गाफील..!
मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते....
मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांचे "गाफील" हे पुस्तक काल वाचले.एकूण "२९१" पानांचे असलेले हे पुस्तक आपल्याला पुस्तकाचा नायक फिरोजसोबत अनेक वळणांवर फिरून आणते...
"सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेले हे खूप उंचीचे अन् प्रत्येकाने "सुहास शिरवळकर" यांचे समग्र साहित्य वाचताना आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे जे की आपण एकदा पुस्तक वाचायला घेतले की शेवटपर्यंत बसल्याजागी बसून ठेवते...
फिरोज इराणी नावाचं पात्र किंवा या पुस्तकाचा नायक या पुस्तकातील तीन कथा किंवा त्यांच्या आयुष्यात नसत्या लफड्यात पडल्यामुळे आलेली ही तीन वळणे आहे,जी प्रत्येकवेळा पुस्तकाच्या नावाप्रमाणे "गाफील" राहिल्यामुळे नेहमीच झालेली त्याची फसगत आणि सगळं जीवावर आलं तरी त्यातून सहीसलामत आणि मालामाल होऊन बाहेर पडणारा असा हा फिरोज...!
सुशिंचं कुठलेही पुस्तक वाचतांना एक बाब लक्षात येते की,पुस्तकातील कुठलाही प्रसंग ते इतक्या सुंदर पद्धतीने शब्दबद्ध करतात की तो प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर घडतो आहे असे वाटायला लागते आणि त्यामुळेच त्यांचे पुस्तक वाचतांना अजुनच खूप छान वाटते...
अमर विश्वास सारखा वकील त्यातून कोर्टाच दर्शन आम्हाला सुशिंनी दाखवलं,सोबतच दारा बुलंदसारखं पात्र रेखाटून त्यांनी राजस्थानचं जे चित्रण केलंय ते त्यांच्या कल्पनाशक्तीची उंची दाखवतं.मुंबई मधील काही रहिवासी भागांचे केलेलं वर्णन तर हुबेहूब माझ्या कल्पनेशी इतकं मिळतं जुळते आहे की अगदी आपण ते सर्व ठिकाण बघितले अन् हा सर्व प्रसंग अनुभवला आहे असे काही क्षण वाटते.
निखळ साधं तत्वज्ञान असो,समाजाचं भयानक रूप असो किंवा प्रेम,रोमांच,वेश्या वसाहतीचे केलेलं वर्णन,उल्लेख,शेवटपर्यत न संपणारा थरार,वासना,सूड या भावना कथेतून मांडण्याची त्यांची लकब अगदी लाजवाब म्हणावी अशीच आहे.
खरेतर माझ्या आयुष्यात सू.शि. जरा उशीराच आले पण त्यांनी लिहलेले पुस्तके अन् ते वाचताना येणारी मज्जा आजही अनुभवयाला येते."समांतर" असो किंवा "गाफील" एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे ही पुस्तके आहे,लवकरच समग्र सू.शि. वाचून पूर्ण करायचं आहे.
कारण प्रत्येक पुस्तकात पुढे काय होईल आणि हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा छान असेल याची जाणीव होत असतेच....
Written by
Bharat sonwane....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा