खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..!
धुसर
झालेली खिडकीची तावदाने ही तुझा आठवणींचे आरसे होऊन बघत असतो मी,
कल्पनेतले तुझे नितळ निवांत डोळे भेटता
हल्ली इथं मला..!
खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..!
हल्ली खिडकीच्या आतलं जग तुझ्या आठवणी देऊन जात असतं,तुझ्या भेटीचा एक बहाना असावा तो फक्त थांबण्याच एकच अस कारण कधीच नसतं..!
खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..!
खिडकी वरच्या पडद्यासही तुझी ओढ असावी
हल्ली,वाऱ्यासमवेत तुझ्या येण्यासाठीची ही त्याला चाहुल लागत असावी म्हणुन बघत असतो तो ही तुझी वाट...!
खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय...
त्या खिडकी पल्याडच्या जगात तु हरवली आहे विसर पडलाय तुला आमचा सर्वांचा,माझ्याही हाती काही नसतं तुला विसर पडलाय अन् मला त्याचा असर झालाय बस बाकी काही नाही...
खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय...
येशील तु हव्य्यास मला अन् या निर्जीव असुन सजीव माझ्या प्रिय मित्रांना आहे,माझं नाही सांगु शकत मी होऊन जाईल एक दिवस कायमचा निर्जीव पण या साजीवांणा तुझी वाट बघणं आहे....
खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय...
हल्लीना आस लागुन असते तुझी मला अन् या सर्वांना,रीतेपण अन् मनाचा हळवापणा वाढलाय गं हल्ली असवांशी मैत्री सर्वांनी केलीय आम्ही तेव्हा ये एकदा...
खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय...
कवी भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा