मुख्य सामग्रीवर वगळा

मलाला..! Bharat.L. Sonawane.

मलाला..!
-भारत सोनवणे.

"मलाला" "साकेत प्रकाशन" कडून प्रकाशित केलेलं लेखक "बाबा भांड" यांचं हे पुस्तक.
शांततेचा नोबेल मिळवणाऱ्या व जगातील गरीब समूहातील एकही मुलगा शिकण्यासाठी वंचित नाही राहिला पाहिजे यासाठी सतत आपल्या कार्यातून जगाला प्रेरित करणाऱ्या मलाला युसूफझाई यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेणारे हे पुस्तक...

सोबतच त्यांच्या आयुष्यात हे सर्व परिवर्तन घडून आणण्यासाठी त्यांना आलेल्या असंख्य अडचणी,पुढे त्यांनी ठरवलेल्या गोष्टीत त्यांना यश मिळणे यासर्व प्रवासाला कैद करण्याचं काम लेखक "बाबा भांड" यांनी "मलाला" या ९५ पानांच्या पुस्तकांत केलेलं...
एका बैठकीत वाचून पूर्ण होणारे पुस्तक आपल्या आयुष्यात आपल्याला खूप प्रेरणादायी ठरणारे आहे...

मुळातच "मलाला युसूफझाई" यांचे कार्य कुणाला माहित नाही पण या यशस्वितेच्या पलीकडेही त्यांना हे सर्व करण्यासाठी किती अडचणी आल्या हा सर्व प्रवास सांगणारं हे पुस्तक आहे....

मलाला युसूफझाई (पश्तो: ملاله یوسفزۍ‎; उर्दू: ملالہ یوسف زئی; जन्म: १२ जुलै १९९७, मिंगोरा, नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स) ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिकविजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे.तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. ह्या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच ह्या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.


९ ऑक्टोबर २०१२ रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर तीन गोळ्या झाडल्या. ह्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मलालाला उपचारांसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये हलवण्यात आले. मलालावरील ह्या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्रीशिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले...

१० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक तिला भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून दिले गेले. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिकविजेती आहे. पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना तिने तीव्र विरोध केला.पाकिस्तानातल्या परिस्थितीचं भीषण चित्रण करण्यासाठी तिने एका वर्तमानपत्रात 'गुलमकई' या नावाने डायरी लिहिली आहे. "एक पुस्तक,एक लेखणी ,एक बालक आणि एक शिक्षक अवघे जग बदलू शकते " हा विचार तिने मांडला.

मलालाचा जीवनप्रवास खूप खडतर अन् अश्या अनेक अडचणींना सामोरे जाण्याचा आहे त्यासाठी नक्कीच एकदा हे पुस्तक वाचायला हवं आहे...

Written by,
Bharat.L.Sonawane.
9307918393.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...