मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आठवणीतले बालपण.... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आठवणीतले बालपण....

खिडकीतून वळवाच्या पावसाच्या सरी पडतांना दिसायच्या,अलीकडे त्यांना खिडकीतून टिपणे हे एकच काम मी करत असायचो... घराच्या बाजूला चहूकडे लाल मातीची जमीन जिथवर नजर जाईल तिथवर दिसायची,मध्येच कुठेतरी काळ्या खडकांचा समुह समुद्रात असणाय्रा एकाकी बेटांप्रमाणे भासायचा... पडता पाऊस या लाल मातीत शिंतोड्याच्या रुपात जाऊन उताराच्या दिशेनं वाहू लागायचा,वाहणारे सर्व पाणी परिसरात असलेल्या छोट्याश्या धरणरुपी तलावात जाऊन स्थिर होत असायचे. वळवाचाच पाऊस तो फार फार पंधरा वीस मिनिटे चालायचा अन् मग उघडुन जायचा मग उगवुन येणारं ते सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सर्व डोळ्यांचे पारणं फेडणारं असायचं... त्याला बघण्यासाठी आणि पावसाने ओल्या झालेल्या जमिनीतून येणाऱ्या सुगंधाला,खळखळ वाहणार्या पाण्याला अनुभवण्यासाठी आम्ही सर्व कॉलनीतील दहा-बारा मुलं घरा बाहेर निघायचो... घरातून हाफ चड्डी,फुल बाह्यांचा ड्रेस सावरत निघालो की,छोट्या छोट्या तयार झालेल्या नैसर्गिक नाल्यांमधून वाहणारे पाणी लाल चिखल,दगड,गोटे यांनी आडवत बसायचो...हे सर्व करतांना अनवाणी पायाला लागणारा मऊ चिखल खूप आनंद देऊन जायचा,भटकत भटकत धरणाच्या पाळेवरून जातांनी...