण नसताना घराबाहेर पडावेसे वाटते.म्हणजे मनाचा विचार केलातर एक कारण असते पण ते कारण कित्येकांना कारण वाटणार नाही...कैफात जीवन जगणारे असेच असतात,त्यांना नेहमीच त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं बघायचं असतं,नेमकं माझ्या बाबतीत मनाचा समतोल सोबतच इतर विचार केला की काही गोष्टी अश्याच घडतात... तर काही वर्षांपूर्वी मी एक लेख असाच लिहून ठेवला आहे की माणसाचं आयुष्यही सांजेच्यावेळी असो किंवा भर मध्यरात्री चमकणाऱ्या त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडासारखे असते...कधीतरी पुढे चालून कॉम्प्युटरमध्ये माझ्या लिखाणाच्या काही फाईल सेव्ह करून ठेवायच्या झाल्यातर मी या स्ट्रीट लाईटच्या उजेडावार अन् त्याखाली बसून किंवा त्याच्या सावलीत चालणाऱ्या,त्या विचार करणाऱ्या व्यक्तीवर लिहून ठेवणार आहे.... मला आयुष्यात फार प्रिय कुठली माणसे असतील तर ती तीच आहे जी सूर्य अस्ताला गेला की,फिरून घरी परतत असताना न चुकता स्ट्रीट लाईटच्या स्विचचे बटन चालू करतात,पहाटे बरोबर सकाळी फिरायला आले की पुन्हा बंद करतात. का..?  माहित न

पाचूचे बेट...

पाचूचे बेट..! काळ आहे इ.स. १८४१ सालचा युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा हा काळ.एकदाका जहाज समुद्र सफरीवर निघाले मग काही महिने किंवा वर्ष उलटुन जायचे तरीही समुद्रसफर चालू असायची,परतीची वाट त्यांना तेव्हाच खुणावत असायची जेव्हा आपण परत जाताना काहीतरी चांगला ऐवज घेऊन जावू... नाहीतर त्यांना हे समुद्रात भटकत राहणे योग्य वाटायचं पण त्यांचा परतीच्या ठिकाणावर,बंदरावर झालेला अपमान त्यांना नकोसा वाटायचा... तर अश्याच हजारो सफरीं पैकी ही एक सफर,जी संपूर्ण सहा महीने जमिनीला न बघता चालू होती अन् आता "डॉली" नामक जहाजावरील सर्व खलाशी पुन्हा एकदा जमीन बघण्यास आतुर झाले होते.जहाजाचे कॅप्टन काही केल्या जहाजेचा नांगर टाकण्यासाठी तयार नाहीये,अखेर खूप विनवण्या अन जहाजावरील सामान,खाद्य संपल्यामुळे व त्यांच्या इतर कामाच्या वेगळ्या भागामुळे अखेर  नांगर टाकले गेले आणि ते पॉलिनेशियन बेटांवर पोहचले... अन् मग इथून सुरू होतो तो रंजक प्रवास कादंबरीचा.... एकोणिसाव्या शतकातील न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध लेखक आणि तनमनाने दर्यावर्दी असलेले "हर्मन मेलव्हिल" यांनी १८४१ मध्ये

ईमेल आणि बरच काही..!

ईमेल आणि बरच काही..! काळाच्या ओघात जश्या काही गोष्टी बदलत,गेल्या काही काळाच्या पडद्याआड गेल्या तसेच...पण विचार केला तर जरासे वेगळं काही अलीकडे आयुष्याच्या या वळणावर घडत आहे. अन् ते साहजिक आहे वयापरत्वे ते घडणार असतेच,फक्त हे कुणाला आपसुकच कळते,तर कुणाला याचा थांगपत्ताही लागत नाही किंवा कुणाच्या आयुष्यात या सर्व गोष्टींची कधी तजवीज भासतच नाही...                                                    हो नाहीच भासत कारण त्यांचं जीवन आधिकच तितकं सोयीचं असतं की,नाही वाटत कुठलीही कमतरता त्यांना की कुठलीही उणीव आपल्या आयुष्यात.... हो अलिकडे गेले काही महिने वर्षानुवर्ष कधीही न उघडणारा माझा E-Mail आयडी अलिकडे रोजच मी उगडून बघत असतो.एक दोन वेळा नाही तर दिवसातून जेव्हा सवड मिळत असेल तेव्हा मी तो उघडुन बघत असतो. अलिकडे एक एकवेळ फेसबुक वरती येणं होत नाही,Update राहायला जमत नाही,तितकं तिथे मात्र मी न चुकता रोजची आलेली मेल्स चेक करत असतो एक नाही दोन नाही रोजची कित्येक मेल्स असतात.... कधीतरी कुठल्या ठिकाणी जागा निघाल्या आहेत,मग मी जॉब शोधत आहे म्हणुन आलेला मेल असेल तर कधी कॉलेजमध्ये काही काम न

#रुजलीजातजीमाझ्याआतआहे..!

#रुजलीजातजीमाझ्याआतआहे..! #रुजलीजातजीमाझ्याआतआहे..! रुजली जात जी माझ्या आत आहे, ती जात नाही तीच ती कविता आहे...!!धृ !! तू बोलायचे ठरवले जरी, तरी मी मात्र अबोला माझा पाळणार आहे, अन् तू का शोधते कारण बोलायचे मी बोलायचे तूर्ताचतरी नाकारले आहे!!१!! मी गेल्या वेळी वेळेशी बोललो, थांब तू माझ्यासाठी आता काळही थांबला आहे, अन् बाकी वेळ,काळ यांचा मेळ अजूनही तुझ्या माझ्यासारखाच जुळता जुळत आहे!!२!! बाकी कविता केल्या असशील तू कैक, मी तुझ्या कवितांना भुलणारा गंधार नाही, अन् तू सावर स्वतःला अन् मीच झालो कविता होण्यासाठी तुझ्या पैक!!३!! तू कवितेतून हृदयाशी संगम जो माझ्या केला, आता सावर तुझी तू आणि सावर तुझी कविता, अन् जुळावे यमक इतकेही न सोप्पे माझ्याशी खेळण्या कवितेतूनी तू जो करार केला!!४!! बाकी तुझ्यामुळे स्वल्पविरामाची ओळख कवितेतून झाली, तू माझ्यावरती,माझ्या भुलण्यावरती कविता करत राहिलीस, अन्, माझ्या आयुष्याच्या या आगळ्यावेगळ्या कवितेत मी मात्र तुजसम पूर्णविराम शोधत राहिलो!!५!! Written by, Bharat Sonwane.

आयुष्याची गणितं..!

आयुष्याची गणितं..! सांज सरली सूर्य अस्ताला गेला अन् माझी सायंकाळी घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात,टेकडीच्या रानात फिरण्याची वेळही संपली तसा मी परतीच्या वाटेला लागलो... सध्या अलिकडच्या काळात आयुष्यात काही फार घडत नाहीये,येणारा प्रत्येक दिवस सारखा आहे.हे किती दिवस अजुन असे चालणार आहे याचंही उत्तर नाहीये माझ्याकडे,म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या माझ्या या अवस्थेला आणि सोबतच पडणाऱ्या प्रश्नांना कुठलीच उत्तरे नाहीये... मी काय करतोय..? मला काय करायचं आहे..? मी कश्यासाठी जगतोय..? अन् या सर्वांशी लागून असलेला अन् सर्वात छळनारा प्रश्न हा आहे की, मला भविष्यात काय करायचं आहे..? सोबतच मी कुठल्या भरवश्यावर भविष्याकडे अन् आयुष्याच्या पुढील स्थिर काळाकडे बघतो..? तर असे अन् अनेक प्रश्न हल्ली मनात मनाकडून येत असतात.मग त्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणतो तसं मनचेच ठरलेले उत्तरं,ज्यातून फक्त क्षणिक समाधान मिळत असते.परंतु सध्या मनाला इतर चुकीच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी हे ही नसे थोडके... असो माझं चालायचंच.... तर नेहमीप्रमाणे मी परतीच्या वाटेवर चालत होतो,लिखाणात क्षण साधायल

गिरगांव भोंगे..!

गिरगांव भोंगे..! #गिरगांवभोंगे... मी ऐकलं होतं की एक काळ होत जेव्हा मुंबईत घड्याळी नव्हत्या,तेव्हा मुंबई घड्याळाच्या ठोक्यावर न चालता गिरगावचा वसाहतीमध्ये असलेल्या गिरण्यावर असलेल्या भोंग्यावर चालायची.गिरगावच्या अन् आसपासच्या परिसरातील सर्व गिरण्या हळू हळू बंद पडल्या अन् हा परिसर खुप भकास,भयानक भासू लागला. बंद पडलेल्या गिरण्यांचा परिसर इतका भकास जाणवू लागला की,रातच्याला इकडे कुत्रेही भटकायला येईना झालं जे एखादं आलं ते रातभर इवळून पार मरायला यायचं.बंद पडलेल्या गिरण्या अन् त्याचे मोठमोठाले गोडावून तर काळाच्या आड आपलाही एक काळ होता याची हजेरी देत,भिंतींच्या पोपड्यासंगत स्वराज्याचा बुरुज ढासळला जावा तश्या या इतिहासाच्या खुणा मागे सोडत पडत राहिल्या... पुढे याच गिरण्या अनेक कारणांनी चर्चेत राहिल्या,कधीतरी कुणाचा रातोरात त्यांच्या गर्भात एखाद्या अर्भकाला मारून टाकावं तसं भोसकून मारून टाकलं गेलं अन् गिणती करता येणार नाही अशे कित्येक चेहरे ईथल्या चुप्या नशेच्या आहारी जावून आपल्याच हाताने पोटात खंजीर खुपसून काचेच्या तसबीरित जावून बसले.आता खरं काय,खोटं काय कित्येक गरिबांच्या कित्येक श

आसऱ्या आई अन् तरणी लेक..!

आसऱ्या आई अन् तरणी लेक..! सकाळ सरली दहाच्या ठोक्याला पावले झाडांच्या पडसावलीत तापलेल्या जमिनीवर सावरत सावलीच्या आधारे नदीच्या वाटेनं चालत होती.दहा मिनटे झाले,वीस झाले,बारा वाजले तरीही पावलं चालत होती,रस्त्यानं अधुनमधून गुलमोहराच्या फुलांच्या सड्याखेरिच काहीही नजरी पडत नव्हतं.... रस्त्याच्या एकांगी नदीच्या तीराला बेश्रमाचे वाढलेले झाडं त्याला आलेले आकाशी निळसर फुलामुळे जीव खालीवर होत होता. कारण ते दिसायला खूप भयावह अन् काळजाला धडकी भरवणार होतं,अश्यातूनही वाट काढत महादेवाच्या मंदिरासमोर नदी थडीवर नदीत जाणाऱ्या पायऱ्यावर घटकाभर बसून राहिलो... का बसलो..?, कश्यासाठी बसलो..? काय भेटलं बसून..? याला उत्तरे नव्हते,फक्त मनाला विरंगुळा अन् एकांतात काही काळ समाधी लागेल म्हणुन बसून राहिलो होतो... समाधी लागणे काही माझ्या हातचे नव्हते,कारण मनात चालू असलेल्या असंख्य अडचणी,त्यांनी केलेली प्रश्न,त्यांना दिलेली उत्तरे अन् अजुन भूतकाळ,वर्तमान काळ अन् सोबतच खायला उठलेला भविष्यकाळ.बाकी प्रश्न,प्रश्न,उत्तरे,मनाची खोटी समज अन् हजारो हालचाली एका ठिकाणी राहून संपूर्ण विश्वात भटकून येण्याची भावना...