खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..! धुसर झालेली खिडकीची तावदाने ही तुझा आठवणींचे आरसे होऊन बघत असतो मी, कल्पनेतले तुझे नितळ निवांत डोळे भेटता हल्ली इथं मला..! खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..! हल्ली खिडकीच्या आतलं जग तुझ्या आठवणी देऊन जात असतं,तुझ्या भेटीचा एक बहाना असावा तो फक्त थांबण्याच एकच अस कारण कधीच नसतं..! खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..! खिडकी वरच्या पडद्यासही तुझी ओढ असावी हल्ली,वाऱ्यासमवेत तुझ्या येण्यासाठीची ही त्याला चाहुल लागत असावी म्हणुन बघत असतो तो ही तुझी वाट...! खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय... त्या खिडकी पल्याडच्या जगात तु हरवली आहे विसर पडलाय तुला आमचा सर्वांचा,माझ्याही हाती काही नसतं तुला विसर पडलाय अन् मला त्याचा असर झालाय बस बाकी काही नाही... खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय... येशील तु हव्य्यास मला अन् या निर्जीव असुन सजीव माझ्या प्रिय मित्रांना आहे,माझं नाही सांगु शकत मी होऊन जाईल एक दिवस कायमचा निर्जीव प...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!