आयुष्याची गणितं..!
सांज सरली सूर्य अस्ताला गेला अन् माझी सायंकाळी घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात,टेकडीच्या रानात फिरण्याची वेळही संपली तसा मी परतीच्या वाटेला लागलो...
सध्या अलिकडच्या काळात आयुष्यात काही फार घडत नाहीये,येणारा प्रत्येक दिवस सारखा आहे.हे किती दिवस अजुन असे चालणार आहे याचंही उत्तर नाहीये माझ्याकडे,म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या माझ्या या अवस्थेला आणि सोबतच पडणाऱ्या प्रश्नांना कुठलीच उत्तरे नाहीये...
मी काय करतोय..?
मला काय करायचं आहे..?
मी कश्यासाठी जगतोय..?
अन् या सर्वांशी लागून असलेला अन् सर्वात छळनारा प्रश्न हा आहे की,
मला भविष्यात काय करायचं आहे..?
सोबतच मी कुठल्या भरवश्यावर भविष्याकडे अन् आयुष्याच्या पुढील स्थिर काळाकडे बघतो..?
तर असे अन् अनेक प्रश्न हल्ली मनात मनाकडून येत असतात.मग त्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणतो तसं मनचेच ठरलेले उत्तरं,ज्यातून फक्त क्षणिक समाधान मिळत असते.परंतु सध्या मनाला इतर चुकीच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी हे ही नसे थोडके...
असो माझं चालायचंच....
तर नेहमीप्रमाणे मी परतीच्या वाटेवर चालत होतो,लिखाणात क्षण साधायला जमत असल्याकारणाने अलिकडे माझी नजर सतत काहीतरी शोधत असते,ज्यावर मी काहीतरी लिहू शकेल.
कित्येकदा मनात खूप काही येऊन कागदावर उतरवन्यापूर्वी मी ते विसरून जातो,पण कधी काही क्षण आपल्या आपण जगत असलेल्या क्षणांवरती,परिस्थितीशी मिळते जुळते अन् घाव घालणारे ठरतात...
त्यामुळे कधी कधी लिखाणात ते क्षण साधायला जमणे हे फार दुःखाचं वाटतं....
तर मी माझ्या वाटेनं चाललो होतो,माझ्या सारखी तरुण मुलं मैदानात व्हॉलीबॉल,फुटबॉल,क्रिकेट खेळत होती,काही तरुण जोडपी,तरुण,तरुणी एव्हॅनिंग वॉकसाठी ट्रेकवरती झपझप चालत होती,एरवी माझी Exercise झाली अन् मी हळुवार चालत हे सर्व दृश्य न्याहाळत होतो...
तितक्यात दोन लहानगे ट्रेकवरती पळताना दिसले,साधारण चार- पाच वर्षांची असावी गोड,चुणचुणीत मस्त नाईट टी शर्ट,पँट, शूज घातलेली ती मुलं मी दुरूनच न्याहाळत होतो.आता दोघांमध्ये शर्यत लागलेली एका ठराविक अंतरपर्यंत सर्वात आदी कोण जाते,दोघेही पळू लागले अन् त्यातील एकजण म्हंटला की बस मी आता थकलो,उर्वरित शर्यत उद्या अन् दोघेही धापा टाकत जवळच असलेल्या बेंचवरती जावून बसली....
बस इतकचं मी बघितलं अन् डोक्यात विचारांची तिडीक सुरू झाली अन् मग समोर बघितलेले हे क्षण लिखाणात कसे साजरे होतात आणि डोक्याला कसे विचार करायला भाग पाडतात याची प्रचिती येते.मग ऐन तारुण्यात असा आलेला थकवा अन् आयुष्याची घडी बसवताना आजचे क्षण उद्यावर ढकलता येतात का..?
ते शक्य होते का..?
होणारी फरफट अन् वेळोवेळी चुकीचे होणारे निर्णय यांना सावरता येतं का..?
असे प्रश्न डोळ्याला समोर दिसू लागतात अन् मनाला विचारांचा नकोसा वाटणारा तो क्षण....
खूपवेळा वाटतं की थकलो आहे आता पण तारुण्याच्या उंबरठ्यावर अन् या जीवनाच्या शर्यतीत थांबता येणं शक्य नाहीये,सोबतच काही क्षण विश्रांतीही नकोय....
आयुष्य स्थिर होण्यापर्यंत मन स्थिर ठेवायचं आहे अन् अजुन खूप काही....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा